Pradnya Satav Attack : पोरानं दारुच्या नशेत मोठी चूक केलीय; त्याच्या लेकरांकडं बघून एकवेळ माफ करा : आरोपीच्या आईची प्रज्ञा सातवांना विनंती

प्रज्ञाताई यांच्यावर हल्ला करणं लयं चुकीचं झालं आहे.
Mahendra's Mother & Pradnya satav
Mahendra's Mother & Pradnya satavSarkarnama

हिंगोली : आमच्या मुलाकडून मोठी चूक झालीय, प्रज्ञाताईंवर हल्ला करणं लय चुकीचं झालं आहे. पण, या मुलाचं लहान लहान लेकरं आहेत, त्यांच्याकडं बघून एकवेळ ताईंना माफ करा म्हणावं, अशी काकुळतीची विनंती आरोपी महेंद्र याच्या आई वडिलांनी आमदार प्रज्ञा सातव (Pradnya Satav) यांच्याकडे केली आहे. (Accused's mother's plea to Pradnya Satav for forgiveness)

आमदार प्रज्ञा सातव यांच्यावर बुधवारी (ता. ९ फेब्रुवारी) कळमनुरी तालुक्यातील कसबे धावंडा येथे हल्ला करण्यात आला आहे. त्या हल्लेखोराला काँग्रेस कार्यकर्ते आणि ग्रामस्थांनी पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले आहे. त्याने हा हल्ला आपण स्वतःहून केला नसून तो आपल्याला करायला लावला आहे, असे सांगितले आहे. त्यामुळे या हल्ल्याचे गूढ वाढले आहे.

Mahendra's Mother & Pradnya satav
Pradnya Satav News : प्रज्ञा सातव यांचा मोठा गौप्यस्फोट : नोव्हेंबरमध्येही माझ्यावर हल्ल्याचा प्रयत्न; पण मी सिरियसली घेतले नव्हते...

दुसरीकडे महेंद्र याच्या आईवडिलांनी माफी मागणीसाठी प्रज्ञा सातव यांचे घर गाठत टाहो फोडला आहे. आमच्या मुलाकडून चूक झाली आहे. आमचा मुलगा शेळ्या राखतो, त्याने दारुच्या नशेत हे कृत केले आहे. एकवेळ त्याला माफ करा, अशी विनंती त्यांनी आमदार सातव यांना केली आहे. ताईकडे माफी मागायला आम्ही आलो आहोत. ताईला माफ करा म्हणावं. आम्ही माफी मागतो हो साहेब. आमच्या मुलाला लहान लहान लेकरं आहेत. आमच्या मुलाकडून चुकीचं झालंय. प्रज्ञाताई यांच्यावर हल्ला करणं लयं चुकीचं झालं आहे, अशी कबुली महेंद्र याच्या आईवडिलांनी दिली आहे.

Mahendra's Mother & Pradnya satav
Pradnya Satav Attack : मी स्वतःहून हल्ला केला नाही; मला करायला लावला : हल्लेखोराने कबुली दिल्याचा सातव यांचा दावा

आमदार प्रज्ञा सातव आमच्या गावात आला होता, त्या वेळी तो बाहेर होता. एकदा क्षमा करावी, यासाठी आम्ही ताईकडं आलोय. तो शेळ्या वळतोय, आम्ही मजुरी करतोय. सून कामाला जाते. एवढा वाईट टायम आम्हाला आणू नको, असं आम्ही महेंद्रला म्हटलं आहे. आम्ही गुन्हा मान्यच करतो, पाया पडतो. लहान लेकरंकडं बघून ताईला म्हणावं एकवेळ माफ करावं, अशी विनंती त्यांनी सातव यांच्या घरापुढे केली.

Mahendra's Mother & Pradnya satav
Ajit Pawar News: प्रज्ञा सातव यांच्यावरील हल्ल्यानंतर अजित पवार संतापले; शिंदे,फडणवीसांना म्हणाले...

या अगोदर त्यानं असं कुठलंही कृत केलेलं नाही. आमचा मुलगा कशातही नसतो. आम्ही त्याला खूप बोललो. पण आम्हाला एकदा माफ करावं ताईंनी एवढंवेळ क्षमा करावी, अशी मागणी ढसाढसा रडत त्यांनी केली आहे.

Mahendra's Mother & Pradnya satav
Shahaji Bapu Patil Accident News : आमदार शहाजीबापू पाटील यांच्या ताफ्यातील गाडीला अपघात; एक ठार, एक चिंताजनक

दरम्यान, तुमच्या मुलाला कोणी काहीही केलेले नाही. त्याला माफ करण्यासाठी तुम्ही प्रज्ञा सातव यांच्याशी संपर्क साधावा, असे सातव यांच्या कार्यकर्त्यांकडून महेंद्र याच्या आई वडिलांना सांगण्यात आलेले आहे. या सर्व प्रकारानंतर प्रज्ञा सातव काय निर्णय घेतात, हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com