Dharashiv Political News : बसवराज पाटील यांच्या भाजप प्रवेशाने धाराशिव जिल्हा काँग्रेसमुक्त...

Basavraj Patil : काँग्रेसचे नेते बसवराज पाटील यांनी आज भाजपमध्ये प्रवेश केला आहे. त्यामुळे काँग्रेसला धाराशिव जिल्ह्यात मोठा धक्का बसला आहे.
Basavraj Patil
Basavraj PatilSarkarnama

Dharashiv News : आजवर झालेल्या लोकसभेच्या एकूण 17 निवडणुकांपैकी तब्बल 11 वेळा धाराशिव लोकसभा मतदारसंघातून दिल्लीच्या संसदेत काँग्रेस पक्षाच्या खासदाराने विजय मिळवत प्रतिनिधित्व केले आहे. त्याच काँग्रेस पक्षाची 18 व्या लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर अक्षरशः दुरावस्था झाली आहे.

जिल्ह्यातील एकमेव प्रभावी नेते म्हणून बसवराज पाटील यांच्याकडे पाहिले जात होते. शिवराज पाटील चाकूरकर यांचे मानसपुत्र आणि माजी मंत्री असलेल्या बसवराज पाटील यांनीही आज काँग्रेसचा हात सोडला आणि भाजपचे कमळ हातात घेतले. त्यामुळे धाराशिव जिल्हा पूर्णपणे काँग्रेसमुक्त झाला आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Basavraj Patil
Farmers Protest : दिल्लीतील आंदोलनाला पाठिंबा देत शेतकऱ्यांनी काढली 100 ट्रॅक्टरची रॅली

धाराशिव जिल्ह्यात शेतकरी कामगार पक्षाच्या राजकीय प्रभावानंतर काँग्रेसने स्वतःचे संघटनात्मक बळ अधिक सक्षमपणे पुढे नेले. त्यांनतर काँग्रेसला खऱ्या अर्थाने चांगले दिवस आले. माजी मंत्री मधुकरराव चव्हाण बसवराज पाटील हे अलीकडच्या काळातील काँग्रेसचे जिल्ह्यातील सर्वात महत्त्वाचे नेते. त्यांच्या नेतृत्वाखाली स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये काँग्रेस आज घडीलाही स्वतःचे स्थान राखून होते.

जिल्हा बँक, जिल्हा परिषद, बाजार समिती त्याचबरोबर नगरपालिका निवडणुकांमध्ये देखील काँग्रेसचा नाही म्हटलं तरी दखलपात्र टक्का शिल्लक होता. माजी मंत्री मधुकर चव्हाण यांचा 2019 च्या विधानसभा निवडणुकीमध्ये भाजपाच्या कमळ चिन्हावर राष्ट्रवादीतून भाजपात आलेल्या डॉ. पद्मसिंह पाटील यांचे सुपुत्र राणाजगजितसिंह पाटील यांनी पराभव केला.

त्यानंतर तुळजापूर तालुका जो काँग्रेसचा बालेकिल्ला होता तो विधानसभा निवडणुकीत ढासळला. उमरगा तालुक्यातील मुरूमचे मूळ रहिवासी असलेले आणि आपल्या कारखाना परिसराला दिवंगत पंतप्रधान राजीव गांधी यांचे नाव दिलेले बसवराज पाटील यांच्यावरच काँग्रेस पक्षाची सर्व मदार होती.

जिल्ह्यातील स्थानिक काँग्रेस नेत्यांनी यंदाच्या लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेस पक्षाला उमेदवारी मिळावी आणि त्यासाठी उमेदवार म्हणून बसवराज पाटील हेच नाव अग्रक्रमाने स्वीकारण्यात यावे, असा ठराव केला होता. या ठरावावर शिक्कामोर्तब करण्यासाठी जिल्ह्याचे पक्ष निरीक्षक असलेले माजी मंत्री अमित देशमुख यांनी जिल्ह्यात येऊन बैठक घेतली.

रीतसर बसवराज पाटील यांच्या लोकसभा उमेदवारीचा प्रस्ताव काँग्रेसच्या पक्षश्रेष्ठीकडे सादर केला. लोकसभा उमेदवारीच्या प्रस्ताव सादरीकरणाच्या बैठकीलाही स्वतः बसवराज पाटील उपस्थित नव्हते. त्यानंतर वेगात घडामोडी सुरू झाल्या आणि बसवराज पाटील देखील भाजपात जाणार असल्याच्या चर्चेने जिल्ह्याच्या राजकीय वातावरणात खळबळ उडून गेली.

केंद्रीय मंत्री भगवंत खुबा यांच्या माध्यमातून थेट भाजपाच्या दिल्लीतील वरिष्ठ नेत्यांबरोबर संपर्क साधत बसवराज पाटील यांनी मंगळवारी मुंबईच्या भाजपाचे कमळ स्वीकारले. आणि धाराशिव जिल्हा पूर्णतः काँग्रेस मुक्त झाला.

दुसऱ्या फळीतील काँग्रेसच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांवर पुन्हा संघटन मजबूत करण्याची जबाबदारी येऊन पडली आहे. निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर दुसऱ्या फळीतील नेते आपल्या पूर्वीच्या नेत्याला कडवे आव्हान देण्यात कितपत यशस्वी ठरतात हे येणारा काळच ठरवेल.

(Edited By-Ganesh Thombare)

Basavraj Patil
Solapur Politics News : आम्ही मालकांचेही ऐकणार नाही; उत्तम जानकरांच्या लोकसभा उमेदवारीवर संमिश्र जनमत

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com