Ambadas Danve : गोपीनाथ मुंडेंनी गँग संपवल्या होत्या, फडणवीसांच्या काळात गोळीबारांची मालिका! टायगर श्रॉफ प्रकरणावरून रणकंदन

Tiger Shroff attack News: टायगर श्रॉफ गोळीबार प्रकरणावरून अंबादास दानवे यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली. गोपीनाथ मुंडे आणि फडणवीस यांच्या कार्यकाळाची तुलना करत त्यांनी राज्यातील कायदा आणि सुव्यवस्थेवर प्रश्न उपस्थित केले.
Ambadas Danve
Devendra Fadnavis,Sarkarnama
Published on: 
Updated on: 

Tiger Shroff Attack News: अभिनेता टायगर श्रॉफ यांच्या गाडीवर जुहू येथे गोळीबार झाल्याच्या घटनेनंतर राज्यातील कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न पुन्हा चर्चेत आला आहे. या प्रकरणावरून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते आणि आमदार अंबादास दानवे यांनी मुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला. दानवे यांनी माजी गृहमंत्री गोपीनाथ मुंडे यांच्या कार्यकाळाचा संदर्भ देत फडणवीस यांच्यावर टीका केली आहे.

अभिनेता टायगर श्राॅफ यांच्यावर जुहूमध्ये जीवघेणा हल्ला झाला. मोटारसाकलवरून आलेल्या तीन हल्लेखोरांनी टायगर श्राॅफच्या गाडीवर अंदाधूंद फायरिंग करत सात गोळ्या झाडल्या. या हल्ल्यात टायगर किरकोळ जखमी झाले असले तरी त्यांचा चालक गंभीर आहे. काही महिन्यापूर्वी सलमान खानच्या घरावर गोळी झाडण्यात आली होती. त्यानंतर टायगर श्राॅफ याच्यावर झालेल्या फायरिंगने पुन्हा एकदा राज्यातील कायदा व सुव्यवस्था आणि व्हिआयपीच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

राज्याचे मुख्यमंत्री असलेल्या देवेंद्र फडणवीस यांच्याकडे गृहखात्याचा कारभार देखील आहे. विरोधक वेळोवेळी राज्याला पूर्णवेळ गृहमंत्री असावा, अशी मागणी करत फडणवीस यांच्यावर टीकेची झोड उठवतात. आता टायगर श्राॅफ यांच्यावरील गोळीबाराच्या घटनेने पुन्हा एकदा देवेंद्र फडणवीस हे विरोधकांच्या निशाण्यावर आले आहेत. टायगर श्राॅफ यांच्यावर झालेल्या गोळीबाराचा दाखला देत अंबादास दानवे यांनी थेट १९९५-९९ दरम्यानच्या राज्यातील शिवसेना भाजप युतीमध्ये गृहमंत्री राहिलेल्या गोपीनाथ मुंडे आणि आताच्या महायुती सरकारचे मुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यकाळाची तुलना केली आहे.

Ambadas Danve
Tiger Shroff Firing : हे इंटेलिजन्स फेल्युअर! टायगर श्रॉफवरील गोळीबारानंतर महायुतीच्या आमदाराचा महाराष्ट्राच्या गृह मंत्रालयावर ठपका

ही तुलना करत असताना दानवे यांनी बाबा सिद्दीकी, प्रदीप पुर्णेकर, अभिषेक घोसाळकर,सलमान खानचे घर आणि आता टायगर श्राॅफ यांच्यावर झालेल्या गोळीबार घटनांची यादी सोशल मिडियावर टाकली आहे.

​“ज्या नेत्याने तत्कालीन गृहमंत्री गोपीनाथ मुंडे यांनी मुंबईतील गँग संपवल्या, त्याच नेत्याचा शिष्य म्हणवून घेणारी व्यक्ती आज राज्याची गृहमंत्री आहे. पण फरक अगदी स्पष्ट आहे... फक्त कोणी काही बोलायचे नाही. जगातील सर्वात मोठ्या पक्षाचे कार्यकर्ते मात्र त्यांना अजूनही ‘कार्यक्षम’ म्हणतात,” अशा शब्दांत दानवे यांनी फडणवीस यांच्यावर टीका केली.

Ambadas Danve
Tiger Shroff firing case : टायगर श्रॉफ गोळीबार प्रकरणात मोठी अपडेट : पोलिसांची मोठी कारवाई, सुरत एक्सप्रेसमधून 2 आरोपींच्या आवळल्या मुसक्या

अंबादास दानवे यांच्याबरोबरच विविध नेत्यांनी या घटनेवर चिंता व्यक्त केली आहे. या गोळीबारीच्या घटनेनंतर राज्यातील कायदा-सुव्यवस्था आणि गृहखात्याच्या कामकाजावरून राजकीय वादाला पुन्हा तोंड फुटले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com