Raj Thackeray : '2024 ला मनसेच्या पाठिंब्यावर भाजपचा मुख्यमंत्री, तर 2029 ला...'; राज ठाकरेंचा मोठा दावा

MNS Support for BJP Chief Minister 2024: 2014, 2019 च्या विधानसभा निवडणुकीत अवघ्या एका जागेवर समाधान मानावे लागले होते. त्यामुळे,पण यंदाच्या निवडणुकीत राज ठाकरेंनी पूर्ण ताकद पणाला लावली आहे.त्यामुळे किती जागा जिंकणार याकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहेत.
Raj Thackeray News
Raj Thackeray News Sarkarnama
Published on
Updated on

Mumbai News : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे.महायुती-महाविकास आघाडीतील जागावाटप आता निश्चित झालं आहे.मतदानाची तारीख जमा जवळ येत असतानाच आरोप- प्रत्यारोपांनी राजकीय वातावरण तापू लागलं आहे.यंदाच्या निवडणुकीत महायुतीची सत्ता आणायची आहे,

मात्र, 2029 च्या निवडणुकीत महाराष्ट्रात स्वबळावर सत्ता आणून भाजपचा मुख्यमंत्री करण्याचा इरादा केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी बोलून दाखवला.त्याचवेळी आता मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनीही (Raj Thackeray ) मोठं विधान केलं आहे.

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी एका वृत्तवाहिनीच्या कार्यक्रमात मोठं भाकीत केलं आहे. ते म्हणाले,आगामी 2024 च्या विधानसभा निवडणुकीत महाराष्ट्रात मुख्यमंत्री भाजपचाच होईल, असं विधान केलं आहे. याशिवाय 2029 च्या निवडणुकीत मनसेचाच (MNS) मुख्यमंत्री होईल,अशी भविष्यवाणी केली आहे. त्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.

राज ठाकरेनी महाराष्ट्रात पुन्हा एकदा महायुतीचं सरकार येणार असल्याची सूचक प्रतिक्रिया दिली आहे. तसेच त्यांनी अशाप्रकारे देवेंद्र फडणवीस यांना पुन्हा एकदा मुख्यमंत्रीपद मिळण्याची शक्यता असल्याचे संकेत दिले आहेत. निवडणुकीच्या निकालानंतर महायुतीचं सरकारला सत्तेत येण्यासाठी मनसेचा पाठिंबा घ्यावा लागेल असाही इशारा दिला आहे.

Raj Thackeray News
ShivSenaUBT : पवारसाहेबांच्या खासदाराला ठाकरेंच्या कडवट शिवसैनिकांचे आव्हान

मनसेकडून यंदाच्या निवडणुकीत राज ठाकरेंनी सुरुवातीला 250 च्या आसपास जागा लढण्याची घोषणा केली होती.पण प्रत्यक्षात 138 जागांवरच उमेदवार दिले आहे. ठाकरेंनी युतीशी जुळवून न घेता स्वबळावर लढण्याचा निर्णय घेतला आहे.त्यात एकूण सात वेगवेगळ्या याद्यांमधून मनसेचे उमेदवार जाहीर करण्यात आले आहे.

2014, 2019 च्या विधानसभा निवडणुकीत अवघ्या एका जागेवर समाधान मानावे लागले होते. त्यामुळे,पण यंदाच्या निवडणुकीत राज ठाकरेंनी पूर्ण ताकद पणाला लावली आहे.त्यामुळे किती जागा जिंकणार याकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहेत.

Raj Thackeray News
Maharashtra Assembly Election : सर्वाधिक विद्यमान आमदारांना कुणी बसवलं घरी? अशी आहे राज्यातील स्थिती...

मनसेकडून यंदा राज ठाकरेंचे सुपुत्र अमित ठाकरेंना माहिममधून मैदानात उतरवलं आहे. त्यांच्यासमोर महायुती घटक पक्ष असलेल्या शिवसेनेच्या सदा सरवणकर यांच्यासह महाविकास आघाडीतील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचंही तगडं आव्हान आहे.ठाकरेंच्या शिवसेनेकडून महेश सावंतला माहिममधून उमेदवारी दिली आहे.

2019 पहिल्यांदा निवडणुकीत उतरलेल्या आदित्य ठाकरेंविरोधात राज ठाकरेंनी उमेदवार दिला नव्हता. पण उद्धव ठाकरेंनी पुतण्या अमितविरुद्ध मैदानात उमेदवार उतरवला आहे. यावर राज ठाकरेंनी भाष्य केले. ते म्हणाले, अमित विरोधात माहीममध्ये उमेदवार देणे हा, हा प्रत्येकाचा स्वभावाचा भाग झाला आहे. प्रत्येकजण आपल्या स्वभावानुसार वागत असतो. भाजपसारख्या मॅच्युअर्ड पक्षांना ही गोष्ट कळू शकते, सगळ्यांनाच हे कळेल असं नाही. आपण कोणाला कुठे आणि किती सांगायला जाणार, असे राज ठाकरे यांनी म्हटले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com