
Beed News, 15 Feb : सरपंच संतोष देशमुख (Santosh Deshmukh) हत्याप्रकरणात धनंजय मुंडेंवर गंभीर आरोप करणारे आणि बीडमधील गुन्हेगारी वाढण्यास वाल्मिक कराड कारणीभूत असून त्याला धनंजय मुंडेंचा सपोर्ट आहे, असा आरोप करणाऱ्या सुरेश धसांनीच आता चक्क मुंडेंचीच भेट घेतल्यामुळे नव्या वादाला तोंड फुटलं आहे.
सुरेश धसांनी (Suresh Dhas) राजकारणासाठी जनतेची दिशाभूल केल्याचा आरोप केला जात आहे. मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील, ठाकरेंच्या शिवसेनेच्या नेत्या सुषमा अंधारे, शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड अशा अनेक नेत्यांनी धसांवर हल्लाबोल केला.
अशातच आता संतोष देशमुख हत्या प्रकरण पहिल्यापासून लावून धरणाऱ्या कार्यकर्त्या अंजली दमानिया (Anjali Damania) यांनी देखील सुरेश धस यांच्यावर सडकून टीका केली आहे. एक्सवर पोस्ट करत त्यांनी धस आणि मुंडेंच्या भेटीवर प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी लिहीलं, 'खूप खूप खूप राग येतोय. किळस येतेय या राजकारणाची. एका सामान्य माणसाचा इतका क्रूर मृत्यू होतो तरी हे फक्त राजकारण करणार?
मी बीडला गेल्यापासून मी कधीही सुरेश धस यांच्या बरोबर मोर्च्यात गेले नाही. मला खात्री होती की हे कधीही पलटतील. मी हे धनंजय देशमुख ह्यांना देखील म्हटले होते. आज प्रश्न पडतो की धसांना हृदय आहे की नाही? धसांचे पाय कसे चालले? कसे गेले ते धनंजय मुंडेंची भेट घ्यायला?
एका कुटुंबाला न्याय मिळवून देणार होता ना? इतके निर्दयी कसे हे राजकारणी? इतक्या मोर्च्यांमध्ये गेलात, इतके डायलॉग मारले ते फक्त नाटक होते? किळस आली आहे ह्या सगळ्यांची', असं म्हणत त्यांनी धसांच्या भूमिकेचा निषेध केला आहे. दरम्यान, दमानिया यांनी पोलिसांवर देखील हल्लाबोल केला आहे.
आता सगळ्यांवरचा विश्वास संपला. आता आम्हाला फक्त फॅक्ट्स पाहिजेत. जे पोलिस तानाजी सावंत, पुण्याकील पोर्शे कार प्रकरणावर पत्रकार परिषद घेतात ते संतोष देशमुख हत्या प्रकरणी पत्रकार परिषद का घेत नाहीत? असा सवाल उपस्थित करत पोलिसांच्या भूमिकेवर संशय व्यक्त केला.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.