Babajani Durrani Threat Case : माजी आमदार बाबाजानी दुर्रानींच्या धमकीने मुख्याधिकाऱ्यांना हार्ट अटॅक? नगरपालिकेत जोरदार राडा

Pathri municipal controversy : यापूर्वीही माजी आमदार बाबाजानी दुर्राणी यांनी प्रशासक काळात मुख्याधिकाऱ्यांच्या खुर्चीवर बसून एका कर्मचाऱ्याला मारहाण केल्याची घटना घडली होती. अशाच घटनांमुळे पाथरी पालिकेत काम करण्यास अधिकारी धजावत नसल्यानेच पालिकेला पूर्णवेळ मुख्याधिकारी मिळत नसल्याची चर्चा आहे.
Babajani Durrani
Pathri municipal employees protest after officer Jaywant Sonawane was hospitalized following an alleged threat by Babajani Durrani, highlighting rising administrative tensions.Sarkarnama
Published on
Updated on

Parbhani News, 18 Mar : माजी आमदार तथा परभणी जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष बाबाजानी दुर्राणी यांनी पाथरी नगरपरिषदेचे मुख्याधिकारी यांना शिवीगाळ करत धमकी दिली. त्यानंतर त्यांना हृदयाचा त्रास झाल्याचा आरोप कर्मचारी संघटनांनी केला. त्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांकडे दुर्राणी यांची लेखी तक्रार करत लेखणीबंद आंदोलन केले.

या घटनेने वातावरण चांगलेच तापले होते. दरम्यान, मुख्याधिकाऱ्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. माजी आमदार बाबाजानी दुर्राणी यांनी शिवीगाळ व धमकी दिल्यानंतर पालिकेचे मुख्याधिकारी जयवंत सोनवणे यांना हृदयाचा त्रास झाल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. ही घटना मंगळवारी घडली.

घटनेच्या निषेधार्थ पालिका कर्मचाऱ्यांनी बुधवारी काम बंद आंदोलन केले. पालिकेच्या सर्व कर्मचाऱ्यांनी जिल्हाधिकारी यांना दिलेल्या निवेदनात पालिकेचे मुख्याधिकारी जयवंत सोनवणे यांना माजी आमदार बाबाजानी दुर्राणी यांनी मंगळवारी धमकीवजा शिवीगाळ केल्याचा आरोप केला.

Babajani Durrani
भविष्य जाणून घेण्यासाठी बड्या नेत्यांच्या रांगा, चाकणकरांकडून पाद्यपूजा : बलात्कार प्रकरणी अटकेत असलेल्या कॅप्टन खरातची हिस्ट्री...

त्यानंतर जयवंत सोनवणे यांना ह्रदयविकाराचा झटका आला आणि त्यांना तातडीने रुग्णालयात भरती करावे लागले. त्यानंतर संतप्त झालेल्या कर्मचाऱ्यांनी घटनेच्या निषेधार्थ आज बुधवार रोजी लेखणी बंद आंदोलन केले. जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवदेनात माजी आमदार बाबाजानी दुर्राणी यांच्यावर कारवाईची मागणी करण्यात आली आहे.

निवेदनावर मुरलीधर ढवळे, एम.बी.जोशी, विश्वजीत शहापुरकर, सुभाष लांडगे, अशोक वाघूम्बरे, प्रकाश पितळे, नजीर अहेमद खान, राजेश गवारे, मुंजाजी बेदरे यांच्यासह सर्व कर्मचाऱ्यांच्या स्वाक्षऱ्या आहेत. दरम्यान या घटनेचे तीव्र पडसाद पालिकेच्या कामकाजावर उमटले असून आंदोलनामुळे कार्यालयात कामकाजासाठी येणाऱ्या नागरिकांची गैरसोय झाली.

Babajani Durrani
Mahayuti Government: मागासवर्गीयांच्या निधींवर सरकारचा 'डोळा'! महत्त्वाकांक्षी योजनेसाठी पैसे वळवणार; 'लाडकी बहीण'चा कित्ता गिरवला!

पूर्ण वेळ मुख्याधिकारी मिळेना

यापूर्वीही माजी आमदार बाबाजानी दुर्राणी यांनी प्रशासक काळात मुख्याधिकाऱ्यांच्या खुर्चीवर बसून एका कर्मचाऱ्याला मारहाण केल्याची घटना घडली होती. अशाच घटनांमुळे पाथरी पालिकेत काम करण्यास अधिकारी धजावत नसल्यानेच पालिकेला पूर्णवेळ मुख्याधिकारी मिळत नसल्याची चर्चा आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com