Ashok Chavan News : अशोक चव्हाणांना मतदारसंघातही फिरणे झाले अवघड...

Nanded News : मराठवाड्यात सर्वच पक्षाच्या लोकप्रतिनिधी, मंत्री, नेत्यांना मराठा आरक्षण आंदोलन, गावबंदी आणि रोषाचा फटका बसला.
Ashok Chavan News
Ashok Chavan NewsSarkarnama
Published on
Updated on

Marathwada Political News : मराठा आरक्षणासाठी आरपारच्या लढाईसाठी सज्ज झालेल्या आंदोलकांचा राजकीय नेत्यांविरोधातील रोष काही केल्या कमी होताना दिसत नाहीये. माजी मुख्यमंत्री काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अशोक चव्हाण यांना त्यांच्याच मतदारसंघात आणि जिल्ह्यात मराठा आंदोलकांच्या रोषाला पुन्हा एकदा समारे जावे लागले. (Maratha Reservation News) एका विवाह समारंभासाठी जात असताना संतप्त आंदोलकांनी अशोक चव्हाण यांचा ताफा अडवण्याचा प्रयत्न केला.

Ashok Chavan News
Nanded Loksabha Constituency : अशोक चव्हाण इच्छुक नसल्याने नांदेडमध्ये काँग्रेसच्या गोटात शांतता...

त्यांच्याविरोधात जोरदार घोषणाबाजीही केली. पोलिसांनी आंदोलकांना अडवत चव्हाण (Ashok Chavan) यांच्या ताफ्याला रस्ता मोकळा करून दिला. यापूर्वीही चव्हाण यांना मराठा आंदोलकांनी काळे झेंडे दाखवत मराठा आरक्षणासाठी (Maratha Reservation) काय केले? असा जाब विचारला होता. त्यानंतर आज अशोक चव्हाणांच्या ताफ्यासमोर येत सकल मराठा समाजाच्या तरुणांनी घोषणाबाजी केली आहे.

हा प्रकार मुदखेड तालुक्यातील इजळी येथे घडला. इजळी येथील एका विवाह सोहळ्यासाठी अशोक चव्हाण जात असताना अचानक मराठा तरुणांनी गाड्यांसमोर येत घोषणाबाजी केली. (Nanded) यामुळे एकच गोंधळ उडाला, पोलिसांनी वेळीच समोर येत आंदोलकांना रोखले आणि चव्हाण व त्यांच्यासोबतच्या वाहनांना मार्ग मोकळा करून दिला.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

मराठा आरक्षणासाठी येत्या 20 तारखेला मनोज जरांगे-पाटील यांच्या नेतृत्वाखाली अंतरवाली सराटी येथून मुंबईकडे लाखोंच्या संख्येने मराठाबांधव कूच करणार आहेत. या आंदोलनाची जोरदार तयारी सुरू असताना राजकीय नेत्यांविरोधात असलेली धग आणि संताप वेळोवेळी पाहायला मिळतो आहे. मराठवाड्यात सर्वच पक्षांच्या लोकप्रतिनिधी, मंत्री, नेत्यांना मराठा आरक्षण आंदोलन, गावबंदी आणि रोषाचा फटका बसला.

अशोक चव्हाण यांना त्यांच्याच जिल्ह्यात एक नाही, तर तीन वेळा मराठा आंदोलकांच्या संतापाला तोंड द्यावे लागले. नुकत्याच झालेल्या नागपूरच्या हिवाळी अधिवेशनात अशोक चव्हाण यांनी मराठा आरक्षणावर आपली स्पष्ट भूमिका सभागृहात मांडली होती. सरकारकडून होत असलेल्या वेळकाढू धोरणावरही त्यांनी जोरदार टीका केली होती. मराठा आरक्षणासाठी केंद्राने घातलेली 50 टक्क्यांची मर्यादेची अट शिथिल करा, अशी मागणीही चव्हाण यांनी वेळोवेळी केली.

Ashok Chavan News
Ashok Chavan News : जागा वाटप का होत नाही? अशोक चव्हाणांनी सांगितलं खरं कारण...

तरीही त्यांच्याबद्दल मराठा समाजामध्ये राग दिसून येत आहे. राज्यात महाविकास आघाडीचे सरकार असताना चव्हाण हेच मराठा आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष होते. या काळात या सरकारने मराठा आरक्षण वाचवण्यासाठी सर्वोच्च न्यायालयात व्यवस्थित बाजू मांडली नाही, असा आरोप विरोधकांकडून केला जातो. विशेषतः भाजप आणि शिवसेना शिंदे गट यावरून अशोक चव्हाण यांना लक्ष्य करतात. चव्हाण आता मराठा आरक्षणाच्या बाजूने उभे असले तरी ते उपसमितीचे अध्यक्ष असताना त्यांनी काहीच केले नाही, असा ठपका त्यांच्यावर असल्याने मराठा आंदोलकांचा त्यांच्यावर राग असल्याचे बोलले जाते.

Edited By : Jagdish Pansare

Ashok Chavan News
Maratha Reservation : मुंबईत होणाऱ्या मराठा आरक्षणाच्या बैठकीत जरांगे-पाटलांची ऑनलाईन हजेरी ?

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com