Ambadas Danve Letter To Governor News : मंत्री संजय शिरसाट यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई करा; अंबादास दानवेंचे राज्यपालांना पत्र!

Leader of Opposition Ambadas Danve writes to the Governor demanding disciplinary action against Sanjay Shirsat over alleged misconduct. : संजय शिरसाट यांनी प्रत्युत्तर देताना दानवे, राऊत यांच्यावर मराठी माणसाला व्यवसायापासून रोखण्यासाठी आणि मला बदनाम करण्यासाठी खोटे आरोप केले जात असल्याचा दावा केला.
Ambadas Danve Letter To Governor News
Ambadas Danve Letter To Governor NewsSarkarnama
Published on
Updated on

Shivsena UBT News : राज्याचे सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांनी दिनांक 2 जून 2025 रोजी छत्रपती संभाजीनगर येथील 'विट्स' हॉटेलच्या लिलाव प्रक्रियेतील वादावर प्रतिक्रिया देताना सार्वजनिकरीत्या अत्यंत असंसदीय, असंविधानिक आणि सभ्यतेला धरून नसलेले वक्तव्य केले आहे. संजय शिरसाट यांनी केलेल्या वक्तव्याची गंभीरता लक्षात घेऊन मंत्रीपदाच्या शुचितेचा, सभ्यतेचा व लोकशाही मूल्यांचा उचित सन्मान राखला जाण्याच्या दृष्टीने योग्य ती शिस्तभंगात्मक कारवाई करण्याबाबत आपल्या स्तरावरुन संबंधितांना निर्देश द्यावेत, अशी मागणी विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी राज्यपाल सी.पी.राधाकृष्णन यांच्याकडे पत्राद्वारे केली.

छत्रपती संभाजीनगर शहरातील रेल्वेस्टेशन रोडवर असलेल्या हॉटेल व्हिटस् खरेदी प्रक्रियेवरून जिल्ह्याचे पालकमंत्री तथा राज्याची सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट (Sanjay Shirsat) यांच्यावर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते तथा खासदार संजय राऊत, विधानपरिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी गंभीर आरोप केले होते.

हॉटेलच्या लिलाव प्रक्रियेत राजकीय दबाव आणून संजय शिरसाट यांच्या मुलाच्या नावे असलेल्या कंपनी व त्यातील भागीदारांनी 110 कोटी रुपयांचे हॉटेल केवळ 67 कोटींमध्ये खरेदी करण्याचा डाव आखला. यात महसूल विभागातील अधिकारी देखील सहभागी होते. बाजार मूल्य जास्त असताना संजय शिरसाट यांना फायदा मिळवून देण्यासाठी महसूल विभागाची यंत्रणा राबली, असा आरोप अंबादास दानवे (Ambadas Danve) यांनी केला होता.

Ambadas Danve Letter To Governor News
Sanjay Shirsat On BJP : ज्यांचा हात धरून मोठे झाले, त्यांच्या विरोधात अंहपणे बोलणे दुर्दैवी; संजय शिरसाट यांनी भाजप नेत्यांना सुनावले..

तसेच ही लिलाव प्रक्रिया रोखून संबंधितांवर कारवाई करावी, अशी मागणी दानवे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पत्राद्वारे केली होती. या वादावर संजय शिरसाट यांनी प्रत्युत्तर देताना अंबादास दानवे, संजय राऊत यांच्यावर मराठी माणसाला व्यवसायापासून रोखण्यासाठी आणि मला बदनाम करण्यासाठी खोटे आरोप केले जात असल्याचा दावा केला होता. तसेच हॉटेल लिलाव प्रक्रियेतून आपण बाहेर पडत असून वीस कोटींचा फायदा करण्यासाठी तुम्ही 90 कोटीत टेंडर भरा, असे आव्हान दानवे आणि राऊत यांना दिले होते.

Ambadas Danve Letter To Governor News
Ambadas Danve On Sanjay Shirsat News : चक्रम, वेड्या माणसाला मंत्रिमंडळात ठेवू नका! अंबादास दानवे राज्यपालांना पत्र देणार..

तसेच 'मी चक्रम माणूस आहे, घराला आग लावायला ही कमी करणार नाही', असे विधान करत खळबळ उडवून दिली होती. त्यांच्या याच विधानाचा आधार घेत अंबादास दानवे यांनी चक्रम आणि वेड्या माणसाला मंत्रिमंडळात ठेवू नका, अशी मागणी आपण राज्यपालांकडे करणार असल्याचे जाहीर केले होते. त्यानुसार आज मुंबईत अंबादास दानवे यांनी मंत्री संजय शिरसाट यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई करा, अशी मागणी राज्यपालांना पत्र लिहित केली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com