

कऱ्हाड नगरपालिका निवडणुकीत आघाडींच्या उमेदवारांना यश मिळाले, तर बहुतांश अपक्षांसह काही प्रमुख पक्षांच्या उमेदवारांना मतदारांनी नाकारले.
नगराध्यक्षपदाचे ६ आणि नगरसेवकपदाचे ३७ असे एकूण ४३ उमेदवारांचे आवश्यक मते न मिळाल्याने डिपॉझिट जप्त झाले.
लोकशाही आघाडी व यशवंत विकास आघाडी एकत्रितपणे विजयी ठरल्या, तर काँग्रेस, शिवसेना, जनशक्ती आणि अपक्षांना मोठा फटका बसला.
Karad, 22 December : सातारा जिल्ह्यातील महत्वाच्या असणाऱ्या कऱ्हाड नगरपालिकेच्या निवडणुकीत सर्व पक्षांनी आणि आघाड्यांच्या उमेदवारांनी जनमत आजमावले. मात्र, एक अपवाद वगळता इतर अपक्षांना मतदारांनी स्पष्टपणे नाकारल्याचे दिसून आले. त्याचबरोबर कॉंग्रेसचे सहा, जनशक्तीचे दोन आणि शिवसेनेच्या एका उमेदवारालाही निवडणुकीत झटका बसला आहे. या निवडणुकीत नगराध्यक्षपदाच्या सहा उमेदवारांचे तर कॉंग्रेस, शिवसेना, जनशक्ती आघाडी आणि अपक्ष अशा ३७ नगरसेवकपदाच्या उमेदवारांचे म्हणजे ४३ जणांचे डिपॉझीट जप्त झाले.
कऱ्हाड (Karad )नगरपालिका निवडणुकीत माजी सहकारमंत्री आणि राष्ट्रवादी कॉंग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे साताऱ्याचे जिल्हाध्यक्ष बाळासाहेब पाटील यांची लोकशाही आघाडी आणि थेट नगराध्यक्षपदाचे उमेदवार असलेले राजेंद्रसिंह यादव यांची यशवंत विकास आघाडी यांनी एकत्रितपणे निवडणूक लढवली.
भाजपचे जिल्हाध्यक्ष आमदार डॉ. अतुल भोसले यांनी कमळाच्या चिन्हावर उमेदवार उभे केले होते. कॉंग्रेसचे (Congress) माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी हाताच्या पंजावर उमेदवार उभे केले होते. या निवडणुकीत लोकशाही आणि यशवंत विकास आघाडीचे उमेदवार निवडून आले. निवडणूक लढवणाऱ्या महिला उमेदवारांसाठी ५०० रुपये आणि पुरुषाला एक हजार रुपये अनामत रक्कम असते.
दरम्यान या निवडणुकीत नगरपालिका निवडणूक नियम १९६६ नुसार उमेदवार निवडून न आल्यास त्यास मिळालेल्या वैध मतांची संख्या ही सर्व उमेदवारांना मिळालेल्या एकूण वैध मतांच्या संखेच्या १/८ मतांपेक्षा अधिक होत नसेल तर, अनामत रक्कम जप्त करण्याची तरतूद आहे, त्यानुसार निवडणूक निर्णय अधिकारी अतुल म्हेत्रे यांनी नगराध्यक्षपदाचे सहा आणि नगरसेवकपदाचे ३७ अशा ४३ जणांची अनामत रक्कम जप्त करून सरकारच्या तिजोरीत भरण्याचे आदेश दिले आहेत.
त्यामध्ये कॉंग्रेसचे नगराध्यक्षपदाचे एक उमेदवार, तर नगरसेवकपदाचे सहा उमेदवार, जनशक्ती आघाडीचे नगरसेवकपदाचे दोन उमेदवार, शिवसेनेचे एक उमेदवार आणि २८ अपक्ष उमेदवारांचा समावेश आहे.
नगराध्यक्षपदाच्या उमेदवारांमध्ये गणेश शिवाजी कापसे (अपक्ष मते ४५३), ॲड. श्रीकांत आनंदराव घोडके (अपक्ष -१२८ मते), शरद रामचंद्र देव (अपक्ष - १७४ ), झाकीर मौला पठाण (कॉंग्रेस - २३०९), इम्रान लियाकत मुल्ला (बसप - २५८), बापू शंकर लांडगे (अपक्ष - १२६) यांचा समावेश आहे.
नगरसेवक पदाच्या उमेदवारांमध्ये हुमेरा अबुबकर शेख (कॉंग्रेस - ७९ मते), ॲड. पद्मजा मिलिंद लाड (अपक्ष - ६६), सारिका विक्रमसिंह देशमुख (जनशक्ती आघाडी - २१३), निकहत जमीर नदाफ (कॉंग्रेस- १५५), ज्योती अधिकराव पवार ( अपक्ष - ३५५), संकेत हणमंत पवार (अपक्ष - २१), रियाज अब्दुलकरीम मुजावर (जनशक्ती - १४३), सागर चंद्रकांत लादे (अपक्ष - १२), जावेद बाबु शेख (कॉंग्रेस -१४४), दाऊद अब्दुलरहिमान सय्यद (अपक्ष १३),
आनंदराव बाबुराव लादे (कॉंग्रेस -१५५), मिनाज इम्रान सुतार - (अपक्ष - ३२४), राजेंद्र शंकर कांबळे ( अपक्ष - १९४), योगेश उत्तम लादे (कॉंग्रेस - ३८०), वहीदा बशीर इनामदार (अपक्ष - १९), सानिया आमजत मुतवल्ली (अपक्ष - २०), राहील शकील मुतवल्ली (अपक्ष - २४), प्रिया सुहास आलेकरी (अपक्ष - १३०), वंदना प्रविण गायकवाड (अपक्ष - १३), अजय अरविंद कुलकर्णी ( अपक्ष - १७७), मन्सूर बशीर खैरतखान (अपक्ष - १८), विनायक सदानंद मोहिते (अपक्ष - ९६), विद्या सतीश मोरे ( अपक्ष - सात), सुनिता आत्माराम साळुंखे (शिवसेना - १४९), प्रताप गोविंदराव इंगवले (अपक्ष - २५५), नागेश अरुण कुर्ले ( अपक्ष - ३४).
सुदर्शना संतोष थोरवडे (कॉंग्रेस - ३७१), पूनम भानुदास धोतरे ( अपक्ष - १६८), अजित अशोक भोसले (अपक्ष - १५९), योगेश रजनीकांत वेल्हाळ (अपक्ष - २७२), तेजस्विनी ऋषिकेश कुंभार (अपक्ष - ७७), गणेश शिवाजी कापसे (अपक्ष - ४४), ॲड. श्रीकांत आनंदराव घोडके (अपक्ष - २७), जय बाजीराव सुर्यवंशी (अपक्ष - ९२), सिद्धांत जयवंतराव पाटील (अपक्ष - १९२), दया विश्वनाथ गायकवाड (अपक्ष - ४०१), नईम युनुस पठाण (अपक्ष - ४७७) यांचा समावेश आहे.
प्र.1: कऱ्हाड नगरपालिकेच्या निवडणुकीत कोणाला यश मिळाले?
उ: लोकशाही आघाडी आणि यशवंत विकास आघाडीच्या उमेदवारांना यश मिळाले.
प्र.2: किती उमेदवारांचे डिपॉझिट जप्त झाले?
उ: एकूण ४३ उमेदवारांचे डिपॉझिट जप्त झाले आहे.
प्र.3: डिपॉझिट जप्त होण्याचे कारण काय?
उ: एकूण वैध मतांच्या १/८ पेक्षा कमी मते मिळाल्याने डिपॉझिट जप्त झाले.
प्र.4: सर्वाधिक फटका कोणत्या गटाला बसला?
उ: अपक्ष उमेदवारांना सर्वाधिक फटका बसला आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.