Bajrang Sonwane : बजरंग सोनवणे अडकले केजमध्ये; लोकसभेत बाजी, पण जिल्हाभरातील प्रभाव ओसरला

Bajrang Sonwane political journey : लोकसभेत यश मिळवलेल्या बजरंग सोनवणे यांचा स्थानिक पातळीवरील प्रभाव कमी होत असल्याचे राजकीय विश्लेषण.
Bajrang Sonavane
Bajrang Sonavane Sarkarnama
Published on
Updated on

NCP (SP) Politics News : लोकसभा निवडणुकीत बीडमध्ये भाजपच्या उमेदवार पंकजा मुंडे यांचा पराभव करत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे बजरंग सोनवणे निवडून आले. महाराष्ट्राच्या राजकारणातील हा सर्वात धक्कादायक निकाल म्हणून याकडे बघितले गेले. बजरंग सोनवणे हे जायंट किलर ठरले खरे, पण हा करिश्मा त्यांना पुढे विधानसभा आणि आता झालेल्या नगर पालिका निवडणुकीत टिकवता आले नाही.

बीडचे आमदार संदीप क्षीरसागर आणि खासदार बजरंग सोनवणे यांचा हद्द वाद आणि इगो हा देखील या अपयशाला कारणीभूत ठरला. दुसरीकडे परळीत लक्ष घातलेल्या बजरंगबाप्पांनी जिल्हा परिषदेसाठी केजमध्ये अधिक वेळ आणि लक्ष घातल्याने ते तिथेच अडकून पडले. परिणामी बीड नगरपालिकेत संदीप क्षीरसागर यांच्या नेतृत्वात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचा प्रभाव दिसला. पण जिल्ह्याचे खासदार म्हणून बजरंग सोनवणे यांचा प्रभाव मात्र ओसरल्याचे दिसून आले आहे.

Bajrang Sonavane
Prashant Jagtap Resigns: पुण्याच्या राजकारणातील मोठी बातमी; दोन्ही राष्ट्रवादीची गट्टी जमली अन् शरद पवारांच्या शिलेदाराने साथ सोडली

लोकसभा निवडणुकीत सत्तापक्ष आणि सर्वच बाबतीत सरस असलेल्या महायुतीच्या उमेदवार पंकजा मुंडे यांचा पराभव करुन बजरंग सोनवणे जाइंट किलर ठरले. मात्र, नंतरच्या निवडणुकांत मात्र पक्षाची जिल्ह्यात पुरती पिछेहाट हेात आहे. या पराभवांना एकटे सोनवणे कारणीभूत नसले तरी पक्षातील समन्वयाचा अभाव, पक्षहितापेक्षा अधिकचे 'स्व इंटरेस्ट', नेत्यांचे इगो या बाबी विधानसभा आणि आताच्या नगर पालिका निवडणुकीतील पराभवाला कारणीभूत असल्याचे निकालावरुन दिसते.

जिल्हा परिषदेच्या आखाड्यात राजकारण करणारे बजरंग सोनवणेंची ओळख धाडसी राजकारणी. दिवंगत मुंदडांसोबत राजकीय प्रवासाची सुरुवात करत पुढे दिवंगत मुंडें आणि नंतर त्यांना सोडून त्यांनी धनंजय मुंडेंची सोबत स्विकारली. केज तालुक्यातील स्थानिक स्वराज्य संस्था आखाड्यात काम करताना कारखान्यांची उभारणी आणि यशस्वी गाळप व चांगला भाव देणारे कारखानदार अशीही त्यांनी ओळख निर्माण केली.

दरम्यान, लोकसभेला बीड हा हमखास भाजपचा बालेकिल्ला मानला जाणारा मतदार संघ. त्यात मागच्या निवडणुकीवेळी केंद्र व राज्यात सत्ता, जिल्ह्याचे पालकमंत्रीपदही धनंजय मुंडेंकडे आणि दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष म्हणजे त्यावेळी अगदीच राजकीय ताकदीने नाजुक असलेला. अशा प्रतिकुल परिस्थितीत त्यांनी लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर सत्तेतला राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सोडून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश आणि राजकीय ताकदवान नेत्या पंकजा मुंडे यांच्या विरोधात निवडणुक लढविण्याचे धारिष्ट्य केले.

त्यांच्या धाडसाला जिल्ह्यातील सामान्यांनीही डोक्यावर घेतले आणि सोनवणे जाइंट किलर ठरले. आष्टी आणि परळीचा अपवाद वगळता सर्वच मतदार संघातून त्यांना लिड मिळाली. नंतरच्या विधानसभा निवडणुकीत मात्र पक्षाची जिल्ह्यात पुरती पडझड झाली. आपला केजचा आखाडा सेफ ठेवण्यासाठी त्यांनी माजलगाव मतदार संघातल्या उमेदवारीची खेळी केली आणि याचा फटका केज, माजलगाव आणि परळी या तीन मतदार संघात बसला.

Bajrang Sonavane
NCP leader kidnapping : राष्ट्रवादीच्या बड्या नेत्याला भररस्त्यातून उचललं ; अपहरण करून बेदम मारहाण; थरार 'सीसीटीव्हीत' कैद

वास्तविक परळीचा निकाल काही बदलला नसता तरी लढत मात्र तगडी झाली असती. माजलगावच्या उमेदवारीमुळे पक्षाच्या पारड्यात दोन जागा वाढल्या असत्या असे राजकीय जाणकारांचे मत आहे. लोकसभेला दिड आणि विधानसभेला वर्ष लोटत असताना जिल्ह्यातील सहा नगर पालिकांच्या निवडणुका लागल्या. पक्षाला माजलगाव नगर पालिकेत तुतारी वाजविता आली आहे. बीडच्या पराभवाला सोनवणेंचा संबंध नसला तरी खासदार म्हणून ते प्रचारात दिसले नाही.

इथे क्षीरसागरांचे कार्यक्षेत्र हा दोघांमधील सिमा वाद आडवा आला का इगो हे दोघांनाच माहित. पण, बीडमध्ये पक्षाची पुरती पिछेहाट झाली. गेवराईत देखील सुमार कामगिरी झाली. परळीत खुद्द सोनवणेंनी सुरुवातीपासून लक्ष घातले आणि प्रचारही जोरात केला. परंतु, पक्षासाठी हा निकाल अगदीच निराशजनक लागला. 35 पैकी दोन नगरसेवक आणि नगराध्यक्षपदाच्या उमेदवाराचाही 15 हजारांवर मतांनी पराभव झाला.

लोकसभेतील प्रश्‍न, पाठपुरावा पण जिल्ह्यात वावर हवा

राजकीय दृष्ट्या सोनवणेंची वाटचाल पक्षासाठी निराशाजनक असली तरी लोकसभेत शेतकरी, तरुण, कायदा व सुव्यवस्था, रेल्वे, रस्ते आदी विषयांवरील प्रश्‍नांची मांडणी आणि यासाठी संबंधीत मंत्रयांकडे पाठपुरावा तसेच प्रशासन स्तरावरील बैठकांसाठी त्यांचे सातत्य दुर्लक्षून चालणार नाही. मात्र, खासदार म्हणून त्यांचा जिल्हाभर वावर अपेक्षीत असताना ते पुन्हा त्यांनी जिल्हा परिषदेसाठी 'केज एके केज' मोहिम सुरु केली आहे.

लोकसभा सदस्य म्हणून पालकमंत्री अजित पवारांनी त्यांना जिल्हा नियोजन समितीचा दिलेला वाटाही आपल्या झेडपी गटासाठीच कसा उपयुक्त ठरेल, याचेच गणित ते करत आहेत. जिल्ह्याने त्यांना खासदार केल्यानंतर असी सिमीत ओढ त्यांच्या राजकारणासाठी आणि पक्षासाठीही हितकारक नाही.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com