Maharashtra Loan Waiver Protest : ‘शेतकरी सक्षम नाही’, बच्चू कडू यांची पुढच्या लढाईची तयारी; देवाभाऊंची वाढली डोकेदुखी!

Farmers in Amravati Waigaon honored Bachchu Kadu with a unique “Ladoo Tula” as he intensifies agitation against the BJP Mahayuti government over loan waiver demands : अमरावती जिल्ह्यातील वायगाव इथं राज्य सरकारच्या कर्जमाफीवर बच्चू कडू यांच्यासह शेतकऱ्यांनी कर्जमाफी आनंद उत्सव साजरा केला.
Bachchu Kadu latest news
Bachchu Kadu latest newsSarkarnama
Published on
Updated on

Bachchu Kadu latest news : राज्यातील महायुती सरकारने जाहीर केलेल्या शेतकरी कर्जमाफीसाठी प्रहार जनशक्ती पक्षाचे प्रमुख तथा माजी मंत्री बच्चू कडू यांनी संघर्ष केला. राज्यासह, अमरावतीच्या मेळघाटात संघर्ष यात्रा काढला. नागपूर चक्का जाम आंदोलन केलं.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अर्थसंकल्पीय अधिवेशनात कर्जमाफीची घोषणा केली. याचा आंनदोत्सव साजरा करताना बच्चू कडू यांनी, 'कर्जमाफी म्हणजे शेतकरी सक्षम होणे नाही. या पुढची लढाई शेतकऱ्यांच्या शेतमालाला हमीभाव मिळावा यासाठी असेल', असे जाहीर केलं.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी अर्थसंकल्पात राज्यातील शेतकऱ्यांसाठी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कर्जमाफी योजने अंतर्गत 2 लाख रुपयांपर्यंत कर्जमाफी जाहीर केली. 30 सप्टेंबर 2025पर्यंत थकीत पीक कर्ज असलेले शेतकरी या योजनेसाठी पात्र असतील. यासोबतच, नियमित कर्ज परतफेड करणाऱ्यांना 50 हजार रुपये प्रोत्साहनपर अनुदानही दिले जाणार आहे.

या कर्जमाफीसाठी प्रहार जनशक्ती पक्षाचे प्रमुख तथा माजी मंत्री बच्चू कडू यांनी महाराष्ट्रभर आंदोलन केलं. शेतकऱ्यांच्या (Farmer) या कर्जमाफीत बच्चू कडू यांच्या संघर्षाचा मोठा वाटा असून, यासाठी अमरावती जिल्ह्यातील वायगाव इथं राज्य सरकारच्या कर्जमाफी निर्णयावर बच्चू कडू यांच्या उपस्थितीत “कर्जमाफी आनंद उत्सव” उत्साहात साजरा करण्यात आला.

Bachchu Kadu latest news
Prakash Ambedkar Vs Bacchu Kadu : बच्चू कडूंचा ट्रॅक्टर मोर्चा, आंबेडकरांची खोचक प्रतिक्रिया; मंत्रिपद असताना काय ** मारत होता का?

या कार्यक्रमात बच्चू कडू यांची भव्य लाडू तुला करण्याचे नियोजन होते. मात्र बच्चू कडूंनी स्वतःची लाडू तुला करण्यास स्पष्ट नकार दिला. कर्जमाफीचा खरा सन्मान नेत्यांचा नसून संघर्ष करणाऱ्या शेतकऱ्यांचा आहे, अशी भूमिका बच्चू कडू यांनी सांगितली. यानंतर बच्चू कडू यांनी उपस्थितांपैकी एका शेतकऱ्याची लाडू तुला करून गौरव केला.

Bachchu Kadu latest news
Maharashtra Government : फडणवीस सरकारने कर्जमाफीचे आंदोलन मॅनेज केले? बच्चू कडूंसह अर्धा डझन शेतकरी नेत्यांना खरंच फसवले का?

वेळेवर कर्ज फेडणाऱ्या प्रामाणिक शेतकऱ्यांना सुमारे दीड ते दोन लाखापर्यंत प्रोत्साहन निधी मिळाले पाहिजे. यासाठी 27 तारखेला मोठा निर्णय घेणार आहोत. यासाठी शेतकऱ्यासमवेत बैठक आयोजित केली आहे. या बैठकीला किती प्रतिसाद मिळतो, यावर सर्व काही ठरेल. अन्यथा प्रामाणिकपणाला शिक्षा मिळण्याची परिस्थिती निर्माण होईल, असं मत व्यक्त केलं.

कर्जमाफी म्हणजे, शेतकरी सक्षम होणे नाही. या पुढची लढाई शेतकऱ्यांच्या शेतमालाला हमीभाव मिळावा यासाठी असणार आहे. वारंवार शेतकरी कर्जमाफी हा निर्णय योग्य नाही. परंतु, शेती मालाला हमी भाव मिळाल्यास, शेतकऱ्या कर्जमाफी देण्याची वेळच येणार नाही. यासाठी पुढची लढाई ही फक्त शेतीला हमीभाव मिळवण्याची राहील, अशी घोषणा बच्चू कडू यांनी केली.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com