Kolhapur Election Video: मशालचं बटण दाबल तरी धनुष्यबाणाला मत ? उमेदवाराने घेतला आक्षेप

Candidate objects to misdirected votes in Maharashtra elections: मत देताना एकाच वेळी दोन चिन्हांच्या समोरील लाईट लागत असल्याची तक्रार करण्यात येत होती. त्यामुळे आम्ही मशालला मत दिले तरी ते धनुष्यबाणाला गेल्याची तक्रार स्थानिक काही मतदारांनी केली.
EVM
EVMSarkarnama
Published on
Updated on

Radhanagari Assembly constituency: मशालला मत दिले तरी ते धनुष्यबाणाला जात असल्याची तक्रार राधानगरी मतदारसंघातील बर्गेवाडी येथील मतदान केंद्रावर घडत असल्याची तक्रार करण्यात येत होती. त्यामुळे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उमेदवार के पी पाटील यांनी स्वतः जाऊन पाहणी केली.

मत देताना एकाच वेळी दोन चिन्हांच्या समोरील लाईट लागत असल्याची तक्रार करण्यात येत होती. त्यामुळे आम्ही मशालला मत दिले तरी ते धनुष्यबाणाला गेल्याची तक्रार स्थानिक काही मतदारांनी केली. मतदारांच्या तक्रारीनंतर केपी पाटील आणि मतदार केंद्रातील अधिकारी यांनी मशिनची पाहणी केली. ही तांत्रिक अडचण मतदान केंद्रावरील अधिकाऱ्यांनी दूर केली.

EVM
Parli Constituency : ‘हाय व्होल्टेज’ लढत असलेल्या परळीत मतदान केंद्राध्यक्षांना हृदयविकाराचा झटका

तांत्रिक अडचण दूर केली असली तरी अशा प्रकारे किती मते गेली, याची पाहणी करण्यात यावी अशी मागणी केपी पाटील यांनी केली. राधानगरी मतदारसंघात एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचे उमेदवार प्रकाश आबिटकर यांच्या विरोधात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे केपी पाटील अशी लढत होत आहे.

2019 च्या निवडणुकीत प्रकाश आबिटकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार कृष्णराव पाटील यांचा पराभव केला होता. यंदा मात्र, या मतदारसंघात शिवसेना विरुद्ध शिवसेना अशी लढत होत आहे.

ईव्हीएममध्ये बिघाड

राधानगरी मतदारसंघात तक्रार करण्यात येत असताना कोल्हापूर मतदारसंघात देखील ईव्हीएम मशीन बंद पडल्याची तक्रार करण्यात आली होती. विक्रम हायस्कूल मतदानकेंद्रावरील ईव्हीएम मशीन तांत्रिक बिघाड झाल्याने बंद पडल्याचे सांगण्यात येत होते.

EVM
Solapur Election 2024 : सोलापूरकरांचा कौल कुणाला? 2019 ची पुनरावृत्ती की महाआघाडी लोकसभेप्रमाणे बाजी मारणार ?

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com