आखाडा बाळापूर (जि. हिंगोली) : विधान परिषदेच्या सदस्या डॉ. प्रज्ञा सातव (Pradnya satav) यांच्यावर कसबे धावंडा (ता. कळमनुरी) येथे बुधवारी रात्री हल्ला (Attack) झाला होता. याप्र करणी डॉ. सातव यांच्या तक्रारीवरून गुरुवारी पहाटे आखाडा बाळापूर पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद झाला. पोलिसांनी महेंद्र तुकाराम डोंगरदिवे या संशयिताला अटक (Arrest) केली आहे. कळमनुरी न्यायालयाने त्याला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी (judicial custody) दिली आहे. (Attack on Pradnya satav; Accused remanded to 14 days judicial custody)
याबाबतची माहिती सहायक पोलिस निरीक्षक बोधनापोड यांनी दिली. कसबे धावंडा येथे बुधवारी रात्री आठच्या सुमारास आमदार सातव या कार्यकर्त्यांच्या भेटीसाठी गेल्या होत्या. तेथे त्या संवाद साधत असताना पाठीमागून आलेल्या एक व्यक्तीने डॉ. सातव यांना चापट मारली. त्यांच्यासोबतच्या सुरक्षा रक्षकालाही धक्का देऊन कामात अडथळा निर्माण केला. या प्रकाराचा माहिती डॉ. सातव यांनी काल रात्री ट्विट करून दिली होती. त्यामुळे आखाडा बाळापूर, कळमनुरी, वसमत, हिंगोली येथील कार्यकर्त्यांनी पोलिस ठाण्यात गर्दी केली होती. संशयित डोंगरदिवे याच्याविरुद्ध गुन्हा नोंदविण्याता आला हेाता.
सातव कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करीत असताना महिलांनी गावात दारूबंदीची मागणी केली. तसा प्रयत्न करण्याचे आश्वासन त्या महिलांना देत होत्या. त्याच वेळी दारूच्या नशेत असलेल्या डोंगरदिवे याला राग येऊन त्याने सातव यांना चापट मारली, अशी परिसरात चर्चा आहे. तो कोणत्याही राजकीय पक्षाशी संबंधित नाही, असेही सांगण्यात आले.
दरम्यान, संशयित महेंद्र डोंगरदिवे याला बाळापूर पोलिसांनी अटक केल्यानंतर कळमनुरी न्यायालयाने त्याला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी आज दिली असल्याची माहिती सहायक पोलिस निरीक्षक बोधनापोड यांनी दिली.
सखोल तपास करण्याची मागणी
आमदार डॉ. प्रज्ञा सातव यांच्यावर झालेल्या हल्ल्यामागे षडयंत्र आहे का, असा प्रश्न जिल्ह्यातील महाविकास आघाडीचे नेते, कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांनी केला. जिल्हा पोलिस अधीक्षकांना आज निवेदन देऊन हल्ल्याचा निषेध केला आणि तपास करण्याची मागणी केली.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.