Uddhav Thackeray reaction : ‘स्वर्गातील नरक’वरून राजकारण तापलं ! पुस्तक वाचताच उद्धव ठाकरेंची घणाघाती प्रतिक्रिया; थेट म्हणाले...

Swargatil Narak book news : शंभर दिवसातील प्रवास आणि महाविकास आघाडी आणि भाजप तसेच अनेक नेत्यांबद्दल या पुस्तकात अनेक गौप्यस्फोट केले आहेत. या पुस्तकावरून सत्ताधारी व विरोधकांकडून आरोप-प्रत्यारोप सुरू झाले आहेत.
Sanjay Raut, Uddhav Thackeray
Sanjay Raut, Uddhav ThackeraySarkarnama
Published on
Updated on

Mumabi news : शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत तब्बल 100 दिवस तुरुंगवासात होते. त्यांनी या शंभर दिवसात आलेल्या अनुभवावर "नरकातला स्वर्ग" हे पुस्तक लिहिले आहे. यामध्ये त्यांच्या शंभर दिवसातील प्रवास आणि महाविकास आघाडी आणि भाजप तसेच अनेक नेत्यांबद्दल या पुस्तकात अनेक गौप्यस्फोट केले आहेत. या पुस्तकावरून सत्ताधारी व विरोधकांकडून आरोप-प्रत्यारोप सुरू झाले आहेत. विशेषतः पुस्तकात महाविकास आघाडीचे सरकार स्थापन करताना व त्यानंतरच्या घडामोडीवर भाष्य करण्यात आले आहे, त्यामुळे त्यावर राजकीय गोटातून तीव्र प्रतिक्रिया येत आहेत.

"नरकातला स्वर्ग" या पुस्तकाचे प्रकाशन ज्येष्ठ नेते शरद पवार व माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे या मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. या पुस्तकाच्या प्रकाशनानंतर महाराष्ट्रातील राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे. ‘स्वर्गातील नरक' या पुस्तकावरून राज्यातील राजकारण चांगलेच तापलं असताना पुस्तक वाचताच उद्धव ठाकरेंनी (Uddhav Thackeray) घणाघाती प्रतिक्रिया देत सर्वांचे लक्ष वेधून घेतले.

Sanjay Raut, Uddhav Thackeray
Local Body Election: वॉर्डातील सगळ्या मोक्याच्या जागांवर लग्गीच ‘फ्लेक्स’ लावायला पायजे!

संजय राऊत (Sanjay Raut) यांनी या पुस्तकात त्यांनी तुरुंगातील अनुभव, राजकीय दबाव आणि बाळासाहेब ठाकरे यांच्याशी संबंधित काही वादग्रस्त प्रसंग उघड केले आहेत. त्यामुळे हे पुस्तक चांगलेच चर्चेत आले आहे. पुस्तकाचे काम पूर्ण झाल्यानंतर राऊत यांनी हे पुस्तक वाचण्यासाठी उद्धव ठाकरे यांना दिले होते. पुस्तक वाचून झाल्यानंतर राऊत यांनी पुस्तकाविषयी विचारणा केली. त्यानंतर ठाकरे यांनी थेटच सांगितले की, पुस्तक कसे वाटले या बाबत मी प्रकाशन सोहळ्याप्रसंगी सांगेनच मात्र एक वाक्यात सांगतो की 'यामध्ये कसलेच रडगाणे नाही' अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली.

Sanjay Raut, Uddhav Thackeray
Sharad Pawar : फडणवीसांनी 'बालसाहित्य' म्हणून हिणवलेल्या संजय राऊतांच्या पुस्तकावर शरद पवारांकडून कौतुकाचा वर्षाव, म्हणाले....

ठाकरे यांनी दिलेल्या प्रतिक्रियेचा हा किस्सा संजय राऊत यांनी भर भाषणातच सांगितला. प्रकाशन सोहळ्याप्रसंगी बोलताना उद्धव ठाकरे यांनी राज्यातील महायुती सरकारच्या कारभारावर सडकून टीका केली. "हे सरकारही उद्या जाणार आहे. ज्यांनी आपल्या स्वर्गासारख्या देशाला नरक करण्याचा प्रयत्न केला आहे, त्यांना नरकात टाकण्यासाठी आपल्याला लढावं लागेल. टाका त्यांच्यावर धाडी.. बसवा त्यांना सुद्धा जेलमध्ये.." असे म्हणत ठाकरे यांनी केंद्र सरकारवर टीका केली.

Sanjay Raut, Uddhav Thackeray
Beed Crime : शिवराज दिवटेला मारहाण करणं चांगलंच अंगलट येणार; अजितदादांच्या पोलिसांना सूचना आरोपींना थेट मकोका?

या कार्यक्रमानंतर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याबद्दल विचारल्यावर ठाकरे म्हणाले, "मला आठवत नाही. कारण आपल्या घराण्याने, वाडवडिलांनी कोणावर उपकार केले असतील तर ते मोजायचे नसतात. उपकाराची फेड ही कृतज्ञतेने करायची की अपकाराने करायची हे प्रत्येकावर अवलंबून असते."

Sanjay Raut, Uddhav Thackeray
Chhagan Bhujbal : धक्कादायक ! छगन भुजबळांच्या पीएकडे एक कोटींची खंडणी मागणाऱ्यास अटक; आयकर छापा टाकणार असल्याची दाखवली भीती

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com