Manoj Jarange Patil : ठाकरेंच्या खासदाराचा जरांगेच्या उपोषणाला पाठिंबा, थेट राज्यपालांनाच लिहिलं पत्र

MP Sanjay Jadhav supports Manoj Jarange Patil's Hunger Strike : मराठा आरक्षणाच्या मुद्यावरुन विरोधकांनी सरकारला घेरण्याचा प्रयत्न केला आहे. सरकार मनोज जरांगे यांच्याबाबतीत संवेदनशील नसल्याचा आरोप विरोधकांकडून केला जात आहे.
Manoj Jarange Patil
Manoj Jarange PatilSarkarnama
Published on
Updated on

Maratha Reservation : मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील हे लोकसभा निवडणुकीनंतर पुन्हा एकदा आक्रमक झाले आहेत. ते पुन्हा आमरण उपोषणाला अंतरवाली सराटी येथे बसले आहेत. त्यांच्या उपोषणाचा आजचा (बुधवारी ता. 7 जून) पाचवा दिवस आहे. सध्या त्यांची तब्येत बिघडली आहे. त्यामुळे त्यांना सलाईन लावण्यात आली आहे. महायुती आणि महाविकास आघाडीतील अनेक नेत्यांनी जरांगे यांची उपोषणस्थळी जाऊन भेट घेतली आहे.

मराठा आरक्षणाच्या मुद्यावरुन विरोधकांनी सरकारला घेरण्याचा प्रयत्न केला आहे. सरकार मनोज जरांगे यांच्याबाबतीत संवेदनशील नसल्याचा आरोप विरोधकांकडून केला जात आहे. शिवाय सराकर मराठा आरक्षणविरोधी असल्याचं चित्रही रंगवलं जात आहे.

अशातच आता ठाकरे गटाचे नवनिर्वाचित खासदार संजय जाधव (Sanjay Jadhav) यांनी जरांगे पाटील यांच्या उपोषणाला जाहीर पाठिंबा दिला आहे. शिवाय जरांगे यांची तब्येत खालावण्याआधी ताबडतोब सर्व मागण्या पूर्ण करण्याची मागणी राज्यपालांकडी केल्याचं सांगितलं.

ठाकरे गटाचे खासदार संजय जाधव यांनी एक्सवर पोस्ट करत आपण राज्यपालांना आरक्षणाबाबत गंभीर सूचना देणारं पत्र जारी केल्याचं सांगितलं. त्यांनी आपल्या पोस्टमध्ये लिहिलं, "मराठा आरक्षणासह (Maratha Reservation) समाजाच्या इतर मागण्यांना मी माझा जाहीर पाठिंबा घोषित करत आहे. आरक्षणाच्या मागणीसाठी मराठा संघर्षयोद्धा मनोजदादा जरांगे पाटील पुन्हा एकदा उपोषणाला बसले आहेत.

एक मराठा मावळा व मराठा आरक्षणाची राजधानी म्हणून पुढे आलेल्या अंतरवाली सराटी ज्या ठिकाणी आहे, त्या मतदारसंघाचा खासदार म्हणून आरक्षणाच्या या आंदोलनाला मी तन-मन-धनाने माझा जाहीर पाठिंबा घोषित करत आहे.

नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत राज्यात विशेषतः मराठवाड्यातील सर्व मतदारसंघात मनोज जरांगे इफेक्ट दिसून आला. महायुती सरकारच्या विरोधात मराठा आरक्षणाच्या मुद्यावरून असलेली नाराजी मराठवाड्यातील सात मतदारसंघातील निकालातून बाहेर आली. मात्र, या नाराजीचा फायदा महाविकास आघाडीला झाला, त्यामुळे मराठवाड्यातील अनेक उमेदवारांनी निकालानंतर जरांग पाटलांची भेट घेतली होती. यामध्ये परभणी मतदारसंघाचे खासदार संजय जाधव यांचाही समावेश आहे.

Manoj Jarange Patil
Manoj Jarange Patil : मोठी बातमी! मुख्यमंत्री शिंदेंचे 'ओएसडी' मंगेश चिवटे जरांगे पाटलांच्या रडारवर

संजय जाधव यांनी निवडणुकीनंतर जरांगे पाटलांची भेट घेतली. या भेटीनंतर माध्यमांशी बोलताना त्यांनी आम्ही मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाच्या पूर्णपणे पाठीशी असून आम्ही मराठा समाजासोबत असल्याचा विश्वास दिला. यादरम्यान सक्रियपणे समाजाच्या आरक्षणाच्या लढ्यात सहभागी राहण्याचा शब्द, आपण जरांगे पाटील यांना दिल्याचे जाधव यांनी सांगितलं होतं. त्यानुसार आता त्यांनी आरक्षणाबाबत उघड भूमिका घेतल्याचं पाहायला मिळत आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com