Imtiaz Jaleel On Sanjay Shirsat : मंत्री संजय शिरसाट यांचा एमआयडीसीतील प्लॉट खरेदीचा डाव इम्तियाज जलील उधळणार!

Minister Sanjay Shirsat faces controversy over the MIDC land case. MP Imtiaz Jaleel demands a fresh procurement process : एमआयडीसीतील भूखंड विक्री करताना वर्तमानपत्रात जाहिरात का दिली नाही? ट्रक टर्मिनलची गरज नाही असे कोणत्या अधिकाऱ्याने लिहून दिले? यासाठी सर्वेक्षण का केली नाही?
Sanjay Shirsat-Imtiaz Jaleel News
Sanjay Shirsat-Imtiaz Jaleel NewsSarkarnama
Published on
Updated on

AIMIM News : राज्याचे सामाजिक न्याय तथा जिल्ह्याचे पालकमंत्री संजय शिरसाट हे एकापाठोपाठ एक अशी प्रकरण बाहेर येत असल्याने कमालीचे अडचणीत सापडले आहेत. आधी मुलगा सिद्धांत शिरसाट याच्यावर झालेले आरोप त्यानंतर हॉटेल व्हिट्स प्रकरणात घ्यावी लागणारी माघार आणि आता एमआयडीसीत कंपनी सुरू करण्यासाठी खरेदी करण्यात आलेल्या प्लॉट वरून संजय शिरसाट यांची कोंडी करण्यात आली आहे.

एमआयएमचे माजी खासदार इम्तियाज जलील (Imtiaz Jaleel) यांनी सर्वप्रथम या प्लॉट खरेदीतील गैरप्रकार कागदपत्रांसह उघडकीस आणला. मंत्र्यांच्या दबावाखाली एमआयडीसीतील भूखंड शिरसाट यांच्या कंपनीसाठी 106 कोटी रुपयात देण्यात आल्याचा दावा इम्तियाज जलीली यांनी पत्रकार परिषदेत केला. तसेच या प्लॉट खरेदीसाठी संजय शिरसाट यांनी सत्तावीस कोटी रुपये कुठून आणले? असा सवालही केला.

त्यानंतर शिरसाट (Sanjay Shirsat) यांना हा प्लॉट खरेदी करता यावा यासाठी एमआयडीसीच्या अधिकाऱ्यांनी कसे नियम धाब्यावर बसवले? हे सांगत आज इम्तियाज यांनी थेट या कार्यालयात धडक दिली. प्रश्नांची सरबत्ती आणि नियमांची आठवण करून देत त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना चांगलाच घाम फोडला. एमआयडीसीतील भूखंड विक्री करताना वर्तमानपत्रात जाहिरात का दिली नाही? ट्रक टर्मिनलची गरज नाही असे कोणत्या अधिकाऱ्याने लिहून दिले? यासाठी सर्वेक्षण का केली नाही? अशा एक न अनेक प्रश्न करत इम्तियाज जलील यांनी एमआयडीसीच्या अधिकाऱ्यांना तुम्हालाही जेलची हवा खावी लागेल, असा इशारा दिला.

Sanjay Shirsat-Imtiaz Jaleel News
Imtiaz Jaleel On Sharad Pawar : आघाड्यांमध्ये गुंतलेल्या पवारांच्या सद्यस्थितीला भाजप जबाबदार; इम्तियाज जलीलांनी टायमिंग साधलं

या भूखंडाची खरेदी प्रक्रिया रद्द करा, या जागेवर ठरल्याप्रमाणे ट्रक टर्मिनलच झाले पाहिजे, अशी मागणी त्यांनी केली. जर तिथे ट्रक टर्मिनल करायचा नसेल तर या भूखंडाची नव्याने विक्री प्रक्रिया राबवा, अशी मागणी ही इम्तियाज जलील यांनी केली. कुठल्याही परिस्थितीत नियम डावलून केवळ मंत्र्यांना हा भूखंड विक्री करता यावा यासाठी अधिकारी काम करणार असतील तर आम्ही त्यांनाही सोडणार नाही. या भूखंड खरेदी विक्रीची प्रक्रिया रद्द केली नाही तर या विरोधात आम्ही कोर्टात आणि ईडीकडेही जाऊ, असा इशारा देत इम्तियाज झालेली यांनी आक्रमक पवित्रा घेतला.

Sanjay Shirsat-Imtiaz Jaleel News
Sanjay Shirsat : संजय शिरसाट यांचे ग्रहमान अजूनही फिरलेलेच! आता कोट्यावधींच्या घोटाळ्याचा नवा आरोप, तिसऱ्या प्रकरणाने मेटाकुटीला

या प्रकरणावर मंत्री संजय शिरसाट यांनी भाष्य करण्यासाठी आठ दिवसांचा अवधी मागीतला आहे. या काळामध्ये भूखंड खरेदी- विक्री प्रकरणातील कागदपत्रांमध्ये फेरफार करण्याची शक्यता आहे. त्याला एमआयडीसीतील कुठल्याही अधिकाऱ्याने मदत करू नये, अन्यथा आम्ही त्यांनाही सोडणार नाही, असा दम इम्तियाज जलील यांनी यावेळी भरला. एकूणच मंत्री संजय शिरसाट यांच्या एमआयडीसीतील भूखंड खरेदी प्रकरणाने पुन्हा एकदा त्यांच्या अडचणीत वाढ झाली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com