Amit Deshmukh News : "आतापर्यंत शांत होतो, पण..." : निवडणूक काळातील 'त्या' धक्कादायक घटनेवर अमित देशमुखांनी अखेर सोडले मौन!

Congress leader Amit Deshmukh on election row : निवडणूक काळात घडलेल्या धक्कादायक घटनेवर अखेर अमित देशमुख यांनी मौन सोडले. त्यांच्या संपूर्ण प्रतिक्रियेची सविस्तर माहिती वाचा.
Congress leader Amit Deshmukh
Congress leader Amit Deshmukh Sarkarnama
Published on
Updated on

Latur Politics News : लातूर जिल्हा परिषद निवडणुकीच्या प्रचारा दरम्यान, शहरात घडलेल्या एका प्रकाराचे जिल्ह्याच्या राजकारणात मोठे भांडवल केले गेले. काँग्रेसचे नेते आमदार अमित देशमुख यांनी चाकू हल्ल्याच जखमी झालेल्या तरुणाला वाऱ्यावर सोडून दिले आणि त्याचा मृत्यू झाला, अशा प्रकारची टीका आणि निवडणुकीत त्याचा राजकीय लाभ उठवण्याचा प्रयत्न झाल्याचा आरोप अमित देशमुख यांनी केला. जिल्हा परिषद निवडणुकीचा निकाल झाल्यानंतर आता अमित देशमुख यांनी त्या घटनेची वस्तुस्थिती सांगण्याचा प्रयत्न केला.

या घटनेवेळी नेमकं काय घडलं? त्याचा कसा विपर्यास केला गेला, विरोधकांनी शहानिशा न करत निवडणुकीत त्याचे कसे भांडवल केले? या सगळ्यावर अमित देशमुख यांनी सोशल मिडियाच्या माध्यमातून सविस्तर स्पष्टीकरण देणारी पोस्ट टाकली आहे. लातूर जिल्ह्यात प्रचाराचा स्तर लातूरच्या परंपरेला, संस्कृतीला शोभणारा राहील याची जाणीवपूर्वक आम्ही काळजी घेतली. काँग्रेस व इतर सर्व पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनीही तशी काळजी घेतली. काही ठराविक मंडळींनी मात्र या निवडणुकीत एका संवेदनशील घटनेचा राजकारणासाठी वापर करून लातूरच्या संस्कृतीला धक्का देण्याचा अपवाद घडवल्याचे दिसून आले आहे.

Congress leader Amit Deshmukh
Congress Leader : धक्कादायक! राज्याचे माजी मंत्री वादाच्या भोवऱ्यात; काँग्रेसच्या ‘या’ दिग्गज नेत्याविरुद्ध अटक वॉरंट जारी झाल्याने खळबळ

वस्तुस्थितीची माहीती न घेता अर्धवट माहितीच्या आधारे किंवा जाणीवपूर्वक माझ्या संवेदनशीलते बाबत प्रश्न उपस्थित केले गेले. मी तात्काळ त्या बाबतीत खुलासा केला असता किंवा वस्तुस्थिती सांगण्याचा प्रयत्न केला असता परंतु पुन्हा त्यात खुलासे प्रतिखुलासे होत राहिले असते आणि त्या दु:खद घटनेचे राजकारण वाढतच राहीले असते. यातून मग त्यांच्यात आणि माझ्यात काहीच फरक राहीला नसता, ही घटना पाहील्यानंतर त्या क्षणी मी काय केले आणि नंतर काय पाठपुरावा केला? हे सांगितले असते तर दु:खद प्रसंगात केलेल्या मदतीचा मी राजकीय लाभ उठवतो आहे, असेही दिसले असते, असे अमित देशमुख यांनी म्हटले आहे.

जिल्हा परीषद आणि पंचायत समितीच्या निवडणुक काळात चित्रफितीची मोडतोड करुन समाजमाध्यमातून जी घटना दाखवली गेली आणि काही राजकीय मंडळीनी राजकीय फायदा उठवण्यासाठी त्या घटनेची चर्चा रंगवली. त्यातील वस्तुस्थिती अशी आहे की, 1 फेब्रुवारी रोजी सांयकाळची महापूर येथील सभा आणि त्यानंतर जनतेच्या गाठीभेटी आटोपून रात्री उशिराने लातूर शहरातून बाभळगावकडे जात होतो. नांदेड रोडवरील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकातून जात असताना रस्त्याच्या दुसऱ्या बाजुला मारहानीची घटना घडत असल्याचे निर्दशनास आले.

मी ताबडतोब गाडी थांबवण्यास सांगून खाली उतरलो, सहकाऱ्यांसह रस्त्याच्या दुसऱ्या बाजूला गेलो. तो पर्यंत मारहाण करणारा हल्लेखोर पळून गेला होता तर एक तरुण रक्ताच्या थारोळयात खाली पडलेला होता. हल्लेखोर पळून जाताचं जखमी युवकाचे मित्र पुढे आले, त्यांनी त्यास मोटारसायकल वरुन रुग्णालयात नेण्याचे प्रयत्न सुरू केले. परंतु ते अशक्य वाटत असल्यामुळे तेथे शेजारी उभ्या असलेल्या ऑटोरिक्षामध्ये जखमी युवकाला बसवून रुग्णालयात घेऊन गेले, असे चित्र दिसले गेले.

नेमक्या त्यावेळी घटनास्थळावरील परिस्थिती काय होती माहिती नसलेल्या, राजकीय नेत्यांनी समाज माध्यमावर कार्यरत असलेल्या मंडळींनी जखमी युवकाला रुग्णालयात पाठवण्यासाठी मी माझी गाडी का दिली नाही? असे प्रश्न नंतर उपस्थित केले आहेत. वास्तविक पाहता तेथे माझीचं काय इतर कुणाचीही गाडी तातडीने बोलावण्यासारखी परिस्थिती नव्हती, गाडी बोलवायचीच ठरवलीही असती तरी, जमलेल्या गर्दीतून गाडी पुढे जाऊन यू टर्न घेऊन येईपर्यंत बराच वेळ लागण्यासारखी परिस्थिती होती.

Congress leader Amit Deshmukh
Comscore Ranking 2026 : डिजिटल माध्यमात 'ई-सकाळ'चा डंका! दिग्गज न्यूज प्लॅटफॉर्म्सना मागे टाकत पटकावले अव्वल स्थान

घरी जाईपर्यंत काळजी घेत होतो..

जखमी युवकाचे मित्र आणि आम्ही थोडाही वेळ दवडायच्या मानसिकतेमध्ये नव्हतो. त्यामुळे उपलब्ध परिस्थितीत तातडीने निर्णय घेऊन त्या जखमी युवकाला रुग्णालयात घेऊन जाण्याचे प्रयत्न तिथे चालू होते आणि तेचं जखमी युवकाच्या मित्रांनी केले. तिथे जे लोक उपस्थित होते त्यांना या वस्तुस्थितीची नक्की जाणीव आहे.

घटनास्थळी थांबल्यानंतर मलाही त्या क्षणाला जे जे सुचले आणि त्यावेळी योग्य वाटले ते ते सर्वकांही केले, जखमी युवकाला घेऊन ऑटो रुग्णालयाकडे निघाल्याबरोबर मी तातडीने विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयांच्या अधिष्ठातांना व इतर डॉक्टरांना फोन केले.

त्यामुळे जखमी युवक रुग्णालयात पोहोचण्यापुर्वीच तेथे आपतकालीन परिस्थिती हाताळणारी डॉक्टर व त्यांच्या सहकाऱ्यांची टीम तयार होती. जखमी युवक हॉस्पिटलमध्ये पोहोचल्याबरोबर काही क्षणात त्याच्यावर उपचार सुरू झाले. घटनास्थळावरून मी संबंधित पोलीस स्टेशनलाही फोन करुन पोलीसांना घटनास्थळी ताबडतोब पोहचण्यास सांगीतले. योग्य पध्दतीने पंचनामा करुन गुन्हेगारांना शोधण्याच्या सुचनाही दिल्या. जखमीवर उपचार सुरू होईपर्यंत आणि पोलीस घटनास्थळी पोहोचेपर्यंत मी तेथेच उपस्थित होतो, हे तिथे जमा झालेल्या सर्वांना माहीत आहे. नंतर बाभळगावला जाईपर्यंत इतर खाजगी डॉक्टरांना फोन करून या रुग्णाला योग्य उपचार मिळण्याच्या दृष्टीने विनंती केली.

अनेकवेळा माझ्या गाडीतूनच जखमींना रुग्णालयात पाठवून ती व्यक्ती दुरूस्त होईपर्यंत सातत्याने संपर्कात राहीलो आहे. खरे तर भविष्यात अशा प्रकारच्या घटना घडूच नयेत, कोणावरही अशी दुर्दैवी वेळ येवू नये ही माझी भावना आहे. परंतु अपवादाने कुठे आपत्तीची घटना घडल्याचे समजले तर त्याच क्षणी मदतीला धावून जाण्याची कृती माझ्याकडून होणार हे निश्चित आहे, आणि हेच मा‍झ्या परिवाराचे संस्कार आहेत.

अपघात किंवा आपत्तिच्या घटनामध्ये इतर लोक मदतीला धावून येत नाहीत अशी चर्चा असते. इच्छा असूनही काही लोक मदत करीत नाहीत त्यामागचे कारण जाणून घेतल्या नंतर असे लक्षात आलेले आहे की, काही प्रवृत्ती मदत करणाऱ्यांनाच प्रश्न विचारतात, त्यांनाच आरोपीच्या पिंजऱ्यात उभे करतात.

लातूरमध्ये या घटनेच्या चित्रफीतीची मोडतोड करून व्हिडीओ संपादित केले गेले आणि वस्तुस्थितीला धरून नसलेले हे व्हिडीओ काही मंडळीनी समाजमाध्यमावरुन प्रसिध्दही केले आहेत. खरे तर अशा समाजविघातक मंडळीवर कारवाई होणे आवश्यक आहे. किमान या घटनेत तरी ती कारवाई नक्कीच व्हावी ही माझी अपेक्षा आहे. या एकुण प्रकरणातील क्लेशदायक बाब म्हणजे काही राजकीय मंडळींनी अर्धवट माहितीच्या आधारे प्रचारसभामधून काही प्रश्न उपस्थित केले. माझ्या प्रमाणिक प्रयत्नांबद्दल शंका निर्माण करून राजकीय लाभ मिळवण्याचा प्रयत्न केला, अशी खंतही अमित देशमुख यांनी व्यक्त केली.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com