Kishori Pednekar : 'आमदार पैशांच्या पेट्या घेऊन बसलेत, आजचा निकाल हा केवळ जय-पराजयाचा नसून तो निष्ठेचा की खोक्यांचा हे ठरवणारा...'; ठाकरेंच्या शिवसेनेचा हल्लाबोल
Municipal Election Result : राज्यातील नगरपरिषद आणि नगरपंचायतीचा निकाल आज जाहीर होणार आहे. मात्र, आजचा निकाल हा केवळ जय-पराजयाचा नसून तो निष्ठेचा की खोक्यांचा हे ठरवणारा असेल, असं वक्तव्य ठाकरेंच्या शिवसेनेच्या नेत्या किशोरी पेडणेकर यांनी केलं आहे.
किशोरी पेडणेकर यांनी नगरपरिषद आणि नगरपंचायतीचा निकाल जाहीर होण्याआधीच महायुती सरकार आणि राज्य निवडणूक आयोगावर गंभीर आरोप करत सडकून टीका केली आहे. माध्यमांशी संवाद साधताना पेडणेकर म्हणाल्या की, सध्या महाराष्ट्रात सत्तेतून पैसा आणि पैशातून सत्ता हेच समीकरण सुरू आहे.
आजचा निकाल हा केवळ जय-पराजयाचा नसून तो निष्ठेचा की खोक्यांचा हे ठरवणारा असेल. दरम्यान, यावेळी त्यांनी निवडणूक आयोगाच्या भूमिकेवर संताप व्यक्त केला. निवडणूक आयोग शुद्धीवर आहे का? असा थेट सवाल करत मतदारांच्या याद्यांमध्ये घोळ घालणे आणि निवडणुका जाणीवपूर्वक लांबणीवर टाकणे हे मतदारांना कमकुवत करण्याचे षडयंत्र आहे.
आज अनेक ठिकाणी आमदार पैशांच्या पेट्या घेऊन बसलेत, असा खळबळजनक आरोप करत सध्या सत्तेतून पैसा आणि पैशातून पुन्हा सत्ता मिळवण्याचा हा प्रयत्न महाराष्ट्राच्या संस्कृतीला घातक असल्याचंही पेडणेकर म्हणाल्या. सत्ताधाऱ्यांनी वाटलेला पैसा त्यांच्या घरचा नसून तो जनतेचाच आहे, याचे भान मतदारांनी ठेवले पाहिजे.
जनतेने पैशाला भुलून नाही तर विचार करून मतदान केले आहे, त्यामुळे आज निष्ठेचाच गुलाल उधळला जाईल, असा विश्वास व्यक्त करत त्यांनी निलेश आणि नितेश राणे यांच्यावर निशाणा साधला. एका घरातच दोन भाऊ एकमेकांचे कपडे फाडत आहेत आणि पैशांच्या बॅगा पकडून दिल्या जात आहेत, असा टोला त्यांनी राणेंना लगावला.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.
