Winter Session 2023 : सभागृहाची इच्छा असेल तर बीड जाळपोळप्रकरणी दोन दिवसांत एसआयटी; फडणवीसांची घोषणा

Beed Arson case : लोकप्रतिनिधींचे संरक्षण करण्याची ताकदही आता महाराष्ट्र पोलिसांमध्ये राहिली नाही, असा मी निष्कर्ष काढेन.
Devendra Fadnavis-Jayant Patil-Sandeep Kshirsagar
Devendra Fadnavis-Jayant Patil-Sandeep KshirsagarSarkarnama
Published on
Updated on

Nagpur News : बीड जाळपोळ प्रकरणाची विधानसभेत आज (ता. १५ डिसेंबर) चर्चा झाली. या वेळी बीडचे आमदार संदीप क्षीरसागर यांनी आपबिती सांगताना या जाळपोळ प्रकरणाचा मास्टरमाईंड शोधण्याची मागणी केली. राष्ट्रवादीचे आमदार जयंत पाटील यांनी पोलिसांकडून आमदारांना संरक्षण का मिळाले नाही, असा सवाल केला. आमदारांच्या प्रश्नांना उत्तर देताना सर्व सभागृहाची इच्छा असेल तर बीड जाळपोळप्रकरणी दोन दिवसांत एसआयटीची स्थापना करण्यात येईल, असे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केले. (If the House wishes, SIT in two days in Beed arson case: Fadnavis' announcement)

मराठा आरक्षणाच्या मुद्यावरून राज्यात वातावरण पेटलेले असताना बीडमध्ये आमदारांची घरं जाळण्यात आली होती. त्यात माजलगावचे आमदार प्रकाश सोळंके, बीडचे आमदार संदीप क्षीरसागर आणि माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर यांची घरं जाळली. त्यावर विधानसभेत आज चर्चा झाली. त्यावेळी क्षीरसागर यांनी आपबिती सांगितली.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

आमदार संदीप क्षीरसागर म्हणाले की, मराठा आणि ओबीसींमध्ये तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न काही लोकांनी केला आहे. माझं घर जळालं आहे, माझं कुटुंब अडचणीत होतं. माझा मुलगासुद्धा आतमध्ये होता. बीडमध्ये जो प्रकार झाला आहे, त्यातील को ऑर्डिनेटरकडून मास्टरमाईंड कोण आहेत, हे बाहेर काढलं पाहिजे. या प्रकरणाचा तपास करून बीडमधील जाळपोळ प्रकरणातील मास्टरमाईंड महाराष्ट्रासमोर आला पाहिजे. या प्रकरणाची न्यायालयील चौकशी करण्यात यावी.

समोर पोलिस हेडक्वॉर्टर असूनही आपण विधानसभा सदस्यांचे संरक्षण करत नसू परिस्थिती अवघड आहे. सामान्य माणूस तर लांबच आहे आता. लोकप्रतिनिधींचे संरक्षण करण्याची ताकदही आता महाराष्ट्र पोलिसांमध्ये राहिली नाही, असा मी निष्कर्ष काढेन. बीडमधील जाळपोळ प्रकरणाचा अंदाज गुप्तचर शाखेला का आला नाही. पण माझी माहिती आहे की, गुप्तचर शाखेला जाळपोळीचा अंदाज आला होता. हे होणार याची संपूर्ण माहिती त्यांना होती, असा दावा जयंत पाटील यांनी केला.

Devendra Fadnavis-Jayant Patil-Sandeep Kshirsagar
Chhagan Bhujbal News : होय, भुजबळांनी मोठमोठ्यांना अंगावर घेतले; पण स्वबळावर नव्हे; तर इतरांच्या...

आमदारांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांना गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उत्तर दिले. ते म्हणाले की, अंतरवाली सराटीत ज्या वेळी पोलिसांनी थोडी कडक कारवाई केली. त्या वेळी राज्यातील मोठमोठ्या नेत्यांनी पोलिसांना टार्गेट केले. बीडमधील जाळपोळ प्रकरणी एसआयटी स्थापन करण्याची सर्व सभागृहाची इच्छा असेल तर यासंदर्भात आम्ही दोन दिवसांत एसआयटी स्थापन करू. त्यांच्याकडे हे प्रकरणी चौकशीसाठी सोपवण्यात येईल, अशी घोषणा गृहमंत्र्यांनी विधानसभेत केली.

Devendra Fadnavis-Jayant Patil-Sandeep Kshirsagar
Assembly Winter Session : राणेंच्या आरोपानंतर भुसे, शेलार आक्रमक; फडणवीसांनी केली SIT चौकशीची घोषणा

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com