Tiger Shroff Firing Latest Update : टायगर श्रॉफ गोळीबार प्रकरणात मोठी अपडेट : पोलिसांची मोठी कारवाई, सुरत एक्सप्रेसमधून 3 आरोपींच्या आवळल्या मुसक्या

Tiger Shroff firing case latest update : टायगर श्रॉफ गोळीबार प्रकरणात पोलिसांची मोठी कारवाई. सुरत एक्सप्रेसमधून 3 आरोपींना अटक केल्याची माहिती समोर आली आहे. प्रकरणातील ताज्या अपडेट्स जाणून घ्या.
Tiger Shroff Firing Latest Update : टायगर श्रॉफ गोळीबार प्रकरणात मोठी अपडेट : पोलिसांची मोठी कारवाई, सुरत एक्सप्रेसमधून 3 आरोपींच्या आवळल्या मुसक्या
Published on: 
Updated on: 

बॉलिवूड अभिनेता टायगर श्रॉफच्या कारवर झालेल्या गोळीबार प्रकरणात तपासाला महत्त्वाचे वळण मिळाले आहे. या प्रकरणातील संशयित आरोपींना राजस्थानमधील कोटा येथे रेल्वेतून ताब्यात घेण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. सुरत एक्सप्रेसमधून आरोपींना पकडण्यात आल्याने मुंबईतील गोळीबार प्रकरणाच्या तपासाला वेग येण्याची शक्यता आहे.

गोळीबाराची घटना घडल्यानंतर आरोपींनी दुचाकीवरून घटनास्थळावरून पळ काढला होता. त्यानंतर अंधेरी परिसरात दुचाकी सोडून त्यांनी रेल्वेने पलायन केल्याचे सांगितले जात आहे. या आरोपींचा शोध घेत असताना राजस्थानमधील कोटा रेल्वे स्थानक परिसरात पोलिसांनी कारवाई केली.

Tiger Shroff Firing Latest Update : टायगर श्रॉफ गोळीबार प्रकरणात मोठी अपडेट : पोलिसांची मोठी कारवाई, सुरत एक्सप्रेसमधून 3 आरोपींच्या आवळल्या मुसक्या
Tiger Shroff firing : 'भ्याडांना सोडणार नाही, धागेदोरे सापडले...' : टायगर श्रॉफ गोळीबार प्रकरणात CM फडणवीसांचा इशारा

सुरुवातीला या प्रकरणात 2 संशयितांना ताब्यात घेतल्याची माहिती समोर आली होती. मात्र, कोटा शहर पोलिसांनी या प्रकरणात एकूण 3 आरोपींना रेल्वेतून पकडल्याची माहिती दिली आहे. त्यापैकी 2 आरोपी हरियाणातील, तर 1 आरोपी बिहारमधील असल्याचे सांगण्यात आले आहे.

कोटा शहराच्या पोलीस अधीक्षक तेजस्विनी गौतम यांनी एएनआयला दिलेल्या माहितीनुसार, पोलिसांच्या पथकाने रेल्वेतून आरोपींना ताब्यात घेतले. या कारवाईमुळे टायगर श्रॉफ गोळीबार प्रकरणातील तपासात महत्त्वाची प्रगती झाल्याचे मानले जात आहे. तसेच, आरोपींची नेमकी भूमिका आणि गोळीबारामागील कारण याबाबत तपासातील अधिकृत तपशील समोर येणे बाकी आहे.

दरम्यान, टायगर श्रॉफच्या कारवर झालेल्या गोळीबार प्रकरणाचा तपास मुंबई क्राईम ब्रँचकडे सोपवण्यात आला आहे. यापूर्वी जुहू पोलीस ठाण्यात या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पुढील तपास गुन्हे शाखेकडून केला जात आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com