Ashok Chavan On Maratha Reservation : `शासन आपल्या दारी`, साठी मराठा आरक्षणाचे आंदोलन दडपण्याचा प्रयत्न..

Congress News : आंदोलनाला हिंसक वळण देऊन आंदोलनाला बदनाम करण्याचा काही मंडळींचा प्रयत्न सुरू आहे.
Ashok Chavan Maratha Reservation News
Ashok Chavan Maratha Reservation News Sarkarnama
Published on
Updated on

Marathwada Political News : अंतरवाली सराटी येथील मराठा आरक्षण उपोषणकर्त्या आंदोलकांवर पोलिसांकडून झालेल्या लाठीहल्ल्यावरून आता राजकारण सुरू झाले आहे. सत्ताधारी आणि विरोधक अशा दोन्ही बाजूंनी आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झडू लागल्या आहेत. (Maratha Reservation) काॅंग्रेसचे नेते माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी `शासन आपल्या दारी`, या कार्यक्रमावर परिणाम होऊ नये, म्हणून मराठा आरक्षणाचे आंदोलन दडपण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप केला आहे.

Ashok Chavan Maratha Reservation News
Mp Imtiaz Jaleel On Maratha Reservation : मराठ्यांच्या संघर्षाला आमचा पाठिंबा, एमआयएमने घेतली भूमिका..

येत्या ८ सप्टेंबरला राज्य सरकारचा 'शासन आपल्या दारी' हा कार्यक्रम जालना जिल्ह्यात नियोजित आहे. (Ashok Chavan) सराटी अंतरवाली येथील मराठा आरक्षणाच्या आंदोलनाचा आपल्या कार्यक्रमावर विपरित परिणाम होऊ नये, यासाठी हे आंदोलन दडपण्याचा प्रयत्न झाला आहे. (Maratha Reservation) मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी सराटी अंतरवाली, ता. अंबड, जि. जालना येथे गावाच्या आत मनोज जरांगे पाटील यांचे अतिशय शांततेत आंदोलन सुरू होते.

तरीही पोलिसांनी आंदोलकांवर बेछूट लाठीमार केला, अश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या आणि रबरी बुलेट्स देखील डागल्या. कालच्या घटनेतून मराठा आरक्षण आंदोलनाला बदनाम करण्याचा प्रयत्न झाला आहे. (Congress) आंदोलकांनी काही तरी केले म्हणून लाठीमार झाला, अशी भूमिका राज्य सरकार घेते आहे. या आंदोलनाला हिंसक वळण देऊन आंदोलनाला बदनाम करण्याचा काही मंडळींचा प्रयत्न सुरू आहे, असा आरोपही चव्हाण यांनी केला.

मराठा आरक्षण प्रकरणी राज्य सरकारने समाजाचा अंत पाहू नये. या गंभीर प्रश्नावर केवळ वेळकाढूपणा होत असल्याने समाज संतप्त आहे. बळाचा वापर करून हे आंदोलन चिरडता येणार नाही. त्याऐवजी मराठा आरक्षण कसे देणार, याबाबत राज्य सरकारने स्पष्ट भूमिका जाहीर करावी आणि ठोस पावले उचलावीत. नेमके हेच केले जात नसल्याने मराठा समाजातील आक्रोश तीव्र होतो आहे, असेही चव्हाण म्हणाले.

Edited By : Jagdish Pansare

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com