Uddhav Thackeray Visit Flood Affected Marathwada News
Uddhav Thackeray Visit Flood Affected Marathwada NewsSarkarnama

Uddhav Thackeray : धाराशिवमधील बांधावर पाऊल ठेवताच उद्धव ठाकरेंचे मोठे आश्वासन; म्हणाले, 'हेक्टरी 50 हजार रुपयांची मदत...'

Uddhav Thackeray Dharashiv announcement news : नुकसानग्रस्त भागाला गुरुवारी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भेट देऊन शेतकरी वर्गाशी संवाद साधला. यावेळी शेतकरी वर्गाने त्यांच्याकडे मदतीची अपेक्षा व्यक्त केली.
Published on

Dharashiv news : मराठवाड्यातील लातूर, बीड, धाराशिवमध्ये अतिवृष्टीने पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. पुरामुळे या भागातील जमीन देखील खरडून गेली आहे. या नुकसानग्रस्त भागाला गुरुवारी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भेट देऊन शेतकरी वर्गाशी संवाद साधला. यावेळी शेतकरी वर्गाने त्यांच्याकडे मदतीची अपेक्षा व्यक्त केली. त्यानंतर धाराशिव जिल्ह्यातील इटकूर येथील बांधावर पाऊल ठेवताच उद्धव ठाकरेंनी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना राज्य सरकारकडून हेक्टरी 50 हजार रुपयांची मदत मिळवून देणार असल्याची मोठी घोषणा केली. त्यासोबतच राज्यात ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी त्यांनी केली.

धाराशिव जिल्ह्यातील इटकूर येथील नुकसानग्रस्त शेतीचे पाहणी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली. यावेळी शेतीच्या बांधावरच त्यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधला. त्यांनी याठिकाणी पाऊल ठेवताच माझं सरकार असताना मी तुम्हाला नुकसानभरपाई दिली होती. आज माझ्या हातात काही नाही. परंतु सरकारकडे मी तुमच्या मागण्या नक्की मांडेन असे आश्वासन उद्धव ठाकरेंनी (Uddhav thackeray)शेतकऱ्यांना दिले.

Uddhav Thackeray Visit Flood Affected Marathwada News
Aditya Thackeray News : पाकिस्तान विरुद्ध क्रिकेट किती लाजिरवाणे ? खेळाडूंनो विचार करा, बहिष्कार टाका! आदित्य ठाकरेंचे आवाहन

खचून जाऊ नका

यावेळी त्यांनी शेतकरी वर्गाच्या व्यथा ऐकून घेऊन त्यांच्याशी चर्चा केली. या संकट काळात तुम्ही खचून जाऊ नका आणि वेडंवाकडं पाऊल उचलू नका. तुमच्या मागण्या मी सरकारसमोर मांडेन. आम्ही तुमच्यासोबत आहोत, असे आश्वासन उद्धव ठाकरेंनी शेतकऱ्यांना दिले.

Uddhav Thackeray Visit Flood Affected Marathwada News
MLA tension : वडेट्टीवारांनी वाढवले आमदारांचे टेन्शन; शेतकऱ्यांसाठी सहा महिन्यांचे मानधन देण्याची केली घोषणा

त्यासोबतच राज्य सरकारने हेक्टरी 50 हजार रुपये नुकसानभरपाई द्यावी आणि कर्जमाफी करावी, अशी मागणी शेतकऱ्यांनी उद्धव ठाकरेंसमोर केली. सरकारने जाहीर केलेली मदत पुरेशी आहे का, असा सवाल उद्धव ठाकरेंनी शेतकऱ्यांना केला. त्यानंतर नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना राज्य सरकारकडून हेक्टरी ५० हजार रुपयांची मदत मिळवून देणार असल्याची मोठी घोषणा केली. त्यासोबतच राज्यात ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी त्यांनी केली.

Uddhav Thackeray Visit Flood Affected Marathwada News
Eknath Shinde: "लय देवानं परेशान केलंय...." धाराशिवच्या शेतकऱ्यांची हतबलता! पुराच्या पाहणीसाठी गेलेल्या एकनाथ शिंदेंना शेतकऱ्यांनी घेरलं

यावेळी उद्धव ठाकरे यांनी धाराशिवसह त्यांनी लातूर जिल्ह्यातील बांधावर हजेरी लावली. यावेळी शिवसेनेचे (Shivsena) नेते व खासदार संजय राऊत, खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर, माजी आमदार अंबादास दानवे, माजी खासदार चंद्रकांत खैरे, आमदार कैलास पाटील यांच्यासह ठाकरे सेनेचे पदाधिकारी उपस्थित होते.

Uddhav Thackeray Visit Flood Affected Marathwada News
Eknath Shinde first reaction : मदतीवरील जाहिरातीच्या फोटोवर एकनाथ शिंदेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, 'राजकारण बाजूला...'

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com