Deepa Mudhol-Munde Transfer: मोठी बातमी! बीड लोकसभा निवडणुकीत वादग्रस्त ठरलेल्या जिल्हाधिकारी दीपा मुधोळ-मुंडे यांची बदली

Beed Collector Dipa Mudhol Munde Transferred : बीडची निवडणूक जातीय आणि राजकीय कारणांमुळे चर्चेत आली. तशीच ती मतदान केंद्रावरील बोगस मतदान आणि प्रशासनातील अधिकाऱ्यांचा वाढता हस्तक्षेप अशा आरोपामुळेही चांगलीच गाजली.
Beed Collector Dipa Mudhol Munde transferred
Beed Collector Dipa Mudhol Munde transferred Sarkarnama

Beed News, 26 June : बीड लोकसभा मतदारसंघात भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे व राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे बजरंग सोनवणे यांच्यात चुरशीची लढत झाली. ही निवडणूक अनेक कारणांनी चर्चेत होती.

बीडमधील निवडणूक मराठा विरुद्ध ओबीसी (Maratha vs OBC) अशा जातीय संघर्षातून गेल्याचं दिसून आलं. निवडणुकीनंतरही हा जातीय तेढ अद्याप या मतदारसंघात दिसत आहे. दरम्यान, जातीय आणि राजकीय कारणांमुळे चर्चेत आलेली ही निवडणूक मतदान केंद्रावरील बोगस मतदान आणि प्रशासनातील अधिकाऱ्यांचा वाढता हस्तक्षेपाच्या आरोपामुळेही गाजली.

त्यामुळे निवडणूक मतमोजणी प्रक्रियेत अनेक शासकीय अधिकाऱ्यांवर शरद पवार (Sharad Pawar) गटाने आक्षेप घेतला होता. अशातच आता निवडणुकीच्या निकालानंतर महिनाभरातच बीडच्या जिल्हाधिकाऱ्यांची बदली करण्यात आली आहे.

Beed Collector Dipa Mudhol Munde transferred
Chandrashekhar Bawankule News : भाजपचे बावनकुळे म्हणतात, 'राज्यात डबल इंजिनचे सरकार येणार' ? पण अजितदादांच्या एनसीपीचा विसर

लोकसभा निवडणुकीच्या काळात बीडच्या (Beed) तत्कालीन जिल्हाधिकारी दीपा मुधोळ-मुंडे (Deepa Mudhol-Munde) यांच्यावर शरद पवार गटाने गंभीर आरोप केले. या आरोपांमुळे त्या चांगल्याच वादग्रस्त ठरल्या होत्या. इतकंच नव्हे तर आघाडीचे उमेदवार बजरंग सोनवणे यांनी मतमोजणीवेळी तहसिलदार आणि जिल्हाधिकाऱ्यांना सहभागी न होऊ देण्याची मागणी देखील निवडणूक आयोगाकडे केली होती.

Beed Collector Dipa Mudhol Munde transferred
Navneet Rana Vs Yashomati Thakur and Bacchu Kadu : फडणवीसांच्या भेटीनंतर नवनीत राणांचा यशोमती ठाकूर अन् बच्चू कडूंवर पलटवार, म्हणाल्या...

अखेर याच जिल्हाधिकारी दीपा मुधोळ-मुंडे यांची बीड जिल्हाधिकारी पदावरुन बदली करण्यात आली आहे. अपर मुख्य सचिव नितीन गद्रे यांच्या सहीने त्यांची बदली करण्यात आल्याचं पत्र पाठवण्यात आलं आहे. दीपा मुधोळ-मुंडे यांच्या बदलीनंतर आता बीडचे जिल्हाधिकारी म्हणून अविनाश पाठक (Avinash Pathak) यांची नियुक्ती करण्यात आली आहे. पाठक हे बीड जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून काम पाहत होते.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com