Amit Deshmukh : देशात लोकशाही नावापुरतीच, विद्यार्थ्यांना देशद्रोही म्हणणे ही शोकांतिका; अमित देशमुख सरकारवर बरसले!

Political News : सत्ताधाऱ्यांची वागणूक पाहिली तर भारतात आता लोकशाही नावापुरतीच राहिली आहे, असे दिसते, अशी टीका आमदार अमित देशमुख यांनी केंद्र सरकारवर केली.
Amit Deshmukh
Amit DeshmukhSarkarnama
Published on
Updated on

Congress news : जनतेच्या, विद्यार्थ्यांच्या, प्रश्नांना उत्तरे देण्याऐवजी भाजप आणि सत्ताधारी पक्षाचे कार्यकर्ते देशभरात काँग्रेस पक्षाच्या कार्यालयांना घेराव घालत आहेत. त्यांची ही कृती हुकूमशाही वृत्तीची आहे. एकुणच सत्ताधाऱ्यांची वागणूक पाहिली तर भारतात आता लोकशाही नावापुरतीच राहिली आहे, असे दिसते, अशी टीका आमदार अमित देशमुख यांनी केंद्र सरकारवर केली.

काँग्रेस भवन येथे पक्षाची बैठक झाल्यानंतर देशमुख हे पत्रकारांशी बोलत होते. नवी दिल्ली येथील जंतर मंतरवर विद्यार्थी हक्कासाठी लढत आहेत. त्यांचे प्रश्न समजून घेणे, ते सोडवणे महत्वाचे आहे. पण त्याऐवजी त्यांना अमानुष मारहाण केली जात आहे. हा सर्व प्रकार देश पाहत आहे. या घटनेचा निषेध केवळ देशातच नव्हे; तर जगभरात होत आहे.

विद्यार्थ्यांवरील अत्याचार लपुन राहिलेला नाही. याची उत्तरे सरकारला द्यावीच लागतील. देशातील शिक्षण व्यवस्था टिकावी म्हणून शांततेच्या मार्गाने विद्यार्थी आपल्या मागण्या मांडत आहेत. या निष्पाप विद्यार्थ्यांचे प्रश्न सोडवण्याऐवजी त्यांना दहशतवादी संबोधले जात आहे. न्यायासाठी लढणाऱ्यांना सरकार देशद्रोही म्हणत असेल तर ही मोठी शोकांतिका आहे.

Amit Deshmukh
CJP Protest: एकेकाळी मोदी-शहांचा कट्टर समर्थक राहिलेला नेता आला समोर, 'सीजेपी'च्या पेटलेल्या आंदोलनात घेतली उडी,भाजप सरकारला झाप झाप झापलं

आज महाराष्ट्रात अनेक भागात दुष्काळाची परिस्थिती आहे. बऱ्याच भागात पेरणी झालेली नाही. जेथे पेरणी झाली तिथे बियाणे उगवलेली नाही. शेतकरी आतमहत्याचे सत्र अजूनही थांबलेले नाही. अशा अनंत अडचणी समोर उभ्या आहेत.

सामान्य जनतेचे हे प्रश्न सोडवण्याऐवजी सत्ताधारी मंडळी काँग्रेस विरोधात प्रति आंदोलन करण्याचे आदेश देत आहेत. विरोधकांचा आवाज दाबण्याचा हा प्रयत्न म्हणजे देशातील लोकशाही व्यवस्था मोडीत काढण्याचाच प्रकार आहे, असा आरोप देशमुख यांनी केला.

Amit Deshmukh
Abhijit Dipke : पेपर फुटीप्रकरणी काँक्रोच जनता पार्टीचे अभिजीत दिपकेंचे पहिल्यादांच घरच्या अंगणात आंदोलन!

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com