Maharashtra Politics: अंधारेंचे भाजपला आव्हान; भाजपने 'या' शहराचं नामांतर 'सावरकरनगर' करुन दाखवावं

राज्यात भाजप आणि शिवसेना सावरकर गौरव यात्रा काढण्यात येत आहे
Sushma Andhare
Sushma Andhare Sarkarnama
Published on: 
Updated on: 

काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधींनी स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल केलेल्या वक्तव्याच्या निषेधार्थ राज्यात भाजप आणि शिवसेना सावरकर गौरव यात्रा काढण्यात येत आहे. मुंबईतील दादर, अंधेरी, वांद्रे आणि ठाण्यात यात्रेला सुरुवात झाली. सावरकरांच्या सन्मानार्थ भाजप आणि शिंदे गट गटांनी मिळून राज्यात स्वातंत्र्यवीर सावरकर गौरव यात्रा सुरू केली आहे.

यावर ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी टिकास्त्र डागलं आहे. ती सावरकर गौरव यात्रा नाहीये ती अदानी बचाव यात्रा आहे. ज्यांना अदानींवर कोणी प्रश्न विचारेल अशी भिती वाटते, त्यांनी जाणीवपूर्वक सावरकर गौरव यात्रा काढली आहे. भाजपचा मनात खरचं सावकराविषयी प्रेम असेल तर नाशिकच्या भगूर गावात काय अवस्था झाली आहे. तिथे काय परिस्थिती आहे. तिथे त्यांचं स्मारक का उभं राहिलं नाही, असा सवाल सुषमा अंधारे यांनी उपस्थित केला आहे. भाजपचे जर खरंच सावरकरांवर प्रेम असेल तर भाजपने सर्वात आधी अहमदाबादचं नामांतर सावरकरनगर करुन दाखवावं, मग आम्ही त्यांना मानू... असा शब्दांत भाजप वर निशाणा साधला आहे.

Sushma Andhare
Jayant Patil News : पुणे लोकसभा पोटनिवडणुकीबाबत राष्ट्रवादीच्या जयंत पाटलांचं सूचक वक्तव्य; म्हणाले...

किमान समान कार्यक्रमाच्या आधारावर काँग्रेस, शिवसेना (ठाकरे गट) आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांनी मिळून महाविकास आघाडीची स्थापना केली होती. हा किमान समान कार्यक्रम सैंविधानिक लोकशाहीची गुज राखणे, आणि ही चौकट जपली गेली पाहिजे अन्यथा भाजप आणि त्यांच्या स्वायत्त यंत्रणांचा वाढता गैरवापर या सर्वांतून लोकशाही उद्धवस्त होण्याची भिती आहे. जर आता विचार केला नाही, आता एकत्र आलो नाही तर २०२४ ची निवडणूक ही शेवटची निवडणूक असेल की काय, अशी आम्हाला शंका वाटतेय.

देशात आजघडीला जेएनयु पासून प्रत्येक विद्यापीठात शाहु,फुले, आंबेडकर यांच्या सारख्या स्वातंत्र्याच्या लढ्यात आणि महाराष्ट्राच्य उभारणीत आपलं योगदान दिलंय, त्या महाराष्ट्राच्या सगळ्या सुपुत्रांची या विद्यापिठांम अद्यासने उभी आहेत, मग भाजपने आतापर्यंत सावरकरांचं अद्यासन उभं केलं का भाजपने,असाही प्रश्न सुषमा अंधारे यांनी उपस्थित केला आहे.

दुसरा मुद्दा, भाजपने सरदार वल्लभाई पटेल यांचा पुतळा उभारला. पाहायला गेलं तर वल्लभभाई पटेल हे काँग्रेसचे नेते होते. मग भाजपने सावरकरांचा पुतळा का उभारला नाही. भाजपचे सावरकरांवर एवढं प्रेम असेल तर भाजपने अजून त्यांना भारतरत्न पुरस्कार का दिला नाही, असेही प्रश्न अंधारेंनी भाजपला केले आहेत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.