Bajrang Sonwane News : शपथ घेतल्यानंतर खासदार बजरंग सोनवणेंचं मोठं विधान; म्हणाले, 'बीड जिल्हा शरद पवारांचाच...

Bajrang Sonwane Take Oath: 'बीडच्या जनतेमुळेच मी संसद सभागृहात पोहोचलो आहे.माझ्यासाठी आजचा दिवस अविस्मरणीय आहे...'
Sarad Pawar, Bajrang Sonwane
Sarad Pawar, Bajrang SonwaneSarkarnama
Published on
Updated on

New Delhi News : लोकसभा निवडणुकीत बीडमध्ये प्रचंड ताकद लावूनही पंकजा मुंडे यांना पराभवाला सामोरे जावे लागले.तर शरद पवारांचा करिष्मा चालल्यामुळे खासदारकी मिळवत बजरंग सोनवणेंनी थेट दिल्ली गाठली. बीडमधील 'हाय व्होल्टेज' लढतीकडे राज्याचंच नव्हे तर देशाचं लक्ष लागलेलं होतं. खासदारकीची शपथ घेण्यासाठी आलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या बजरंग सोनवणेंना मोठं विधान केलं. बीड जिल्हा हा माझ्या जन्माच्या अगोदरपासून शरद पवारांचाच जिल्हा म्हणून राहिला आहे असं सोनावणेंनी म्हटलं आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे बीडचे नवनिर्वाचित खासदार बजरंग सोनवणे यांनी दिल्लीत मीडियाशी संवाद साधला. ते म्हणाले,बीडच्या जनतेमुळेच मी संसद सभागृहात पोहोचलो आहे.माझ्यासाठी आजचा दिवस अविस्मरणीय आहे,दिल्लीच्या सर्वोच्च सभागृहात जाण्याचा बहुमान मला मिळाला.माझ्या या सर्व मानाचे मानकरी माझी बीड जिल्ह्यातील जनता आहे, ज्यांनी माझ्यावर प्रेम केलं, त्या जनतेसमोर नतमस्तक होऊन आभार मानले.

...तो पवारसाहेबांचाच जिल्हा आहे!

बजरंग सोनवणे यांना तुम्ही गोपीनाथ मुंडे (Gopinath Munde) यांच्या बीड लोकसभा मतदारसंघातून संसद सभागृहात आला आहात,यावर प्रतिक्रिया विचारली. त्यावर,उत्तर देताना आदरणीय शरदचंद्र पवार साहेबांचा बीड जिल्हा म्हणून माझ्या जन्माच्या अगोदरपासून बीड जिल्हा ओळखला जातो, आणि तो पवारसाहेबांचाच जिल्हा आहे असं सोनवणेंनी ठणकावून सांगितले.

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे लोकसभा निवडणुकीत पिपाणी चिन्हाचा खूप मोठा फटका बसला होता. त्यामुळे हे चिन्ह आगामी विधानसभा निवडणुकीत रद्द करण्यात यावे या मागणीसाठी शरद पवार (Sharad Pawar) गटाने निवडणूक आयोगाकडे धाव घेतली आहे. यावरही सोनवणेंनी भाष्य केले.

Sarad Pawar, Bajrang Sonwane
Amol Kolhe praised Nilesh Lanke : ‘जिंकलास भावा’ म्हणत कोल्हेंनी थोपटली लंकेंची पाठ अन्‌ विखेंना लगावला टोला!

ते म्हणाले, ग्रामीण भागातील आमच्या मतदार बंधुंना गोंधळात टाकणारं हे चिन्ह आहे. कारण, आमचं चिन्ह तुतारीधारी माणूस आहे. तर, पिपाणी हे चिन्ह तुतारी नावानेच आयोगाकडे आहे. या पिपाणी चिन्हामुळे साताऱ्यातील आमच्या उमेदवाराचा पराभव झाला. कारण, विजयी उमेदवारापेक्षा पिपाणीला जास्त मतदान मिळालं आहे, तर माझ्या मतदारसंघातही 50 हजारांपेक्षा जास्त मतदान पिपाणी या चिन्हाने घेतलं आहे. त्यामुळे, हे चिन्ह बाद केलं पाहिजे, या मागणीवर आपणही ठाम असल्याचेही

Sarad Pawar, Bajrang Sonwane
Lok Sabha Session Update : लोकसभेत दोन खासदारांची शपथ वादात; जय हिंदूराष्ट्र, जय पॅलेस्टाईनचा नारा…

शपथ ठरली खास....

बीड जिल्ह्याचे लोकप्रतिनिधी म्हणून बजरंग सोनवणे यांनी संसदेत खासदारकीची शपथ घेतली. त्यांनी मी बजरंग सत्वशीला मनोहर सोनवणे... अशी सुरुवात करुन संसद सभागृहात शपथ घेतली. तर, जय शिवराय, जय किसान, जय महाराष्ट्र असे म्हणत आपल्या शपथेचा समारोप केला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com