Beed : दमानियांचे ट्विट, मुंदडांची लक्षवेधी; बीड सिव्हिल सर्जनला आरोग्यमंत्र्यांचा दणका

Beed : बीडचे जिल्हा शल्य चिकित्सक अर्थात सिव्हिल सर्जन डॉ. अशोक थोरात यांचे निलंबन करण्यात आले आहे. केजच्या आमदार नमिता मुंदडा यांनी थोरात यांच्या गैरकारभारची आणि भ्रष्टाचाराच्या आरोपांची विधानसभेत लक्षवेधी मांडली होती.
Ashok Thorat
Ashok ThoratSarkarnama
Published on
Updated on

Beed : बीडचे जिल्हा शल्य चिकित्सक अर्थात सिव्हिल सर्जन डॉ. अशोक थोरात यांचे निलंबन करण्यात आले आहे. केजच्या आमदार नमिता मुंदडा यांनी थोरात यांच्या गैरकारभारची आणि भ्रष्टाचाराच्या आरोपांची विधानसभेत लक्षवेधी मांडली होती. यावर उत्तर देताना आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर यांनी डॉ. थोरात यांच्या निलंबनाची घोषणा केली.

अशोक थोरात यांच्यावर कोरोना काळात भ्रष्टाचार केल्याचा आरोप नमिता मुंदडा यांनी केला. यापूर्वी त्यांची या आरोपांवर चौकशी झाली होती. त्यात ते दोषी आढळले होते. त्यानंतर त्यांची बदली नाशिकला करण्यात आली. तिथे त्यांनी काय केले याची कल्पना नाही. पण पुन्हा ते बीडमध्ये कसे काय रुजू झाले? आता तरी त्यांची सखोल चौकशी होणार का? आणि त्यांचे निलंबन होणार का? असा सवाल नमिता मुंदडा यांनी विचारला होता.

Ashok Thorat
Sadhvi Pradnyasingh Politics: साध्वी प्रज्ञासिंगला समाजवादी पार्टीचा झटका! काय आहे प्रकरण?

यावर आरोग्य मंत्री आबिटकर यांनी डॉ. अशोक थोरात यांच्यावरील आरोप गंभीर आहेत, असे म्हणत त्यांना निलंबित करत असल्याची घोषणा केली. तसेच तीन महिन्यांच्या आत विभागीय चौकशी करून त्याचा अहवाल सादर करण्याचे आदेशही आबिटकर यांनी दिले आहेत. यावेळीच आमदार प्रशांत बंब यांनीही थोरात यांची यापूर्वी झालेली चौकशी नीट झाली नव्हती. त्यातील दिरंगाईमुळे चार वर्षे वेळ गेल्याचा मुद्दा मांडला. त्यावरही आबिटकर यांनी ज्यांनी चौकशीत दिरंगाई केली त्यांच्यावरही कारवाई करण्यात येईल अशी घोषणा केली.

Ashok Thorat
Kumbh Mela Politics: किन्नर आखाड्याच्या ‘त्या’ घोषणेने नाशिकच्या कुंभमेळ्याआधीच वादाची ठिणगी?

अंजली दमायनियांचे आरोप :

डॉ. अशोक थोरात यापूर्वी आरोग्य मंत्री विमल मुंदडा यांचे विशेष कार्य अधिकारी होते. कोरोना काळात ते बीडचे जिल्हा शल्यचिकित्सक होते. त्यानंतर त्यांची नाशिकला बदली झाली होती. तिथून ते पुन्हा बीडला शल्यचिकित्सक म्हणून रुजू झाले. थोरात यांच्या या प्रगतीमागे कोण्या बड्या व्यक्तीचा हात आहे असा आरोप, आरोप सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी काही दिवसांपूर्वी केला होता.

अंबेजोगाई येथील पियुष इन हे हॉटेल कोणाचे आहे? मला अशी माहिती मिळतेय की अशोक थोरात यांचे हे हॉटेल आहे. हे बीड रुग्णालयात सिव्हिल सर्जन आहेत. ह्याची चौकशी व्हायला हवी. त्यांच्याच नेतृत्वात संतोष देशमुख यांचे शव विच्छेदन झाले होते. वाल्मीक कराडला दोनदा रुग्णालयात आणण्यात आले. 11 रुग्णांना बाहेर काढून एका ठणठणीत गुन्हेगाराला ICU मधे ठेवण्यात आले, असेही आरोप दमानिया यांनी केला होता.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com