Ashok Chavan News : लातूरची रेल्वे तुम्ही नांदेडला येऊ दिली नाही, पण आम्ही तसे करणार नाही! अशोक चव्हाणांचा टोला..

Ashok Chavan targeted Vikram Kale stating that unlike him, they won’t stop Latur railway from reaching Nanded. : रेल्वे आणि विमानसेवेमुळे पर्यटन, रोजगाराची साधन, शिक्षणासाठी जाणाऱ्यांची सोय होणार आहे. नांदेडला दळणवळणात मोठा बदल होणार आहे.
Ashok Chavan On Vande Bharat Express News
Ashok Chavan On Vande Bharat Express NewsSarkarnama
Published on
Updated on

Nanded News : नांदेड हुजूर साहेब ते मुंबई छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसला जाणारी वंदे भारत रेल्वे आज धावली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आॅनलाईन पद्धतीने या रेल्वेला हिरवा झेंडा दाखवला. या गाडीच्या स्वागतासाठी नांदेडकरांनी मोठी गर्दी केली होती. खासदार अशोक चव्हाण यांनी या रेल्वेला हिरवा झेंडा दाखवतानाच आपल्या भाषणातून व्यासपीठावर उपस्थित आमदार विक्रम काळे यांच्या खांद्यावर बंदूक ठेवून लातूरच्या देशमुखांवर निशाणा साधला.

विक्रम काळे साहेब तुम्ही लातूरची रेल्वे नांदेडला येऊ दिली नाहीत, पण आम्ही तसे करणार नाही, नांदेडची रेल्वे लातूरहून मुंबईसाठी पाठवू. आम्ही जसे मोठे मनं केले, तसे तुम्हीही करा, लातूरची रेल्वे नांदेडहून पुण्याकडे जाऊ द्या, शेवटी तुम्ही आमच्या नांदेडला गुरू बंधू मानता. मराठवाड्याच्या विकासासाठी आपण सगळे एकच आहोत. रेल्वे फक्त मार्गांना जोडत नाही, तर मनालाही जोडते, अशा शब्दात अशोक चव्हाण (Ashok Chavan) यांनी आपल्या मनातील सल बोलून दाखवली.

वंदे भारत रेल्वे नांदेडहून सुरू केल्याबद्दल अशोक चव्हाण यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजपाचे अध्यक्ष जे.पी.नड्डा, रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांचे आभार मानले. (Nanded) तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना सलाम असे म्हणत चव्हाण यांनी वंदे भारत रेल्वे म्हणते मोदींच्या विकसित, आत्मनिर्भर आणि स्वदेशी भारतासाठी टाकलेले पहिले पाऊल असल्याचे गौरवोद्दगार काढले. माजी केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांची या निमित्ताने आभार मानलेच पाहिजे, कारण त्यांनीच सर्वप्रथम वंदे भारत रेल्वेच्या प्रस्तावाला मंजूरीचा पहिला हिरवा झेंडा दाखवला होता, याचा आवर्जून उल्लेख अशोक चव्हाण यांनी आपल्या भाषणात केला.

Ashok Chavan On Vande Bharat Express News
Ashok Chavan News : 'ऑपरेशन सिंदूर'वर अविश्वास दाखवणाऱ्या काँग्रेसला अशोक चव्हाणांकडून सडेतोड उत्तर!

आजची ही अलोट गर्दी पाहिल्यानंतर मराठवाड्यात वंदे भारत रेल्वेचे स्वागत करण्यासाठी किती उत्साह आहे हे दिसून येते. आजची ही पहिले रेल्वे मुंबईच्या लालबागच्या दर्शनासाठी चालली आहे, असे म्हटले तर वावगे ठरणार नाही. विकसित महाराष्ट्राचं मराठवाड्यातील हे पहिले पाऊल आहे. मुंबईला आता नऊ तासात पोहचता येईल. लूज टाईम कमी करता आला तर आपण सात तासात मुंबईला पोहचू शकतो. नांदेड-लातूर आणि बिदर रेल्वे मार्गाचे काम झाले तर आणखी कमी वेळात मुंबईला जाता येईल. या संदर्भात मी आणि अजित गोपछडे दोघेही केंद्रात प्रयत्न करणार आहोत, असेही चव्हाण यांनी सांगीतले.

Ashok Chavan On Vande Bharat Express News
Nanded Politics: युतीत समन्वय; आघाडीत गोंधळ! नांदेडमध्ये पक्ष पुनर्बांधणीसाठी नेत्यांची धावाधाव

रेल्वे अन् विमानामुळे मोठा बदल होणार

नांदेडला विमानतळ सुरू केला तेव्हा मोठा विरोध झाला. अशोक चव्हाण यांना त्यांचे विमान उतरवण्यासाठी विमानतळ हवे आहे, अशी टीका केली गेली. आज तेव्हा टीका करणारे लोकच विमानात बॅगा भरून जातात, असा टोलाही अशोक चव्हाण यांनी लगावला. आता नांदेडचे विमानतळ बंद पडले आहे, तर त्याबद्दलही हेच लोक प्रश्न विचारता. आधुनिकीकरण आणि धावपट्टीचा विषय मार्गी लागून हे विमानतळ सुरू झाले तर नांदेडहून दररोज दहा विमाने उड्डाण करू शकतात, असेही चव्हाण म्हणाले.

Ashok Chavan On Vande Bharat Express News
Vande Bharat Train : महाराष्ट्राला नवी भेट! आज धावणार आणखी एक ‘वंदे भारत एक्सप्रेस’; असा असेल संपूर्ण रूट!

रेल्वे आणि विमानसेवेमुळे पर्यटन, रोजगाराची साधन, शिक्षणासाठी जाणाऱ्यांची सोय होणार आहे. नांदेडला दळणवळणात मोठा बदल होणार आहे. वंदे भारतमध्ये सर्व अत्याधुनिक सुविधा आहेत. 610 किलोमीटरचे हे अंतर नऊ तासात गाठणे शक्य होणार आहे. वीस डब्याची ही गाडी संभाजीनगरकरांसाठी सोयीची होणार आहे. सकाळचा नाश्ता करून ते आठ वाजता रेल्वेत बसू शकतात. मराठवाड्यातील आठही जिल्हे एकमेकांशी जोडले गेले पाहिजे. केवळ रेल्वेनेच नाही तर मनाने जोडले गेले पाहिजे.

Ashok Chavan On Vande Bharat Express News
Devendra Fadnavis On Marathwada Drought : मराठवाड्यातील आजच्या पिढीने दुष्काळ पाहिला, पुढच्या पिढीला पहावा लागणार नाही! मुख्यमंत्र्यांनी दिला शब्द

मराठवाड्याचे मागासपण दूर करण्यासाठी आगामी काळात मोठी पावलं उचलायची आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना मला नांदेडला आणायचे आहे, असेही अशोक चव्हाण म्हणाले. महाराष्ट्राची उपराजधानी नागपूरलाही कनेक्टीव्हिटी जोडली गेली पाहिजे. हैदराबाद, लातूर, पुणे, मुंबई एकमेकांशी जोडले गेले तर व्यापार, रोजगार, उद्योग वाढेल. याचा फायदा निश्चितच आपल्याला होईल.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com