

Marathwada : सत्ताधारी एकीकडे भिडेंशी आमचा संबंध नाही, असे सांगतात आणि दुसरीकडे त्यांच्यावर कारवाईची मागणी करणाऱ्या आमच्या नेत्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यासाठी समर्थन देतात, अशी टीका माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी केली. (Ashok Chavan On Bhide News) पृथ्वीराज चव्हाण यांना जिवे मारण्याची धमकी, आमदार यशोमती ठाकूर यांच्याविरोधात होत असलेली कारवाईची मागणी या पार्श्वभूमीवर चव्हाण यांनी राज्य सरकारवर टीका केली.
महात्मा गांधींसह अनेक महापुरूषांविरूद्ध गरळ ओकणारे मनोहर भिडे (Sambhaji Bhide) अजुनही खुलेआम फिरताहेत, भाषणं देताहेत. त्यांना साधी अटक सुद्धा झालेली नाही. दुसरीकडे भिडेंविरूद्ध कारवाईची मागणी करणारे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांना जिवे मारण्याची धमकी दिली जाते. (Ashok Chavan) एकिकडे भाजप म्हणते आमचा मनोहर भिडेंशी संबंध नाही.
दुसरीकडे त्यांचेच नेते व कार्यकर्ते भिडे समर्थकांच्या खांद्याला खांदा लावून माजी मंत्री अॅड. यशोमतीताई ठाकूर यांच्याविरूद्ध गुन्हे दाखल करण्याची मागणी करतात. (Congress) हा सारा प्रकार निषेधार्ह आहे. बुधवारी अधिवेशन सुरू होण्यापूर्वी राज्य सरकारने प्रत्यक्ष व ठोस कृतीतून आपली भूमिका स्पष्ट करावी, अशी मागणी चव्हाण यांनी केली आहे.
दरम्यान, राज्याचे उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भिंडे यांच्या वादग्रस्त विधानावर भाष्य करतांना या कृतीचा मी निषेधच करतो. भिडे गुरूजींनी महात्मा गांधी यांच्याबद्दल केलेल्या विधानाचे समर्थन होऊच शकत नाही, असे म्हटले आहे. महात्मा गांधी हे देशाचे राष्ट्रपिता आहेत, स्वातंत्र्य लढ्यातील महानायक आहेत.
त्यामुळे त्यांच्याबद्दल अशाप्रकारचे वक्तव्य करणे पुर्णपणे चुकीचे आहे. महात्मा गांधीचा अपमान सहन केला जाणार नाही. भिडे गुरुजींचा भाजपशी काहीही संबंध नाही, त्यामुळे कुणी याचे राजकारण करू नये, असे आवाहन देखील फडणवीस यांनी केले. बुधवारी पावसाळी अधिवेशनात काॅंग्रेस महात्मा गांधींच्या मुद्यावरून सत्ताधाऱ्यांना जाब विचारणार आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.