Ashatai Shinde News : ...अन् 'शेकाप'च्या आशाताई शिंदेंनी काँग्रेसचा 'हात' ऐनवेळी नाकारला!

Ashatai Shinde and Congress : मुंबईत पक्ष प्रवेशाची झाली होती सर्व तयारी, जाणून घ्या ऐनवेळी नेमकं काय घडलं?
Ashatai Shinde
Ashatai Shinde Sarkarnama

नांदेड जिल्ह्याच्या राजकारणात अनेक नाट्यमय घडामोडी घडतांना दिसत आहेत. माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी देत भाजपामध्ये प्रवेश केला. याची चर्चा अजून संपत नाही तोच शेतकरी कामगार पक्षाच्या महिला प्रदेशाध्यक्ष तथा आमदार श्यामसुंदर शिंदे यांच्या पत्नी आशाताई शिंदे यांनी काँग्रेसमध्ये जाण्याची तयारी सुरू केली होती. काल त्यांचा मुंबईच्या काँग्रेस प्रदेश कार्यालयात दुपारी तीनच्या सुमारास पक्षप्रेवश ठरला होता. मात्र ऐनवेळी आशाताई शिंदे यांनी काँग्रेस प्रवेशाचा बेत रद्द केला.

मिळालेल्या माहितीनुसार त्यांच्या काँग्रेस प्रवेशाला नातेवाईकांकडून विरोध असल्याची चर्चा होत आहे. आशाताई शिंदे या भाजपाचे विद्यमान खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांच्या भगिनी आहेत. अशोक चव्हाण(Ashok Chavan) यांनी भाजपामध्ये प्रवेश केल्यापासून जिल्ह्यात काँग्रेसमधून आऊटगोईंग मोठ्या प्रमाणात वाढले आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Ashatai Shinde
Rohit Pawar Vs Ajit Pawar NCP: ...मग जितेंद्र आव्हाड गुंड नाहीत का? ; अजित पवार गटाचा रोहित पवारांना सवाल!

अशावेळी एका आमदाराची पत्नी आणि विद्यमान भाजपा खासदाराची बहिण काँग्रेसमध्ये प्रवेश करणार म्हटल्यावर याची सर्वत्र चर्चा सुरू झाली होती. परंतु आता ही चर्चा थांबली असून आशाताई शिंदे या काँग्रेसमध्ये जाणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे. काँग्रेसला जिल्ह्यासाठी सक्षम नेतृत्वाची गरज आहे. कंधार लोहा विधानसभा मतदारसंघाचे आमदार श्यामसुंदर शिंदे यांच्या पत्नी आशाताई शिंदे(Ashatai Shinde ) यांच्या काँग्रेस प्रवेशाने नांदेड आणि लातूरमध्ये पक्षाला फायदा होणार होता.

त्यांचा कंधार विधानसभा मतदारसंघात मोठा जनसंपर्क आहे. त्यांनी लोहा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत चिखलीकरांच्या पॅनलचा दारुण पराभव केला होता. आशाताई शिंदे यांच्या काँग्रेस प्रवेशाची तयारी पूर्ण झाली होती. मुंबईतील प्रदेश कार्यालयात पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. नांदेड(Nanded) येथुन काही पदाधिकाऱ्यांना मुंबईत बोलावून घेण्यात आले होते. पण ऐनवेळी प्रवेशाबाबचा निर्णय मागे घेण्यात आल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली.

कंधार- लोहा हा विधानसभा मतदारसंघ शेतकरी कामगार पक्षाचा(Shetkari Kamgar Party) बालेकिल्ला म्हणून ओळखले जायचा. पण गेल्या काही निवडणुकीत शेकापला यश मिळाले नाही. 2019 मध्ये विधानसभा निवडणुकीत श्यामसुंदर शिंदे हे निवडून आले. ते शेकापचे महाराष्टातील एकमेव आमदार आहेत. खासदार चिखलीकर हे त्यांचे मेहुणे आहेत, परंतु जिल्ह्याच्या राजकारणात या दोघांमधून विस्तवही जात नाही.

तसेच भाऊ व बहिणीच्या नात्यातही कटुता निर्माण झाल्याचे दिसते. अशावेळी आशाताईंचा काँग्रेसमध्ये प्रवेश झाला असता चिखलीकरांसाठीही तो अडचणीचा ठरला असता. पण तुर्तास हा धोका टळला आहे. आशाताई शिंदे यांना काँग्रेसने(Congress) नांदेडमधून लोकसभेची उमेदवारी देण्याची तयारी चालवली होती, अशीही चर्चा या निमित्ताने होती. भाजपाकडून चिखलीकरांच्या विरोधात काँग्रेसने त्यांच्या बहिणीलाच मैदानात उतरवण्याची रणनिती आखली होती. परंतु ती प्रत्यक्षात उतरण्याआधीच बारगळली आहे.

(Edited by - Mayur Ratnaparkhe)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com