Ashok Chavan on NCP : नांदेड महापालिकेत कसेबसे खाते उघडलेल्या राष्ट्रवादीला अशोक चव्हाणांचा खोचक टोला,'घड्याळ आता हळूहळू..!'

Ashok Chavan latest news : नांदेड महापालिकेत मर्यादित यश मिळाल्यानंतर अशोक चव्हाण यांनी राष्ट्रवादी काँग्रेसवर खोचक टीका केली. ‘घड्याळ आता हळूहळू बंद पडतंय’ या वक्तव्यामुळे राजकीय चर्चांना उधाण.
Ashok Chavan
Ashok ChavanSarkarnama
Published on
Updated on

Nanded BJP News : नांदेड-वाघाळा महापालिकेत स्वबळावर सत्ता आणि बहुमत मिळवल्यानंतर अशोक चव्हाण यांचा आत्मविश्वास चांगलाच वाढला आहे. शिवसेनेसोबत युती करत लढलेल्या सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला महापालिकेत कशीबशी एक जागा निवडून आणता आली. खाते उघडल्यामुळे पक्षाचे नाक राहिले, पण जिल्ह्यात आमचाच पक्ष एक नंबरचा होणार हा आमदार प्रताप पाटील चिखलीकर यांचा दावा मात्र फोल ठरला.

महापालिका निवडणुकीत 45 जागांच्या बहुमतासह भाजपाचा महापौर आणि उपमहापौर बसवल्यानंतर अशोक चव्हाण यांनी नांदेडमध्ये पहिली पत्रकार परिषद घेतली. निवडणुकीच्या काळात नांदेडकरांना दिलेला संकल्पनामा येत्या पाच वर्षात पूर्ण करण्याचा शब्द अशोक चव्हाण यांनी दिला. महापालिका निवडणुकीनंतरच्या पहिल्याच पत्रकार परिषदेत महापौर कविता मुळे या देखील उपस्थित होत्या. पण त्यांना अशोक चव्हाण यांनी फार बोलण्याची संधीच दिली नाही.

Ashok Chavan
DA Hike Pensioners : सरकारी कर्मचाऱ्यांनंतर आता पेन्शनर्सना सरकारचं मोठं गिफ्ट! महागाई भत्ता 257 टक्क्यांवर, जाणून घ्या कधीपासून मिळणार लाभ

दुसरीकडे अशोक चव्हाण यांनी जिल्ह्यातील आपले पांरपारिक प्रतिस्पर्धी आणि राजकीय विरोधक असलेल्या आमदार प्रताप पाटील चिखलीकर यांनाही चिमटा काढला. शिवसेनेचे आमदार हेमंत पाटील यांच्याशी हातमिळवणी करत राष्ट्रवादी काँग्रेसने अशोक चव्हाण यांच्याविरोधात मोट बांधण्याचा प्रयत्न केला होता. परंतु त्यांची ही मोट काही जुळून आली नाही.

शिवसेनेचे शहरातील आमदार बालाजी कल्याणकर यांनी अशोक चव्हाण यांच्याशी जुळते घेत आपल्या विधानसभा मतदारसंघातील काही प्रभाग पदारात पाडून घेत चव्हाण यांच्याशी जुळवून घेतले होते. पण चिखलीकरांना सोबत घेऊन अशोक चव्हाण यांना आव्हान देणे हेमंत पाटील यांना जमलेच नाही. बालाजी कल्याणकर यांच्या वाट्याला आलेल्या चार जागा शिवसेनेने जिंकल्या, इतर ठिकाणी मात्र या पक्षाला यश मिळाले नाही.

शहरी भागात अजूनही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे संघटन मजबूत नाही, याची प्रचिती महापालिका निवडणुकीतील पक्षाच्या सुमार कामगिरीतून दिसून आली. केवळ एक जागा जिंकत या पक्षाने खाते उघडले. अशोक चव्हाण यांनी महापालिकेच्या संदर्भातील पहिल्याच पत्रकार परिषदेत संधी हेरली आणि घड्याळ आता हळूहळू बंद पडत आहे, ते कसं चालू ठेवायचा हा मोठा प्रश्न आहे, असे म्हणत प्रताप पाटील चिखलीकर यांना टोला लगावला.

Ashok Chavan
Ajit Pawar Plane Crash Update: नेमकं काय घडलं 'त्या' काही सेकंदात? अजितदादांच्या विमान अपघातात तांत्रिक बिघाड की घातपात? 'मिस्ट्री' उलगडणार!

महापालिकेवर शतप्रतिशत भाजपाची सत्ता आणण्यात अशोक चव्हाण यांचा सिंहाचा वाटा होता. ज्या चांगल्या गोष्टी जगात आहेत, त्या मला नांदेडमध्ये आणायच्या आहेत, असं चव्हाण यांनी निवडणूक प्रचारात वारंवार सांगीतले होते. अशोक चव्हाण यांनी 28 वर्षानंतर पहिल्यांदा महापालिकेत भाजाचे कमळ फुलवून दाखवले आहे. यापुर्वी नगरपालिका, नगरपंचायत, निवडणुकीतही जिल्ह्यात भाजपाला घवघवीत यश मिळाले होते.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com