Beed Loksabha : बजरंग सोनावणेंचा विजय निश्चित, संदीप क्षीरसागरांनी सांगितले कारण

Sandeep Kshirsagar : सर्व जाती धर्मांना, समाजातील सर्व घटकांना सोबत घेऊन जाण्याच्या जेष्ठ नेते शरद पवार यांच्या विचारामुळे सर्वच घटकांतून मोठा पाठींबा मिळत असल्याचे संदीप क्षीरसागर म्हणाले.
Sandeep Kshirsagar
Sandeep Kshirsagarsarkarnama

Beed Political News : बीड लोकसभेची लढाई धनशक्ती विरुद्ध जनशक्ती अशी होत आहे. एका बाजूने मोठमोठे पुढारी तर दुसऱ्या बाजूने सामान्यांचा जनाधार आहे. सर्वत्र मोठा प्रतिसाद मिळत असल्याने राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार बजरंग सोनवणे Bajrang Sonwane यांचा विजय निश्चित आहे. यावेळी बीडचा खासदार आणि दिल्लीचे सरकार दोन्हीही सेक्युलर असतील, असा विश्वास पक्षाचे जिल्हाध्यक्ष व आमदार संदीप क्षीरसागर यांनी व्यक्त केला.

Sandeep Kshirsagar
Sandipan Bhumere News : उमेदवारी लेट पण प्रचार थेट! भुमरेंच्या प्रचारासाठी महायुतीचे नेते लागले कामाला

सर्व जाती धर्मांना, समाजातील सर्व घटकांना सोबत घेऊन जाण्याच्या जेष्ठ नेते शरद पवार Sharad Pawar यांच्या विचारामुळे सर्वच घटकांतून मोठा पाठींबा मिळत असल्याचे संदीप क्षीरसागर म्हणाले. सेवानिवृत्त अधिकारी, कर्मचारी व विविध सामाजिक संघटनांच्या पदाधिकाऱ्यांची संदीप क्षीरसागर Sandeep Kshirsagar यांनी बैठक घेतली.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

हिंदू - मुस्लीम वाद भडकवून आपल्या राजकीय पोळ्या भाजून घेणाऱ्या विचारसरणीचा आता शेवट असणार आहे‌. जाती - जातींमध्ये भांडण लावून घाणेरडे राजकारण करण्याची संधी आता जनशक्ती देणार नाही. एका बाजूने सर्व सत्ता एकवटली असून दुसऱ्या बाजूने सामान्यांचे लोंढे दिसत आहेत. मात्र, यंदा सर्वत्र परिवर्तनाचे वारे दिसत आहे, असे क्षीरसागर म्हणाले.

जिल्ह्यातील सर्वच घटक नेहमीच्या फसवणूकीला ओळखून चुकले आहेत. त्यामुळे बीडचा खासदार बजरंग सोनवणेंच्या रुपाने सेक्युलर विचाराचा असेल तसेच दिल्लीमध्ये सरकार देखील याच विचाराचे असेल, असा विश्वासही संदीप क्षीरसागर यांनी व्यक्त केला. माजी आमदार सय्यद‌ सलीम, माजी आमदार सुनील धांडे उपस्थित होते.

Sandeep Kshirsagar
Loksabha Election 2024 : 'कमळाची मतं धनुष्यबाणाला', शंभूराज देसाईंनी केली खुंटी बळकट

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com