Shivsena On Modi Government: बांग्लादेशला डिझेल पुरवठा, उद्धव ठाकरेंचा नेता मोदी सरकारवर प्रचंड भडकला; म्हणाला,'हा कोणता शेजारधर्म?'

India Bangladesh Relations News : बांगलादेशला 5 हजार टन डिझेल पुरवठ्याच्या निर्णयावर शिवसेना ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे यांनी मोदी सरकारवर टीका करत हा कोणता शेजारधर्म असा सवाल उपस्थित केला.
Shiv Sena (UBT) leader Ambadas Danve targets Prime Minister Narendra Modi over gas supply concerns and rising fuel crisis amid global geopolitical tensions.
Shiv Sena (UBT) leader Ambadas Danve targets Prime Minister Narendra Modi over gas supply concerns and rising fuel crisis amid global geopolitical tensions.Sarkarnama
Published on
Updated on

Shivsena UBT News : आखाती देशातील युद्धाचे चटके आता भारतालाही बसू लागले आहे. देशात गॅस, पट्रोल, डिझेलच्या संभाव्य टंचाईच्या भीतीने नागरिक ग्रासले आहेत. अशातच भारताने शेजारच्या बांगलादेशला पाच हजार टन डिझेलचा पुरवठा केल्याचे समोर आले. आता यामागे सरकारचे नेमके काय परराष्ट्र धोरण आहे, हे समजण्याआधीच या निर्णयावर टीकेची झोड उठू लागली आहे.

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते अंबादास दानवे यांनी बांगलादेशात तिथल्या सरकारविरोधात झालेला उद्रेक, सत्ता पालट आणि या दरम्यान उसळेल्या हिंसाचारात हिंदूवर झालेला अत्याचार याचा दाखला देत केंद्रातील मोदी सरकावर टीका केली आहे.

देशावर इंधन संकट ओढावलेले असताना बांगलादेशला पाच हजार टन डिझेलचा पुरवठा करत मोदी सरकार कोणात शेजारधर्म दाखवत आहेत, असा सवाल अंबादास दानवे यांनी सोशल मिडियाच्या माध्यमातून केला आहे.

Shiv Sena (UBT) leader Ambadas Danve targets Prime Minister Narendra Modi over gas supply concerns and rising fuel crisis amid global geopolitical tensions.
Shivsena-BJP News: संभाजीनगर जिल्ह्यातील 9 पंचायत समितीवर युतीचा बोलबाला, सर्वाधिक सभापती करत भाजपच ठरला मोठा भाऊ

शेजाऱ्याला मदत करणं चांगलंय, पण शेजारी त्या लायकीचा असावा लागतो! बांगलादेशला त्यांच्या हिंदूविरोधी कृत्याबद्दल टाचा घासायला लावण्याची गरज होती, त्यांना आमचं केंद्र सरकार डिझेलचा पुरवठा करून प्रगतीची 'गती' देण्याचा अजब पराक्रम करतंय. बांगलादेश पीएम गती शक्तीचा भाग समजा आता, अशा शब्दात त्यांनी भाजपाला टोला लगावला

Shiv Sena (UBT) leader Ambadas Danve targets Prime Minister Narendra Modi over gas supply concerns and rising fuel crisis amid global geopolitical tensions.
BJP News : संभाजीनगरच्या महापौरपदाची तहान 'स्थायी समिती सभापती' पदावर भागली; अनिल मकरिये यांच्या नावावर शिक्कामोर्तब

माझा सवाल आहे, की बांगलादेशला सुद्धा आता 'पीएम गती शक्ती' कार्यक्रमात समाविष्ट केलंय का? एकीकडे बांगलादेश हिंदू, बौद्ध, ख्रिश्चन एकता परिषदेचा अहवाल सांगतोय की, 4 ते 20 ऑगस्ट या अवघ्या 16 दिवसांत तिथे अल्पसंख्याकांवर 2010 हल्ले झाले. आणि 69 मंदिरं उद्ध्वस्त केली गेली, तिथे रक्तपात होत असताना इकडून डिझेलची रसद का पुरवली जातेय? हा कुठला शेजारधर्म? असा प्रश्नही अंबादास दानवे यांनी उपस्थित केला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com