Latur District : अमित देशमुखांच्या प्रयत्नांना यश : लातूरच्या उद्योग क्षेत्राला बूस्ट; दोन बड्या प्रकल्पासाठी भूसंपादन सुरू

Latur MIDC Ashtamod Project : लातूर-नांदेड महामार्गावरील आष्टामोड येथे एमआयडीसी व ऑटो इंडस्ट्रीसाठी भूसंपादन सुरू झाले आहे. या निर्णयामुळे लातूरच्या औद्योगिक विकासाला चालना मिळून रोजगाराच्या नव्या संधी निर्माण होणार आहेत.
Amit Deshmukh highlights land acquisition progress for Ashtamod MIDC industrial area aimed at strengthening Latur’s auto industry and regional economic growth.
Amit Deshmukh highlights land acquisition progress for Ashtamod MIDC industrial area aimed at strengthening Latur’s auto industry and regional economic growth.sarkarnama
Published on
Updated on

Assembly Session 2025 : लातूरच्या औद्योगिक विकासाला मोठा बुस्ट मिळण्याच्या दृष्टीने राज्य सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. लातूर-नांदेड महामार्गावरील आष्टामोड परिसरातील औद्योगिक वसाहत आणि ऑटो इंडस्ट्रीसाठी भू संपादनाची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. लातूरचे काँग्रेस आमदार अमित देशमुख यांनी या संदर्भात सविस्तर माहिती दिली आहे.

महाराष्ट्र शासनाकडे सातत्यपूर्ण पाठपुरावा केल्यानंतर अखेर लातूर - नांदेड महामार्गावर आष्टामोड परिसरात औद्योगिक वसाहत व ऑटो इंडस्ट्री उभारणीसाठी जागा संपदानाची प्रक्रिया सुरू केली आहे. लातूर शहर आणि जिल्ह्याच्या विकासाच्या दृष्टीने ही बाब अत्यंत महत्वपूर्ण आणि समाधानाची असल्याचे देशमुख यांनी म्हटले आहे.

उद्योग, कृषी उत्पादनाच्या व्यापाराबरोबर शिक्षण, आणि आरोग्य सेवेचे केंद्र म्हणूनही विकसित होत असलेल्या लातूर शहर व जिल्ह्यात, मालवाहतुकीच्या ट्रक्स व इतर वाहनांची वर्दळ मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे. या वाहनांची निर्मिती, खरेदी, देखभाल, दुरुस्ती व पार्किंगची व्यवस्था व्हावी, संबंधित स्पेअरपार्टस् निर्मितीचे पूरक उद्योग उभारले जावेत यासाठी, लातूर-नांदेड रस्त्यावरील आष्टामोड परिसरात औद्योगिक वसाहत निर्माण करून, तेथे स्वतंत्र ऑटो इंडस्ट्रीज निर्माण करावी, अशी मागणी अनेक वर्षापासून राज्य शासनाकडे लावून धरलेली आहे.

राज्याचे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री, तसेच उद्योग मंत्री उदय सामंत, जिल्ह्याचे पालकमंत्री, शिवेंद्रसिंह राजेभोसले, आणि सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांच्याकडे पाठपुरावा करण्यात येत आहे. यासंदर्भात काही महिन्यापूर्वी उद्योग मंत्री उदय सामंत यांनी माझ्यासह उद्योग विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत मंत्रालयात व्यापक बैठक घेऊन चर्चाही केली होती. यावेळी त्यांनी या औद्योगिक वसाहती संदर्भात सकारात्मक निर्णय घेण्याचे आश्वासन दिले होते.

Amit Deshmukh highlights land acquisition progress for Ashtamod MIDC industrial area aimed at strengthening Latur’s auto industry and regional economic growth.
Rajyasabha Election : पंकजा मुंडेंना पर्याय तयार करण्याचा भाजपाचा डाव फसला; संधी मिळालेले भागवत कराड अन् रमेश कराड ठरले फेल!

त्या बैठकीत घेतलेल्या निर्णयानुसार महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाकडून चाकूर तालुक्यातील आष्टामोड नजीक नांदगाव शिवारात 260.83 हेक्टर क्षेत्रावर pass through पद्धतीने औद्योगिक क्षेत्र स्थापन करण्यासाठी उद्योजकांकडून प्रस्ताव मागवण्याची जाहिरात आता प्रसिद्ध केली असल्याचे अमित देशमुख यांनी सांगतिले. या सकारात्मक प्रतिसादाबद्दल महाराष्ट्र शासन आणि संबंधित सर्व मंत्री महोदयांचे त्यांनी मनःपूर्वक आभारही मानले आहेत.

Amit Deshmukh highlights land acquisition progress for Ashtamod MIDC industrial area aimed at strengthening Latur’s auto industry and regional economic growth.
Amit Deshmukh News : "आतापर्यंत शांत होतो, पण..." : निवडणूक काळातील 'त्या' धक्कादायक घटनेवर अमित देशमुखांनी अखेर सोडले मौन!

लातूर शहर व जिल्ह्यात असंख्य तरुण उद्योजक नव्या संकल्पना घेऊन उद्योग उभारणीच्या तयारीत आहेत, या सर्व कल्पक नवतरुण उद्योजकांनी महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या जाहिरातीला प्रतिसाद देऊन नियोजित वेळेत जास्तीत जास्त प्रस्ताव दाखल करावेत असे आवाहन मी करीत असल्याचे देशमुख यांनी सांगितले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com