Loksabha Election 2024: लातूरमध्ये महाआघाडीच्या उमेदवाराला मिळणार 'शेकाप'चं बळ ?

Loha Kandhar Constituency : शेतकरी कामगार पक्षाचे एकमेव आमदार श्यामसुंदर शिंदे हे कंधार लोहा विधानसभा मतदारसंघातून निवडून आलेले आहेत.
Mahavikas Aghadi
Mahavikas AghadiSarkarnama
Published on
Updated on

Nanded News: मुंबईत पार पडलेल्या महाविकास आघाडीच्या बैठकीत समविचारी पक्षांना सोबत घेऊन लोकसभा निवडणुकीला सामोरे जाण्याचा निर्णय घेण्यात आला. या महाविकास आघाडीच्या घटक पक्षात शेतकरी कामगार पक्षाचा समावेश आहे. (Loksabha Election 2024)

राज्यातील शेतकरी कामगार पक्षाचे एकमेव आमदार श्यामसुंदर शिंदे हे कंधार लोहा विधानसभा मतदारसंघातून निवडून आलेले आहेत. या मतदारसंघाचा समावेश लातूर लोकसभा मतदारसंघात होतो. त्यामुळे महाविकास आघाडीच्या उमेदवाराला कंधार लोह्यातून 'शेकाप'चे बळ मिळणार असल्याचे बोलले जात आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Mahavikas Aghadi
Electronic Voting Machine: ईव्हीएम ऐवजी मतपत्रिकेवर मतदान घ्या; धाराशिवमध्ये ईव्हीएम विरोधात 'महारॅली'

लातूर लोकसभा मतदारसंघात लातूर शहर, लातूर ग्रामीण, उदगीर, अहमदपूर, निलंगा हे जिल्ह्यातील पाच व नांदेड जिल्ह्यातील कंधार लोहा या मतदारसंघाचा समावेश होतो. हा मतदारसंघ अनुसूचित जाती प्रवर्गासाठी राखीव आहे. या मतदारसंघातून गेल्या दोन निवडणुकीत भाजपचा उमेदवार निवडून आला होता. त्यामुळे युतीमध्ये ही जागा भारतीय जनता पक्षाला सुटणार हे निश्चित आहे.

या मतदारसंघातून विद्यमान खासदार सुधाकर शृंगारे यांनी निवडणुकीची तयारी सुरू केली आहे. महाविकास आघाडीच्या जागावाटपात मराठवाड्यातील ज्या जागा काँग्रेसला सोडण्यात येणार आहेत. त्यात लातूरचा समावेश होतो. या मतदारसंघावरील काँग्रेसची पकड सैल झाली आहे, हे मागील काही निवडणुकीचे निकाल पाहिल्यानंतर दिसून येते.

2019 च्या निवडणुकीत भाजपचे उमेदवार सुधाकर शृंगारे होते, तर काँग्रेसचे मच्छिंद्र कामात हे उमेदवार होते. या निवडणुकीत सुधाकर शृंगारे खूप मोठ्या मताधिक्याने निवडून आले होते. 2019 मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत कंधार लोहा विधानसभा मतदारसंघातून 'शेकाप'चे श्यामसुंदर शिंदे हे एक लाखांहून अधिक मते घेऊन निवडून आले. आता आगामी लोकसभा निवडणुकीत त्यांची महत्त्वाची भूमिका राहणार आहे.

भाजपचे उमेदवार सुधाकर शृंगारे यांनी कंधार लोहा विधानसभा मतदारसंघातून एक लाख सहा हजार मते मिळवली होती. तर काँग्रेसचे उमेदवार मच्छिंद्र कामात 37 हजाराच्या आसपास मतं घेतली होती. तर भारतीय जनता पक्षाला तब्बल 70 हजारांचे मताधिक्य मिळाले होते. यात प्रतापराव पाटील चिखलीकर यांचा खूप मोठा वाटा होता.

गेल्या पाच वर्षात या मतदारसंघात खूप मोठ्या राजकीय घडामोडी घडल्या. विद्यमान खासदार प्रतापराव चिखलीकर व आमदार श्यामसुंदर शिंदे यांच्या नाजूक नात्यात दुरावा निर्माण झाला आहे. याचा परिणाम म्हणून महाविकास आघाडीच्या उमेदवाराला बळ देण्याचे काम आमदार श्यामसुंदर शिंदे करतील, असे बोलले जात आहे. या सोबत शिवसेना ठाकरे गट व वंचित बहुजन आघाडी, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे बळ आघाडीच्या उमेदवाराला मिळणार आहे.

(Edited By-Ganesh Thombare)

Mahavikas Aghadi
Beed LokSabha Constituency : शरद पवार गटातील डॉ. काळेंचा ‘बीडला हवा चेहरा नवा’चा नारा; निवडणुकीत बदल घडणार

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com