- जुई जाधव
Maratha Reservation : मराठा आरक्षणाचा मुद्दा सध्या राज्यात जोरदार चर्चेत आहे. मराठा समाजाचे नेतृत्व करणारे मनोज जरांगे-पाटील आता थेट मुंबईत दाखल होणार आहे. आज मुंबईतील सह्याद्री अतिथीगृहावर मराठा आरक्षणासंदर्भातील बैठक मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली होणार आहे.
मात्र, या बैठकीला मनोज जरांगे-पाटील (Manoj Jarange Patil) ऑनलाईन उपस्थित राहण्याची शक्यता आहे. मंत्री शंभूराज देसाई (Shambhuraj Desai) यांनी त्यांना पत्र लिहून आमंत्रणदेखील दिलं होतं. मात्र ते स्वतः इथे येणार नसून या बैठकीला ऑनलाईन उपस्थित राहणार असल्याची शक्यता आहे. या बैठकीमध्ये मराठा आरक्षणावर आतापर्यंत सरकारने काय केलं आणि आरक्षणावर काय भूमिका आहे, हे स्पष्ट केलं जाऊ शकतं.
जरांगे पाटील यांना राज्य सरकारच शिष्टमंडळ गेले अनेक दिवस भेटत आहेत आणि त्यांना समजावण्याचा प्रयत्न करीत आहेत. मात्र ते त्यांच्या निर्णयावर ठाम असून मुंबई (Mumbai) येथे आंदोलन करणार असल्याचं नक्की आहे. मराठा आरक्षणावरून ओबीसी समाजदेखील शिगेला पेटला आहे. मराठ्यांना ओबीसी समाजातून आरक्षण दिलं जाऊ नये, अशी ठाम भूमिका ओबीसी (OBC) नेत्यांची आहे.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
त्यामुळे राज्यात सध्या मराठा समाज विरुद्ध ओबीसी समाज अशी लढत पाहायला मिळत आहे. आजच्या बैठकी मध्ये जरांगे-पाटील ऑनलाईन उपस्थित राहणार असल्याचं सांगितलं जात आहे, राज्यातील इतर मंत्रीदेखील या बैठकीत उपस्थित राहणार आहेत. नेमकी सरकारची भूमिका काय आहे आणि जरांगे-पाटील यांचा मोर्चा मुंबईत दाखल होणार का? याकडे सगळ्यांचं लक्ष आहे.
(Edited by Amol Sutar)
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.