Dr.Bhagwat Karad On Khaire News : खैरेंनी टीका करताच डाॅ. कराडांनी विकास कामांची जंत्रीच मांडली..

Bjp : शहराच्या विकासासाठी २५ हजार कोटी रुपयांची विविध कामे पाईपलाईनमध्ये आहेत, ती खैरे यांना दिसत नाही का?
Chandrakant Khaire-Dr. Bhagwat Karad News
Chandrakant Khaire-Dr. Bhagwat Karad NewsSarkarnama

Marathwada : छत्रपती संभाजीनगर शहर आणि जिल्ह्याचा विकास सुरू आहे, पण विरोधकांना तो दिसून येत नाही. (Dr.Bhagwat Karad On Khaire News) शिवसेनेचे माजी खासदार चंद्रकांत खैरे सातत्याने टीका करतात, चंद्रकांत खैरे यांनी शहराच्या विकासासाठी कुठला एखादा मोठा प्रकल्प आणला का ? अनेक वर्ष आमदार, खासदार राहिले पण शहराच्या विकासाच्या बाबतीत कुठलेही ठोस धोरण त्यांनी अवलंबले नाही, अशा शब्दात केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ. भागवत कराड यांनी ठाकरे गटाचे नेते खैरे यांनी केलेल्या टीकेला प्रत्युत्तर दिले.

Chandrakant Khaire-Dr. Bhagwat Karad News
Chandrakant Khaire On Shirsat-Bhumre : शिरसाट बडबड करतो, भुमरेनी स्वतःचाच विकास केला..

शिवसेनेकडे अर्थात चंद्रकांत खैरे (Chandrakant Khaire) यांच्याकडे कोणतेही विकासाचे प्रभावी मुद्दे राहिलेले नाहीत. त्यामुळे विकास कामाचे राजकारण करणे दूरच पण, जे विकासाचे काम सुरू आहे त्यामध्ये अडथळा निर्माण करणे इतकेच काम खैरे यांनी केले, असेही कराड म्हणाले. चंद्रकांत खैरे यांनी पत्रकारांशी बोलतांना डाॅ. कराड (Dr.Bhagwat Karad) यांना किती अधिकार आहेत? त्यांना अजून दिल्ली समजलीच नाही, अशी टीका केली होती.

त्याला कराड यांनी उत्तर देतांना म्हटले आहे की, चंद्रकांत खैरे यांनी त्यांच्या राजकीय कारकिर्दीमध्ये कुठलीही एखादी मोठी योजना सुरू केली का ते मला दाखवा. (Marathwada) वास्तविक प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली संभाजीनगर जिल्ह्यात विविध विकास कामे सुरू आहेत. पर्यटन, विमानसेवा, पायाभूत सुविधा आणि उद्योग विकासासाठी मी सातत्याने जिल्ह्यातील प्रश्न मार्गी लावत आहे. खैरे यांनी समांतर पाणीपुरवठ्याच्या बाबतीमध्ये टीका केली.

खैरे साहेबांना मी सांगू इच्छितो की २७०० कोटी रुपयांची अमृत मिशन योजना शहरासाठी मंजूर केली आणि या योजनेतून ६०५ एमएलडी पाणी पस्तीस लाख शहरवासीयांना मिळणार आहे. पाणीपुरवठा योजनेचे ३० ते ३५ टक्के काम झाले असून उर्वरित वेगात सुरू आहे. नाथसागर ते संभाजीनगर शहर मुख्य पाईपलाईनचे अस्तरीकरण, जॅकवेलसाठी कॉपर डॅमची निर्मिती आणि ३९२ एमएलडी वाटर ट्रीटमेंट प्लांटचे काम वेगाने सुरू आहे.

शहरवासियांना पाईपद्वारे नॅचरल गॅस देण्यासाठी तब्बल ४ हजार कोटीचा प्रकल्प हाती घेण्यात आलेला आहे. सध्या किमान ४० हजार शहरवासीयांना गॅसचे मीटर बसवण्याचे काम पूर्ण झाले आहे. श्रीगोंदा ते संभाजीनगरपर्यंत मुख्य गॅस लाईन टाकण्याचे काम सुरू असल्याचेही कराड यांनी सांगितले. हवामान बदलाच्या तडाख्यात सातत्याने मराठवाड्याला फटका बसतो. त्यामुळे शेतकऱ्यांसाठी महत्त्वपूर्ण असलेले सी डॉप्लर रडार यंत्रणा बसविण्यास मंजुरी मिळाली आहे. यामुळे शेतकऱ्यांना हवामानाचा अचूक अंदाज मिळणार आहे.

Chandrakant Khaire-Dr. Bhagwat Karad News
Tanaji Sawant On Loksabha : धाराशीवची जागा आम्हीच लढवणार; सावंतांच्या दाव्याने राणा पाटलांची कोंडी..

शेंद्रा ते वाळूज एकच ओव्हर ब्रीजचा आराखडा तयार करण्यात आला असून त्यास लवकरच मान्यता मिळणार आहे. पैठण येथील नाथ जलाशयात फ्लोटिंग सोलार टाकण्यासंदर्भात मंजुरी मिळाली आहे. आराखडा बनविण्याचे काम सुरू आहे. चिकलठाणा आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या संदर्भात तसेच विमानसेवा सुरू करण्यासाठी वेगवेगळ्या कंपन्यांच्या बैठका घेतल्या. मला सांगताना अभिमान वाटतो की मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तब्बल ७३२ कोटी रुपये विमानतळाच्या विस्तारीकरणासाठी अर्थसंकल्पात दिले आहे.

शेंद्रा बिडकीन औद्योगिक वसाहतीमध्ये नवनवीन कंपन्या गुंतवणुकीसाठी येण्यास तयार आहेत. ड्रोनचे डिफेन्स क्लस्टर सुरू होणार आहे, पण त्याला थोडा वेळ आहे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे इंटरनॅशनल कन्व्हेन्शन सेंटर सुरू करण्यासाठी पन्नास एकर जागा दिली आहे. नीती आयोग यांनी देखील तो प्रस्ताव स्वीकारला. छत्रपती संभाजीनगर शहराच्या विकासासाठी २५ हजार कोटी रुपयांची विविध कामे पाईपलाईनमध्ये आहेत, ती खैरे यांना दिसत नाही का? असा सवालही कराड यांनी केला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com