Ambadas Danve On Gulabrao Patil : गुलाबराव.. गद्दारी अन् फोडाफोडीची सवय विद्यार्थ्यांना लावू नका!

Ambadas Danve lashes out at Gulabrao Patil, warning against instilling habits of betrayal and defection among students. : या सरकारने त्यांच्या जाहीरनाम्यात शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याचे आश्वासन दिले होते. ते आता सरकारने पूर्ण केले पाहिजे.
Ambadas Danve-Gulabrao Patil News
Ambadas Danve-Gulabrao Patil NewsSarkarnama
Published on
Updated on

Shivsena News : महायुती सरकारमधील शिवसेनेचे मंत्री गुलाबराव पाटील यांनी एका शाळेत विद्यार्थ्यांसमोर बोलताना अजब सल्ला दिला. आम्ही जसे कार्यकर्ते फोडतो, तसे तुम्ही विद्यार्थी फोडा, असे विधान पाटील यांनी केले. शाळेतील विद्यार्थ्यांची पटसंख्या वाढवण्याच्या संदर्भाते त्यांनी हे विधान केले. त्याच्या या विधानाचे पडसाद शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात उमटले.

विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांना गुलाबराव पाटील यांच्या या विधानाबद्दल विचारले तेव्हा, त्यांनी हसतच पाटील यांच्या या वक्तव्याचा समाचार घेतला. (Gulabrao Patil) गुलाबराव पाटील यांनी शाळेतील विद्यार्थ्यांना गद्दारी आणि फोडाफोडी शिकवू नये, असा टोला दानवे यांनी लगावला. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्या फायली अडवल्या जात असल्याचे सांगत अजित पवार यांची अमित शहा यांच्याकडे तक्रार केली आहे, याकडे दानवे यांचे लक्ष वेधले.

यावर सगळे मिळूनच या गोष्टी करत असतात, जशा यांच्या फाईल अडवल्या जातात तशा त्यांचीही काही गोष्टी अडवल्या जातात. मला असे वाटते हे राज्याच्या मंत्रिमंडळातील मोठे नेतेच करत असतात. ज्याच्यात दम आहे त्याच्या फाईली बरोबर मंजूर होतात, असा टोलाही अंबादास दानवे (Ambadas Danve) यांनी एकनाथ शिंदे यांचे नाव न घेता लगावला.

Ambadas Danve-Gulabrao Patil News
Ambadas Danve On Manikrao Kokate : राज्याच्या मंत्रिमंडळात 'माणिक' नावाचे रत्न, पण ते वागतात सावकारासारखे!

या सरकारने त्यांच्या जाहीरनाम्यात शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याचे आश्वासन दिले होते. ते आता सरकारने पूर्ण केले पाहिजे. आता फक्त शेतकरी आवाज उठवत आहेत, येणाऱ्या काळात सर्व पक्ष मिळून जनआंदोलन या महाराष्ट्रात उभारू, असा इशाराही दानवे यांनी दिला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे बीडचे आमदार संदीप क्षीरसागर यांच्यावर नगरपरिषदेच्या लेखापालाने जीवे मारण्याची धमकी दिल्याची पोलिसांत तक्रार दिली, या संदर्भात दानवे यांना प्रश्न विचारण्यात आला.

Ambadas Danve-Gulabrao Patil News
Rohit Pawar On Gulabrao Patil : 'शाळेतील विद्यार्थ्यांच्या मागे पण आता ईडी लावता का? रोहित पवारांचा गुलाबराव पाटलांना टोला

यावर एखादा अधिकारी मुजोरपणे वागत असले, लोकांची कामे करत नसेल तर लोकप्रतिनिधींचा संयम सुटतो. मला वाटते संदीप क्षीरसागर यांचाही तो सुटला असेल तर यात काही वावगे नाही. शेवटी निवडून दिलेल्या जनतेची कामे एखादा अधिकारी अडवत असेल किंवा त्याच्यात खोडा घालत असेल, तर त्याला वठणीवर आणावेच लागते, असे म्हणत दानवे यांनी संदीप क्षीरसागर यांची पाठराखण केली.

Ambadas Danve-Gulabrao Patil News
Sanjay Shirsat On Shivsena UBT : महापालिका निवडणुकीनंतर उद्धव ठाकरे यांचा पक्ष दिसणार नाही! संजय शिरसाट यांची भविष्यवाणी

शिवसेनेने प्रवक्ते पद दिलेल्या संजना घाडी यांनी शिंदेसेनेत प्रवेश केला, यावर प्रतिक्रिया विचारली तेव्हा, हो का? कधी केला? मला माहितच नाही, असे सांगत दानवे यांनी या विषयावर अधिक बोलणे टाळले. शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांनी मी अंबादास दानवेला मोठं केलं, असा दावा केला, यावरही मग? एवढेच उत्तर दानवे यांनी दिले. यावरून या दोन नेत्यांमधील संघर्ष अद्याप सुरूच असल्याचे दिसून आले.

२५ वर्षे पूर्ण करणारा ई-सकाळ आता का्ॅमस्कोअरमध्ये नंबर १. डिजिटल माध्यमांच्या क्षेत्रातली नवी झेप

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com