Amarsingh Pandit : "अमरसिंह पंडितांना संपविल्याशिवाय आज जायचं नाही..." : तुरुंगातून सुटताच षडयंत्र करून हल्ला

Amarsingh-Vijasingh Pandit News : गेवराईतील हल्ला प्रकरणात अमरसिंह पंडित यांना संपवण्याच्या उद्देशाने पूर्वनियोजित कट केल्याचा आरोप विजयसिंह पंडित यांनी केला. हल्ल्याचे सीसीटीव्ही फुटेज पोलिस अधीक्षकांकडे सादर करण्यात आले.
MLA Vijaysingh Pandit submits CCTV footage to the SP, alleging a planned attack on former MLA Amarsingh Pandit in Georai, claiming it was a conspiracy timed around the municipal elections.
MLA Vijaysingh Pandit submits CCTV footage to the SP, alleging a planned attack on former MLA Amarsingh Pandit in Georai, claiming it was a conspiracy timed around the municipal elections.Sarkarnama
Published on
Updated on

Beed Politics News : गेवराईच्या कृष्णाई कार्यालयावर त्रिंबक पवार याने हल्ला केला. त्याचे सीसीटीव्ही फुटेज पोलिस अधीक्षकांना दिले आहेत. 1997 मध्ये खून प्रकरणात जन्मठेपेची शिक्षा भोगून बाहेर आल्यानंतर आता षडयंत्र करुन हल्ला केल्याचा आरोप आमदार विजयसिंह पंडित यांनी केला. गेवराईतील हल्ला प्रकरणी पोलिस अधीक्षक नवनीत काँवत यांची भेट घेतल्यानंतर पंडित यांनी माध्यमांशी संवाद साधला.

आरोपीची मागील पार्श्वभूमी आणि मोडस आॅपरेंडी पोलिस अधीक्षकांना सांगीतली आहे. मतदानाच्या चार दिवस आधी जेलमधले लोक आणून ठेवले होते, हा सर्व पुर्वनियोजित प्रकार होता, असा गंभीर आरोप पंडित यांनी केला. ही प्रवृत्ती समाजाला घातक आहे. तो मारताना म्हणत होता अमरसिंह पंडितांना आज संपविल्याशिवाय जायचं नाही. असे प्रकार शांतता भंग करणारे आणि कायदा सुव्यवस्थेला बाधा पोहोचणार आहेत. पोलिसांनी यांचा वेळीच पायबंद करावा.

चिथावणीखोर पध्दतीने आव्हान

अमरसिंह पंडित बुथवर गेलेले होते म्हणून त्यांचा जीव वाचला. नाहीतर त्यांना संपवून टाकायचं असा त्यांचा प्रयत्न होता. तो व्यक्ती विक्षीप्त आणि विकृत मानसिकतेचा आणि गुन्हेगारी प्रवृत्तीचा आहे. नगराध्यक्षपदाच्या उमेदवार बुथवर दबाव आणत दमदाटी करुन प्रतिनिधींना धमकावत होत्या. तेथूनच वादाला सुरुवात झाली. लोकप्रतिनिधीला मारण्याचं कटकारस्थान होतंय तर सामान्यांचं काय, त्या भागाला या व्यक्तीपासुन धोका आहे, असेही पंडित म्हणाले.

नगरपालिका निवडणुकीच्या मतदानाच्या दिवशी मंगळवारी गेवराई येथे माजी आमदार अमरसिंह पंडित यांच्या निवासस्थानी त्रिंबक उर्फ बाळराजे पवार यांनी केलेल्या हल्ला प्रकरणाचे सीसीटीव्ही फुटेजचा पेनड्राईव्ह आज पोलिस अधीक्षक नवनीत काँवत यांच्याकडे सोपविण्यात आला. राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) प्रदेश सरचिटणीस अमरसिंह पंडित व आमदार विजयसिंह पंडित यांनी पोलिस अधीक्षकांची भेट घेतली.

MLA Vijaysingh Pandit submits CCTV footage to the SP, alleging a planned attack on former MLA Amarsingh Pandit in Georai, claiming it was a conspiracy timed around the municipal elections.
Georai News : गेवराईतील राडा प्रकरणात पोलिसच झाले फिर्यादी; 55 जणांवर एफआयआर!

या दोघांनी त्यांची लेखी तक्रारही पोलिस अधीक्षकांकडे सुपूर्द केली. दरम्यान, या हल्ल्यात जखमी अमृत डावकर यांचा रात्री उशिरा पोलिसांनी जबाब नोंदवून घेतला. मंगळवारी गेवराईत बुथवर कुरुबुरीनंतर त्रिंबक उर्फ बाळराजे पवार अमरसिंह पंडित यांच्या कृष्णाई निवासस्थानी घोळक्यासह दाखल झाले. त्यांनी अमरसिंह पंडित यांचे स्वीय सहाय्यक अमृत डावकर यांना बेल्ट, काठ्या, दांडक्यांनी जबर मारहाण केली. त्यानंतर जयसिंग पंडित व पृथवीराज पंडित हे देखील माजी आमदार लक्ष्मण पवार यांच्या निवासस्थानावर चालून गेले. जखमी डावकर यांच्यावर शहरातील एका खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

MLA Vijaysingh Pandit submits CCTV footage to the SP, alleging a planned attack on former MLA Amarsingh Pandit in Georai, claiming it was a conspiracy timed around the municipal elections.
Georaiयेथे राडा, Amarsinh panditयांच्या विरुद्ध कट?Vijaysinh Panditयांनी कुंडलीच काढली Trimbak Pawar

दरम्यान, माजी आमदार अमरसिंह पंडित यांच्या हत्येचा कट होता. आपण उभा असताना अचानक येत टोळक्याने आपल्याला गंभीर मारहाण केली. आपलाही खुन झाला असता मात्र चालकमध्ये आल्याने आपण बचावलो, असा आरोप अमृत डावकर यांनी केला.अमरसिंह पंडित, विजयसिंह पंडित यांनी घटेनेचे सीसीटीव्ही फुटेज आणि लेखी तक्रार पोलिस अधीक्षकांकडे केली. त्यापूर्वी पोलिसांनी अमृत डावकर यांचा जबाब नोंदविला. या प्रकरणात गेवराई ठाण्यात पोलिसांच्या फिर्यादीवरुन 55 जणांवर गुन्हा नोंद झाला आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com