Nanded Loksabha News : नांदेडमध्ये अशोक चव्हाणांची प्रतिष्ठा पणाला; भाजपच्या '400 पार'मध्ये चिखलीकर असणार का?

Political News : नांदेड लोकसभा मतदारसंघ गेल्या निवडणुकीत भाजपने जिंकला तेव्हा अशोक चव्हाण हेच काँग्रेसकडून उमेदवार होते. गेल्या पाच वर्षांत घडलेल्या राजकीय घडामोडीमुळे तेच अशोक चव्हाण आज भाजपचे उमेदवार प्रताप चिखलीकर यांच्यासाठी मत मागताना दिसत आहेत.
Vasant Chavan, Ashok Chavan, Pratap Patil-Chikhalikar
Vasant Chavan, Ashok Chavan, Pratap Patil-Chikhalikarsarkarnama

Nanded News : लोकसभेच्या नांदेड मतदारसंघात काँग्रेसमधून नुकतेच भाजपमध्ये प्रवेश केलेले माजी मुख्यमंत्री राज्यसभेतील भाजपचे विद्यमान खासदार अशोक चव्हाण यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. नांदेड लोकसभा मतदारसंघ गेल्या निवडणुकीत भाजपने जिंकला तेव्हा अशोक चव्हाण हेच काँग्रेसकडून उमेदवार होते. परंतु गेल्या पाच वर्षांत घडलेल्या राजकीय घडामोडीमुळे तेच अशोक चव्हाण आज भाजपचे उमेदवार प्रताप चिखलीकर यांच्यासाठी मतं मागताना दिसत आहेत.

नांदेड जिल्ह्याच्या राजकारणात कधीकाळी एकमेकांचे कट्टर विरोधक असलेले चव्हाण- चिखलीकर लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात गळ्यात गळे घालून फिरले. चिखलीकरांच्या प्रचाराला अशोक चव्हाण (Ashok Chavan) कसे याचे आश्चर्य तुम्हाला वाटत असेल? अशा शब्दात चव्हाण यांनी नांदेडकरांची फिरकी घेतली. परंतु भाजपच्या अब की बार 400 पार मिशनमध्ये नांदेडमधून प्रताप पाटील चिखलीकर (Paratp Patil chikhlikar) यांचा नंबर सर्वात वरचा असेल, असा दावाही केला आहे. (Nanded Loksabha News)

Vasant Chavan, Ashok Chavan, Pratap Patil-Chikhalikar
Ajit Pawar News : अजितदादांची राहुल कुलांना मोठी ऑफर; घड्याळ हाती घेतलं तर...

आता त्यांचा हा दावा किती खरा किती खोटा हे उद्याच्या मतदानानंतर 4 जून रोजीच्या मतमोजणीत स्पष्ट होईल. महायुतीच्या प्रताप चिखलीकर यांचा सामना महाविकास आघाडीचे आणि काँग्रेसमध्ये अशोक चव्हाण यांचे सहकारी राहिलेले वसंतराव चव्हाण यांच्याशी होत आहे. नांदेड लोकसभा मतदारसंघाची जबाबदारी भाजपने अशोक चव्हाण यांच्यावर सोपवल्यानंतरही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नांदेडमध्ये सभा घेत चिखलीकरांच्या विजयासाठी साद घातली.

अशोक चव्हाण यांच्या भाजप प्रवेशानंतर गेल्या महिनाभरात मोठ्या प्रमाणात काँग्रेसमधील त्यांच्या समर्थकांनी पक्षांतर केले. हे प्रमाण पाहता नांदेड जिल्हा काँग्रेसमुक्त होतो की काय? अशी परिस्थिती निर्माण झाली होती. परंतु ऐन निवडणुकीच्या तोंडावर अशोक चव्हाण यांनी काँग्रेसला दगा दिला, असा आरोप करत राज्यातील काँग्रेसच्या बड्या नेत्यांनी नांदेडवर सर्वाधिक लक्ष केंद्रित केले.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

शेजारच्या लातूर शहरचे आमदार अमित देशमुख यांच्यावर नांदेड लोकसभा मतदारसंघाची जबाबदारी सोपवण्यात आली. अमित देशमुख यांनी नांदेडमध्ये वसंत चव्हाण यांच्यासाठी सभा घेत वसंत ऋतुचा दाखला देत अशोकाची पतझड होऊन वसंत बहरणार असल्याचा दावा केला. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनीही चव्हाण यांच्या प्रचारासाठी सभा घेत अशोक चव्हाण स्वार्थी असल्याची टीका केली.

अशोक चव्हाण यांनी त्यांच्या विरोधातील वातावरणाला हवा देण्याचा प्रयत्न पटोले यांनी केला. अर्थात अशोक चव्हाण यांनी सर्व आरोपांना जशास तसे उत्तर देत पलटवार केला. या दोन आठवड्यांच्या प्रचारामधून महायुती आणि महाविकास आघाडी अशा दोन्ही बाजूंनी एकमेकांवर आरोप- प्रत्यारोप झाले. आता नांदेडकर आपल्या मतांचा कौल कोणाच्या बाजूने देतात हे उद्याच्या मतदानानंतर स्पष्ट होणार आहे.

Vasant Chavan, Ashok Chavan, Pratap Patil-Chikhalikar
Dindori Loksabha Constituency : शरद पवार गटाला धक्का; जे.पी. गावित उमेदवारी दाखल करणार

मराठा आरक्षणाचा मुद्दा अडचणीचा ठरणार

नांदेड जिल्ह्यामध्ये विकासाच्या मुद्द्यांपेक्षा वैयक्तिक टीकेवर जोर देण्यात आला होता. गेल्या काही महिन्यांपासून राज्यात गाजत असलेला मराठा आरक्षणाचा मुद्दा विशेषता महायुतीच्या प्रताप पाटील चिखलीकर आणि खासदार अशोक चव्हाण यांच्यासाठी अडचणीचा ठरू पाहत आहे. अनेक सभांमध्ये मराठा समाजाच्या तरुणांनी हस्तक्षेप करत या दोघांना जाब विचारल्याचेही दिसून आले होते. या सगळ्या घटना आणि घडामोडींचा परिणाम मतपेटीवर किती होतो ? याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.

R

Vasant Chavan, Ashok Chavan, Pratap Patil-Chikhalikar
Ashok Chavan News : अशोक चव्हाणांची मोठी राजकीय भविष्यवाणी, म्हणाले 'लोकसभेनंतर...'

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com