Ambadas Danve On Shirsat: ठाकरेंच्या शिवसेनेला 'मामू पार्टी' म्हणत हिणवलं; अंबादास दानवेंनी मंत्री शिरसाटांना तीनच शब्दांत दम भरला

Ambadas Danve Vs Sanjay Shirsat: मंत्री संजय शिरसाट यांच्या या टीकेला अंबादास दानवे यांनी प्रत्युत्तर देत त्यांच्या शिवसेनेत असलेल्या मामूंचा आकडाच सांगितला. दानवे यांनी एक्सवर पोस्ट करत शिरसाट यांना सुनावले आहे. अब्दुल सत्तार यांच्या सिल्लोड नगरपालिकेतील नगरसेवकांचा दाखला देत दानवे यांनी शिरसाट यांना तर गाठोडे उघडू, असा इशारा दिला आहे.
Ambadas Danve- Sanjay Shirsat News
Ambadas Danve- Sanjay Shirsat NewsSarkarnama
Published on
Updated on

Shivsena News : छत्रपती संभाजीनगरमध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने माजी महापौर अब्दुल रशीद खान उर्फ मामू यांना प्रवेश दिल्यानंतर चोहोबाजूंनी टीकेची झोड उठवली जात आहे. चंद्रकांत खैरे यांच्याकडूनच या प्रवेशाला पक्षांतर्गत विरोध होत आहे. तर शिवसेनेचे मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री संजय शिरसाट यांनीही उद्धव ठाकरेंचा पक्ष आता मामूंचा झाला आहे, असे म्हणत खिल्ली उडवली. अंबादास दानवे (Ambadas Danve) यांनी शिरसाट यांना 'तर तुमचे गाठोडे उघडू' असे म्हणत आव्हान दिले आहे.

शिवसेनेत फूट पडल्यापासून छत्रपती संभाजीनगरमध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला सातत्याने गळती सुरू आहे. आगामी महापालिका निवडणुका डोळ्यासमोर ठेवत अंबादास दानवे यांनी माजी महापौर अब्दुल रशीद खान यांना पक्षात प्रवेश दिला. थेट मातोश्रीवर उद्धव ठाकरे यांच्या हस्ते शिवबंधन बांधत झालेल्या या प्रवेशाने चंद्रकांत खैरे यांनाही अतिव दुःख झाले. पक्ष प्रवेश झाला असला तरी रशीद मामूंना उमेदवारी मिळू देणार नाही, असा चंगच त्यांनी बांधला आहे.

इकडे मामूंना पक्षांतर्गत विरोध होत आहे, तर दुसरीकडे शिवसेना-भाजप उद्धव ठाकरेंच्या पक्षावर अक्षरश: तुटून पडले आहेत. आधीच काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत आघडी करून अडीच वर्ष राज्याचे मुख्यमंत्री झालेल्या उद्धव ठाकरे व त्यांच्या पक्षावर हिंदुत्व सोडल्याचा आरोप महायुती करत आली आहे.

त्यात अब्दुल रशीद खान सारख्या मुस्लिम नेत्याला पक्षात प्रवेश दिल्याने सत्ताधारी शिवसेनेला आयती संधी चालून आली आहे. पालकमंत्री संजय शिरसाट यांनी उद्धव ठाकरेंचा पक्ष आता हिंदूंचा नाही तर मामूंचा झाला आहे, अशा शब्दात टीका केली.

Ambadas Danve- Sanjay Shirsat News
Chandrakant Khaire : दानवेंनी 'मातोश्री'वर गुपचूप पक्षप्रवेश उरकला; खैरेंची तळपायाची आग मस्तकात : उमेदवारीच देणार नाही म्हणत इशारा!

मंत्री संजय शिरसाट यांच्या या टीकेला अंबादास दानवे यांनी प्रत्युत्तर देत त्यांच्या शिवसेनेत असलेल्या मामूंचा आकडाच सांगितला. दानवे यांनी एक्सवर पोस्ट करत शिरसाट यांना सुनावले आहे. अब्दुल सत्तार यांच्या सिल्लोड नगरपालिकेतील नगरसेवकांचा दाखला देत दानवे यांनी शिरसाट यांना तर गाठोडे उघडू, असा इशारा दिला आहे. सत्तारांच्या सिल्लोडमध्ये शिंदे गटाचे 25 नगरसेवक निवडून आले आहेत. पैकी 14 हे मंत्री शिरसाट यांच्या भाषेत 'मामु' आहेत.

Ambadas Danve- Sanjay Shirsat News
Karad Politic's : कऱ्हाडमध्ये काँग्रेस, शिवसेनेसह अपक्षांना मतदारांचा शॉक; 43 उमेदवारांचे डिपॉझिटही गुल

विशेष म्हणजे हे सर्व उमेदवार भाजपच्या उमेदवारांचा पराभव करून निवडून आले आहेत. सत्तार हिंदू देव देवतांचा किती 'सन्मान' करतात हे सर्वश्रुत आहेतच. हनुमंतांबद्दल त्यांचे 'विशेष' प्रेम आजही इंटरनेटवर उपलब्ध आहे. इतिहासात जायचे झालेच तर शिंदेंसेनेचे सत्तार यांच्यावर पूर्वीचे काय काय आरोप आहेत? सांगायचे असेल, तर गाठोडे उघडू! यांच्यासाठी आपला तो पिंट्या, दुसऱ्याचे ते कारटं, असा खेळ असल्यचा टोलाही अंबादास दानवे यांनी लगावला आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com