MP Omraje Nimbalkar : ओमराजे निंबाळकरांनी घेतली मनोज जरांगेंची भेट ; म्हणाले, 'राजकारण म्हणून पाहू नका...'

Mp Omraje Nimbalkar Meet Manoj Jarange Patil : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी अंतरवाली सराटी येथे मनोज जरांगे पाटील हे बेमुदत उपोषणाला बसले आहेत. आज पाचवा दिवस आहे.
Mp Omraje Nimbalkar Meet Manoj Jarange Patil
Mp Omraje Nimbalkar Meet Manoj Jarange Patilsakarnama
Published on
Updated on

Omraje Nimbalkar News : मराठा आरक्षण हा एक सामाजिक लढा आहे, त्याकडे राजकारण म्हणून पाहू नका, असे आवाहन करत मनोज जरांगे-पाटील यांनी हा लढा लढताना स्वतःच्या प्रकृतीचीही काळजी घ्यावी, असे आवाहन धाराशिवचे खासदार ओमराजे निंबाळकर यांनी केले.

मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी अंतरवाली सराटी येथे मनोज जरांगे पाटील हे बेमुदत उपोषणाला बसले आहेत. त्यांच्या उपोषणाचा आज पाचवा दिवस असून सलाईन घेतले असले तरी त्यांची प्रकृती खालवत चालली आहे. या पार्श्वभूमीवर आज खासदार ओमराजे निंबाळकर, धाराशिव-कळंबचे आमदार कैलास पाटील यांनी अंतरवालीत येऊन मनोज जरांगे पाटील यांची भेट घेतली.

मराठा आरक्षणाच्या तुमच्या लढ्याला आमचा पाठिंबा आहे. पण हा लढा देत असताना तुम्ही तब्येत सांभाळली पाहिजे. त्यांनी काळजी घेणे गरजेचे आहे. उपोषण सुरु असले तरी थोडं पाणी घ्यावे, अशी माझी त्यांना विनंती आहे. गेल्या दहा-अकरा महिन्यापासून मराठा समाजाला सगेसोयरे यांच्यासह ओबीसी प्रवर्गातून आरक्षण द्यावे या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील Manoj Jarange Patil आंदोलन करत आहेत.

Mp Omraje Nimbalkar Meet Manoj Jarange Patil
Manoj Jarange Patil : मोठी बातमी! मुख्यमंत्री शिंदेंचे 'ओएसडी' मंगेश चिवटे जरांगे पाटलांच्या रडारवर

दरम्यान, सरकारने मनोज जरांगे-पाटील आणि मराठ समाजाला दिलेले आश्वासन पाळले नाही. समाजाची मोठी फसवणूक सरकारने केल्याची भावना मराठा बांधवांमध्ये निर्माण झाली आहे. मराठा आरक्षणाचा लढा हा समाजाचा लढा आहे, त्याकडे राजकारण म्हणून पाहू नये. सरकारने या उपोषणाची दखल घेऊन तातडीने पावले उचलली पाहिजे, अशी अपेक्षा ओमराजे Omraje Nimbalkar यांनी व्यक्त केली.

तामिळनाडू सरकारने 50 टक्के आरक्षणाची मर्यादा ओलांडली असताना ते टिकले. मग आपले आरक्षण का टिकू शकत नाही? केंद्र सरकारकडे आम्ही वारंवार या संदर्भात विनंती करत आहोत. मात्र सरकारचा या मुद्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन वेगळा आहे. यातून समाजामध्ये रोष वाढतो आहे.

सरकारने आता हा विषय कायमस्वरुपी निकाली काढण्याच्या दृष्टीने मार्ग काढावा. यासाठी आम्ही केंद्रात आवाज उठवू, सरकारच्या मागे लागू, असा विश्वास ओमराजे यांनी माध्यमांशी बोलतांना दिला. या देशाचा भाग असलेल्या तामिळनाडू सारख्या एका राज्यातील आरक्षण मर्यादा ओलांडून सुद्धा टिकते, मग महाराष्ट्रात हे का घडू शकत नाही? असा सवालही ओमराजे निंबाळकर यांनी यावेळी केला.

(Edited By Roshan More)

Mp Omraje Nimbalkar Meet Manoj Jarange Patil
Manoj Jarange Patil : मोठी बातमी! मुख्यमंत्री शिंदेंचे 'ओएसडी' मंगेश चिवटे जरांगे पाटलांच्या रडारवर

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com