

Pune News : पुण्याचे भाजप खासदार गिरीश बापट यांचं नुकतंच निधन झालं आहे. बापट यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या लोकसभा पोटनिवडणुकीविषयी चर्चा जोर धरु लागल्या आहेत. याचवेळी काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी काँग्रेस पुणे लोकसभा पोटनिवडणूक लढविणारच असल्याचं विधान केलं होतं. यावरुन अजित पवारांनी चांगलेच संतापले होते. आता पुणे लोकसभा पोटनिवडणुकीबाबत राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी सूचक वक्तव्य केलं आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील(Jayant Patil) यांनी रविवारी(दि.२) बापट यांच्या निवासस्थानी भेट देऊन कुटुंबियांचं सांत्वन केलं. यानंतर माध्यमांशी संवाद साधताना त्यांनी पुणे लोकसभा पोटनिवडणुकीवर भाष्य केलं.
पाटील म्हणाले, बापट साहेबांचं नुकतंच निधन झालं आहे. पुणे लोकसभा पोटनिवडणुकीसंदर्भात आम्ही अद्याप विचार केला नाही. आम्हाला त्यांच्याबद्दल आदर आहे. आमचे नेते शरद पवार यांनी देखील त्यादिवशी सर्व कार्यक्रम रद्द केले आणि ते गिरीश बापट यांच्या अंत्यदर्शनासाठी आले होते. आम्ही अजून पुणे लोकसभा निवडणुकीबाबत चर्चा केलेली नाही.
याचवेळी त्यांनी खासदार गिरीश बापट यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या लोकसभा पोटनिवडणुकीबाबत आम्ही अद्याप विचार केलेला नाही. तसेच पक्षामध्ये देखील त्या दृष्टीने चर्चाही केलेली नाही अशी प्रतिक्रिया जयंत पाटील यांनी दिलेली आहे.
माणसुकी वगैरे प्रकार आहे की नाही?
अजित पवार यांनी वडेट्टीवार यांना खडेबोल सुनावताना लगेच कुणी गुडघ्याला बाशिंग बांधायची गरज नाही. अजून गिरीश बापट जाऊन फक्त तिसरा दिवस आहे. एवढी कसली घाई आहे? माणसुकी वगैरे प्रकार आहे की नाही? काही परंपरा महाराष्ट्राची आहे की नाही. लोक काय म्हणतील यांना जनाची नाही तर मनाची तरी आहे की नाही अशा शब्दांत वडेट्टीवार यांना कानपिचक्या दिल्या होत्या.
विजय वडेट्टीवार काय म्हणाले होते?
काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी माध्यमांशी संवाद साधताना म्हटले होते की, आम्ही पुणे लोकसभा पोटनिवडणूक लढण्याचा निर्णय घेतला आहे. लोकसभेची पोटनिवडणूक पुण्यात बिनविरोध होणार नाही. यापूर्वी पोटनिवडणुकांवेळी भाजपने कुठे आम्हाला बिनविरोध निवडून येऊ दिलं. प्रत्येकवेळी भाजप लढली आहे. त्यामुळे आम्हीही पुणे लोकसभा पोटनिवडणूक लढणार आहोत. ज्या ज्या निवडणुका येतील, त्या त्या महाविकास आघाडी एकत्रितपणे लढणार आहे, असं विजय वडेट्टीवार यांनी स्पष्ट केलं होते.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.