MLA Hemant Patil On Ashok Chavan : काँग्रेस प्रमाणेच भाजपातही अशोक चव्हाण स्वतःचा गट निर्माण करत आहेत! हेमंत पाटील यांचा पुन्हा हल्लाबोल

Hemant Patil accuses Ashok Chavan of forming a separate group within the BJP, similar to his previous affiliations with Congress. : आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत जिल्ह्यातील भाजपाचे खासदार अशोक चव्हाण यांनी स्वबळाची भाषा केल्यापासून महायुतीतील घटक पक्ष असलेल्या शिवसेनेचे हेमंत पाटील चांगलेच आक्रमक झाले आहेत.
Ashok Chavan-Hemnat Patil News
Ashok Chavan-Hemnat Patil NewsSarkarnama
Published on
Updated on

Shivsena-BJP News : राज्याचे उपमुख्यमंत्री तथा शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांच्या आभार दौऱ्यापूर्वीच महायुती मध्ये खडाजंगी सुरू झाली आहे. शिवसेनेचे आमदार तथा विधान परिषदेतील गट नेते हेमंत पाटील यांनी पुन्हा एकदा भाजपाचे खासदार अशोक चव्हाण यांच्यावर त्यांच्यामुळे महायुतीत मिठाचा खडा पडत असल्याची जोरदार टीका केली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे आपण अशोक चव्हाण यांची तक्रार केली होती, असेही पाटील यांनी सांगितले.

विधानसभा निवडणुकीत नांदेड जिल्ह्यातील सर्व नऊ जागा जिंकल्यानंतरही महायुतीमध्ये आरोप प्रत्यारोप सुरू आहेत. विशेषत: आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत जिल्ह्यातील भाजपाचे खासदार अशोक चव्हाण (Ashok Chavan) यांनी स्वबळाची भाषा केल्यापासून महायुतीतील घटक पक्ष असलेल्या शिवसेनेचे हेमंत पाटील चांगलेच आक्रमक झाले आहेत. 'अशोक चव्हाण म्हणजे भाजप नव्हे', अशा शब्दात याआधी टीका केल्यानंतर आता हेमंत पाटील यांनी पुन्हा एकदा अशोक चव्हाण यांना टारगेट केल्याचे चित्र आहे.

एकनाथ शिंदे यांचा आभार दौरा आणि मेळावा थोड्याच वेळात नांदेड मध्ये सुरू होत आहे. त्या आधीच हेमंत पाटील (Hemant Patil) यांनी अशोक चव्हाण यांनी युतीधर्म पाळावा असा सल्ला देत ते काँग्रेस प्रमाणेच भाजप मध्येही स्वत:चा गट निर्माण करण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप केला. नांदेड शहरात महायुतीत नीट संवाद साधला जात नाही, असे झाले तर महायुतीत मिठाचा खडा पडेल. चव्हाण साहेब मोठे नेते आहेत त्यांनी युती धर्म पाळला पाहिजे, असा सल्लाही हेमंत पाटील यांनी दिला.

Ashok Chavan-Hemnat Patil News
Pratap Patil Chikhlikar On Ashok Chavan : अशोक चव्हाणांचे कट्टर विरोधक चिखलीकरही मैदानात, म्हणाले स्वबळाची खुमखुमी असेल तर..

अशोक चव्हाण यांना योग्य समज द्यावी, अशी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे आपण तक्रार केली होती. आज एकनाथ शिंदे यांनाही या संदर्भात माहिती देणार आहे. नांदेड जिल्ह्यात महायुती असली तरी अशोक चव्हाण यांना स्वत:चे वर्चस्व निर्माण करायचे आहे. यातूनच त्यांनी जिल्ह्यात अधिकार्‍यांच्या नियुक्ती करताना हस्तक्षेप करत दबाव आणला होता.

Ashok Chavan-Hemnat Patil News
BJP Politics : भाजपच्या बड्या नेत्यावर भीक मागण्याची वेळ, ‘बुलेट दा’चे फोटो व्हायरल होताच उडाली खळबळ

मुळात महायुती असल्याने वरिष्ठ नेत्यांनी एकमेकांच्या हातात हात घालून काम करणे अपेक्षित आहे. जुने वाद, क्लेश विसरले पाहिजे. परंतु विधानसभेत बंडखोरी केल्यामुळे ज्यांच्यावर सहा वर्षासाठी निलंबनाची कारवाई करण्यात आली त्यांना सहा दिवसात अशोक चव्हाण यांनी पक्षात घेतले. त्यामुळे शिवसेनेमध्ये चीड असून अशोक चव्हाण यांना समज देण्याची गरज असल्याचे हेमंत पाटील यांनी म्हटले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com