Ambadas Danve On Loksabha: लोकसभा सोडा, कोर्टाच्या निकालानंतर तुमचा पक्ष आणि तुम्ही कुठे असाल ?

Chhatrapati Sambhajinagar News : भाजप तर त्यांना हिंग लावूनही विचारणार नाही.
Mla Ambadas Danve-Sanjay Shirsat
Mla Ambadas Danve-Sanjay ShirsatSarkarnama

Marathwada Political News: लोकसभा निवडणुकीला (Ambadas Danve On Loksabha) अद्याप वेळ आहे, त्यामुळे सध्या जे इच्छूक उड्या मारतायेत त्यांना कोर्टाच्या निकालानंतर त्यांचा पक्ष आणि ते कुठे असतील हेही माहित नाही, अशा शब्दात विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे (Ambadas Danve) यांनी पालकमंत्री संदीपान भुमरे आणि आमदार संजय शिरसाट यांना लोकसभा उमेदवारीवरून टोला लगावला.

Mla Ambadas Danve-Sanjay Shirsat
Ambadas Danve On Cm Shinde : मुख्यमंत्र्यांनी कितीही पालख्या वाहिल्या, तरी भाजपच्या पराभवाची सुरुवात कर्नाटकातूनच..

गेल्या काही दिवसांपासून छत्रपती संभाजीनगरची लोकसभा शिंदेंची शिवसेनाच लढवणार असा दावा केला जातोय. (Shivsena) विशेषत लोकसभा लढवण्यास इच्छूक असलेले भुमरे आणि शिरसाट यात आघाडीवर आहे. या संदर्भात आज माध्यमांनी अंबादास दानवे यांना प्रश्न विचारला तेव्हा त्यांनी या दोघांचीही खिल्ली उडवली.

दानवे म्हणाले, लोकसभा निवडणुकीला अजून बराच उशीर आहे, पण त्या आधी कोर्टाचा निकाल येणार आहे. तो निकाल आल्यानंतर हे जे लोकसभा लढवण्याचे स्वप्न पाहत आहेत, ते आणि त्यांचा पक्ष कुठे असले? (Bjp)भाजप तर त्यांना हिंग लावूनही विचारणार नाही, असा टोला दानवे यांनी लगावला. (Sanjay Shirsat) राज्यातील संत्तातरानंतरचा मोठा निकाल सर्वोच न्यायालयाकडून येणार आहे.

या निकालावर राज्यातील सरकार टिकणार की जाणार? हे ठरणार आहे. असे असतांना शिंदे गटाचे मंत्री, आमदार मात्र लोकसभा निवडणूक लढवण्यासाठी गुडघ्याला बाशिंग बाधून तयारीला लागले आहेत. परंतु कोर्टाच्या निकालानंतर हे सरकार निश्चितच पडणार आहे.

त्यामुळे त्यानंतर यांचा पक्ष आणि हे स्वतः कुठे असतील हे बघावे लागेल. आज जो भाजप सत्तेसाठी यांना डोक्यावर घेवून नाचत आहे, तोच पक्ष उद्या शिंदे व त्यांच्यासोबतच्या गद्दारांना हिंग लावूनही विचारणार नाही, असा चिमटा देखील दानवे यांनी काढला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com