Beed Crime : 'संतोष देशमुख पार्ट-2 करणार, तुझ्या *** तीन कोयते...', परळी मारहाण प्रकरणात मुंडेची ऑडिओ क्लीप व्हायरल

Samadhan Munde Shivraj Divate Audio Clip : झा काही दोष नव्हता मी केवळ सप्ताहात भांडण लागले तेथे उभाा होतो. पण मला उचलून जंगलात नेण्यात आले आणि काठी, बेल्ट, राॅडने मारहाण करण्यात आल्याचे देखील शिवराज दिवटे म्हणाला.
Viral audio exposes Samadhan Munde’s threatening behavior towards Shivraj Divate.
Viral audio exposes Samadhan Munde’s threatening behavior towards Shivraj Divate.sarkarnama
Published on
Updated on

Beed Crime News : परळी तालुक्यात शिवराज दिवटे या तरुणाला काठ्या, बेल्टने बेदम मारहाण करण्यात आल्याचे प्रकरण समोर आले आहे. या प्रकरणात 20 जणांवर गुन्हा दाखल झाला आहे. या प्रकरणातील आरोपी समाधान मुंडे याची मारहाण करण्याची आधीची धमकी देणारी ऑडिओ क्लिप व्हायरल झाली आहे.

या क्लिपमध्ये समाधान मुंडे शिवराज दिवटे याला धमकावत असल्याचे ऐकायला मिळत आहे. तो म्हणतोय 'तू माझा भाई रोहितला पण राँग बोलला. तुझे तीन शब्द राँग झालेत. नाय याच्या ***वर तीन कोयते घातले तर बघ. तू परळीला ये तुला दाखवतो.'

Viral audio exposes Samadhan Munde’s threatening behavior towards Shivraj Divate.
Uddhav Thackeray reaction : ‘स्वर्गातील नरक’वरून राजकारण तापलं ! पुस्तक वाचताच उद्धव ठाकरेंची घणाघाती प्रतिक्रिया; थेट म्हणाले...

आरोपींनी शिवराज दिवटे याला तू भांडणात मध्ये का पडलात? या कारणावरून जलालपूर येथील रत्नेश्वर टेकडीवर नेत काठी आणि बेल्टने बेदम मारहाण केली यावेळी तुझा संतोष देशमुख पार्ट 2 करू असे म्हणत जीवे मारण्याची धमकी दिली. मारहाण करताना व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. मला मारहाण करताना दोन व्यक्तिंनी पाहिले त्यामुळे आपली सुटका झाली, असे शिवराज दिवटे यांनी दिली.

मनोज जरांगे शिवराजची घेणार भेट

माझा काही दोष नव्हता मी केवळ सप्ताहात भांडण लागले तेथे उभाा होतो. पण मला उचलून जंगलात नेण्यात आले आणि काठी, बेल्ट, राॅडने मारहाण करण्यात आल्याचे देखील दिवटे याने सांगितले. दरम्यान, मनोज जरांगे पाटील आज बीडच्या दौऱ्यावर जाणार आहेत. ते जखमी शिवराज दिवटे याची भेट घेणार आहेत.

या प्रकरणाला जातीय रंग देऊ नका

शिवराज दिवटे याला मारहाण झाल्यानंतर सोशल मिडियामध्ये मराठा विरुद्ध वंजारी असे स्वरुप या प्रकरणाला काही जण देण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यावर बीडचे पोलिस अधिक्षक यांनी सांगितले की, या प्रकरणात 20 जणांवर गुन्हा नोंद झाला आहे. यात कुठेही जातीचा संबंध नाही. आरोपी विविध जाती आहेत. एका जातीचे नाहीत. या प्रकरणाला जातीय रंग देऊ नये. सोशल मीडियावर प्रक्षोभक पोस्ट करू नये.

Viral audio exposes Samadhan Munde’s threatening behavior towards Shivraj Divate.
Local Body Elections: शिंदेसेना-भाजपमध्ये चुरस! जास्त जागा मिळवण्याची चढाओढ

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com