
Assembly Session News : राज्याचा महसूल वाढवण्यासाठी सरकारने नव्याने सव्वातीनशेहून अधिक नवे दारू परवाने देण्याचा निर्णय घेतला आहे. यावर विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी कडाडून टीका केली. सत्ताधारी पक्षाच्या आमदारांसाठी नवे दारूचे परवाने दिले जात आहेत का? असा सवाल दानवे यांनी विधान परिषदेत केला. माता-भगिनींचा या दारू धोरणाला विरोध असल्याचे दानवे म्हणाले.
नव्याने दारू परवाने देण्याच्या राज्यातील महायुती सरकारवर विरोधक तुटून पडले आहेत. अंबादास दानवे (Ambadas Danve) यांनीही विधान परिषदेत हा निर्णय सत्ताधारी पक्षाच्या आमदारांना दारू परवाने मिळावेत यासाठी घेण्यात आला आहे का? असा प्रश्न सरकारला विचारला. राज्य उत्पादक शुल्क विभागाच्या वतीने राज्यामध्ये 328 नवीन दारूचे परवाने देण्यात येत आहेत. ८ महसूली विभागात हे परवाने दिले जाणार आहेत. 1972 पासून असे परवाने राज्यात बंद होते. राज्याचे उपमुख्यमंत्री यांच्या अध्यक्षतेखाली महाराष्ट्राचे मद्य धोरण आखण्यासाठी समिती गठीत करण्यात आली होती.
या समितीतील लोकं दारूचे वितरण व पुरवठा व्यवस्था नियंत्रित करत असतात. राज्याचा महसूल वाढविण्यासाठी अशाप्रकारे दारूच्या 328 नवीन दुकानांना परवाने दिले जात असतील तर ते राज्याच्या दृष्टीने योग्य नाही. माता - भगिनी यांचा या धोरणाला कठोर विरोध आहे. (Shivsena) सत्ताधारी पक्षाच्या आमदाराना परवाने देण्यासाठी हे नवीन 328 दुकानांना परवानगी दिली जात आहे का? अशी स्थिती असेल तर या धोरणाला आमचा विरोध असणार आहे. राज्याचे जनजीवन या धोरणामुळे विस्कळीत होऊ शकते याकडेही दानवे यांनी सभागृहाचे लक्ष वेधले.
रुग्णवाहिकांमध्ये उसनवारीवर डिझेल..
102 रुग्णवाहिका गर्भवती महिला, लहान बालके आणि गंभीर घटनेच्या वेळेस सुविधा देणारी व्यवस्था आहे. केंद्र सरकारचे अनुदान न मिळाल्यामुळे या सुविधांची देयके रखडले गेल्याचे शासनाचे म्हणणे अत्यंत खेदजनक आहे. गावोगावी उसनवारी पद्धतीने या रुग्णवाहिकांमध्ये डिझेल भरले जात आहे. राज्य सरकारची आर्थिक स्थिती इतकी गंभीर झाली आहे का? केंद्र सरकारचा निधी आला नाहीतर ही योजना चालणार नाही का? आणि राज्य राज्य सरकार या योजनेसाठी स्वतंत्र निधी उपलब्ध करून देणार का? अशी विचारणा दानवे यांनी सभागृहात केली.
सरकारचे अभिनंदन..
अखंड हिंदुस्थानाचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या शौर्य आणि पराक्रमाचे साक्षीदार 12 गड किल्ल्यांचा युनोस्कोच्या जागतिक वारसा स्थळांमध्ये समावेश करण्यात आला आहे. यासाठी केंद्र व राज्य सरकारचे अभिनंदन. या गड किल्ल्यांचा समावेश जागतिक वारसा स्थळांमध्ये झाल्याने आपली जबाबदारी वाढली आहे. फक्त मोठ्या निधीची घोषणा करून चालणार नाही तर कायमस्वरूपी उपायोजना करणे आवश्यक आहेत. गडकिल्ल्यांच्या देखभालीसाठी आवश्यक कर्मचारी आणि इतर व्यवस्थांची निर्मिती करणेही तितकेच गरजेचे असल्याचे अंबादास दानवे म्हणाले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.