Dharashiva Loksabha : सावंतांची आता थेट लोकसभेच्या आखाड्यात उडी...

आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांच्या पुतण्याचे भावी खासदार म्हणून कळंब शहरात लागले बॅनर
Dhananjay Sawant Banner
Dhananjay Sawant BannerSarkarnama
Published on
Updated on

शीतल वाघमारे

Dharashiva News : देशात सध्या लोकसभा निवडणुकीचे वारे वाहू लागले आहे. धाराशिव जिल्ह्यात महायुतीमध्ये लोकसभा उमेदवारासाठी मोठ्या प्रमाणात रस्सीखेच सुरू आहे. राज्याचे आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांच्या कुटुंबातून त्यांचे पुतणे, धाराशिव जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष धनंजय सावंत यांची कार्यकर्त्यांनी भावी खासदार म्हणून पुन्हा एकदा पोस्टरबाजी केली आहे. त्यामुळे सावंतांनी आता थेट लोकसभेच्या निवडणुकीत उडी घेतल्याचे मानले जात आहे. (Banners of Tanaji Sawant's nephew as the future MP were put up in Kalamb city)

कळंब शहरात शिवसेनाप्रणित जनसंपर्क कार्यालयाचे सोमवारी (ता. 22 जानेवारी) धनंजय सावंत यांच्या हस्ते उदघाटन करण्यात आले. या कार्यक्रमास शिवसेनेचे अनिल खोचरे, जिल्हाप्रमुख गौतम लटके, भूमचे माजी नाराध्यक्ष संजय गाढवे यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. या कार्यक्रमासाठी लावण्यात आलेल्या पोस्टरवर सावंत यांना भावी खासदार संबोधले आहे. विशेष म्हणजे या बॅनरवर रवींद्र गायकवाड आणि ज्ञानराज चौगुले यांचे फोटो मात्र नाहीत, याचीही दबक्या आवाजात चर्चा आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Dhananjay Sawant Banner
Pune News : युवक काँग्रेसची मागणी विखे मान्य करणार; आपल्याच खात्यातील विभागाची चौकशी लावणार?

लोकसभेची निवडणूक तोंडावर आली असून त्यासाठी राज्याचे सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री तथा धाराशिवचे पालकमंत्री तानाजी सावंत यांनीही निवडणुकीसाठी कंबर कसली आहे. धाराशिव येथे झालेल्या महायुतीच्या जिल्हा कार्यकर्ता मेळाव्यात ‘पश्चिम महाराष्ट्रातील उमेदवार धाराशिव लोकसभेसाठी चालू देणार नाही; अन्यथा स्फोटक राजकारण करीन,’ असा इशारा दिला होता.

मागील पंधरा दिवसांपूर्वीही महायुतीच्या मेळाव्याच्या दोन दिवस अगोदर धनंजय सावंत यांचे भावी खासदार म्हणून पोस्टर व्हायरल झाले होते. परंतु मेळाव्यात तानाजी सावंत यांनी याविषयी मौन बाळगले होते. कार्यकर्त्यांची इच्छा आहे, धनंजय सावंत खासदार व्हावेत की कार्यकर्त्यांच्या आडून हा सावंत कुटुंबातच उमेदवारी मिळावी, असा दबाव निर्माण केले जात असल्याची चर्चा पदाधिकारी करीत आहेत.

Dhananjay Sawant Banner
Vitthal Sugar Factory : ‘काहीही करा; पण विठ्ठल बंद पाडा : राज्य बॅंक अन्‌ पोलिसांना मोठ्या नेत्यांचे फोन’

धाराशिव लोकसभेची जागा शिवसेनेची आहे. धाराशिव येथील खासदार ओम राजेनिंबाळकर हे उद्धव ठाकरे यांच्याशी एकनिष्ठ असून ते ठाकरेंच्या सेनेमध्ये आहेत. तानाजी सावंत यांनी शिंदे गटात प्रवेश केला आहे. सावंत यांनी जिल्ह्याच्या राजकारणामध्ये सहकाराच्या माध्यमातून प्रवेश करून सहकारी साखर कारखाने सुरू केले आहेत. तसेच, भूम-परंडा-वाशी मतदारसंघातून ते निवडूनही आले आहेत. लोकसभेला आपल्या कुटुंबातूनच उमेदवारी देऊन त्यांचा जिल्ह्यावर पकड मिळविण्याचा हा प्रयत्न असल्याचेही बोलले जात आहे.

Dhananjay Sawant Banner
Rohit Pawar Secret Blast : पक्षप्रवेशासाठी 'विठ्ठल' बंद पाडण्याची अट घालणारा पुढारी कोण? रोहित पवारांच्या आरोपाने खळबळ

धाराशिव जिल्ह्यातील वाशी तालुक्यातील तेरखेडा येथे एका जाहीर कार्यक्रमांमध्ये शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी धनंजय सावंत यांना भावी खासदार व्हावे अशी घोषणाबाजी केली. यावर धनंजय सावंत म्हणाले, ‘मी लोकसभा निवडणुकीसाठी कोणाकडेही इच्छा व्यक्त केलेली नाही. मात्र कार्यकर्त्यांचा मनातील भावना पक्षश्रेष्ठीपर्यंत नक्की पोहोचतील,’ अशी अपेक्षा व्यक्त करीत एक प्रकारे त्यांनी आपल्या मनातील सुप्त इच्छेला वाट मोकळी करून दिली.

तानाजी सावंत यांचे पुतणे धनंजय यांना या निवडणुकीसाठी उभे राहावे, अशी गळ कार्यकर्त्यांमधून घातली जाऊ लागली आहे. त्यांचा सहकारी संस्था, साखर कारखाना, कार्यकर्त्याचे जाळे आणि दांडगा जनसंपर्क आहे.

Edited By -Vijay Dudhale

Dhananjay Sawant Banner
Ratnagiri News : वडिलांची इच्छा मुलगा पूर्ण करणार ; आज वाटणार हत्तीवरून साखर...

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com