Ambadas Danve On Manikrao Kokate : राज्याच्या मंत्रिमंडळात 'माणिक' नावाचे रत्न, पण ते वागतात सावकारासारखे!

Ambadas Danve criticizes Manikrao Kokate, the Agriculture Minister, for behaving like a moneylender rather than fulfilling his duties as a public servant. : भांडवली गुंतवणूक शेतकरी करतात का? शेतकरी पीक विम्याचे पैसे मागतात मग त्यातून साखरपुडे करा, लग्न करा असे म्हणत कोकाटे यांनी शेतकऱ्यांबद्दल चुकीच विधान केले होते.
Ambadas Danve-Kokate-News
Ambadas Danve-Kokate-NewsSarkarnama
Published on
Updated on

Shivsena News : पीक विमा, शेतकरी कर्जमाफीच्या पैशातून शेतकरी साखरपुडे, लग्न करतात, असे वादग्रस्त विधान राज्याचे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी नुकतेच केले. यावरून संपूर्ण राज्यात संतापाची लाट पसरली. आज कोकाटे यांनी शेतकऱ्यांची माफी मागत या वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला. दरम्यान, शिवसेनेचे नेते तथा विधानपरिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी माणिकराव कोकाटे व राज्य सरकारला टोला लगावला.

'माणिक' नावाचे रत्न आहे राज्याच्या मंत्रिमंडळात. (Manikrao Kokate) कृषी मंत्री असले तरी सावकारासारखे वागणे हा त्यांचा गुण दिसतोय. एक तर शेतकऱ्यांच्या हक्काची नुकसानभरपाई त्यांना वेळेत न देता असले वक्तव्य करणे शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळण्यासारखे आहे, अशा शब्दात दानवे यांनी कोकाटे यांना सुनावले.

जे नियमितपणे कर्ज भरतात त्यांनी भरावे, कर्ज घ्यायचे आणि पाच ते दहा वर्ष कर्जमाफी होण्याची वाट पाहायची. तोपर्यंत काही भरायचं नाही, अशी टीका माणिकराव कोकाटे यांनी केली होती. कर्जमाफी झाल्यानंतर तुम्हाला पैसे येतात. (Ambadas Danve) त्या पैशांचं तुम्ही काय करता? त्या पैशांतून शेतीमध्ये एक रुपयाची तरी गुंतवणूक आहे का? असा प्रश्न त्यांनी केला होता.

Ambadas Danve-Kokate-News
Ambadas Danve On Mahayuti News : पुढील निवडणुका येईपर्यंत महाराष्ट्रात एप्रिल फूल उत्सव सुरूच राहणार! अंबादास दानवेंची खोचक टीका

सरकार तुम्हाला शेतीमध्ये गुंतवण्यासाठी पैसे देणार आहे. तुम्हाला पाईपलाईनाला पैसे देत आहे, सिंचनासाठी पैसे दिले जात आहेत. तुम्हाला शेततळ्यासाठी पैसे देत सरकार भांडवली गुंतवणूक करते. भांडवली गुंतवणूक शेतकरी करतात का? शेतकरी पीक विम्याचे पैसे मागतात मग त्यातून साखरपुडे करा, लग्न करा असे म्हणत कोकाटे यांनी शेतकऱ्यांबद्दल चुकीच विधान केले होते.

Ambadas Danve-Kokate-News
Manikrao Kokate : "मी माझ्या मित्राशी मस्करीत..."; कृषीमंत्री कोकाटेंचं शेतकऱ्यांबाबत आधी वादग्रस्त वक्तव्य नंतर सारवासारव, नेमकं काय म्हणाले?

दरम्यान, त्यांच्या या विधानवरून राज्यभरातील शेतकऱ्यांनी संताप व्यक्त केला. त्यानंतर आज कोकाटे यांनी दिलगिरी व्यक्त केली. शेतकऱ्यांची अनावधानाने आणि मस्करीत कुस्ती झाल्याने असे वक्तव्य केल्याचे कोकाटे म्हणाले. शेतकऱ्यांचा मान सन्मान दुखावला गेला असेल, भावना दुखावल्या असतील तर मी दिलगिरी व्यक्त करतो, असे ते म्हणाले. या सगळ्या पार्श्वभूमीवर धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्यानंतर आता नंबर कोकाटेंचा असं म्हणणाऱ्या अंबादास दानवे यांनी कोकाटे यांचा राज्यमंत्रीमंडळातील रत्न असा उल्लेख करत त्यांना चिमटा काढला.

२५ वर्षे पूर्ण करणारा ई-सकाळ आता का्ॅमस्कोअरमध्ये नंबर १. डिजिटल माध्यमांच्या क्षेत्रातली नवी झेप

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com