Beed Lawyer Death Case : बीड पुन्हा हादरलं! न्यायालयाच्या खिडकीला दोरी बांधून सरकारी वकिलाची आत्महत्या

Government Lawyer Vinayak Chandel Death Case : मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येच्या घटनेपासून बीड जिल्हा या ना त्या कारणाने चर्चेत आहे. अशातच आता बीडमधून आणखी एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे.
Beed’s Vadwani court after government lawyer Vinayak Chandel died
Police officials at Beed’s Vadwani court after government lawyer Vinayak Chandel died. The incident sparked shock across the legal community.Sarkarnama
Published on
Updated on

Beed News, 20 Aug : मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येच्या घटनेपासून बीड जिल्हा या ना त्या कारणाने चर्चेत आहे. अशातच आता बीडमधून आणखी एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे.

ती म्हणडे बीडच्या (Beed) वडवणी स्थानिक न्यायालयात कार्यरत असलेले सरकारी वकील विनायक चंडेल यांनी न्यायालयातच गळफास घेत आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे.

आज सकाळी 11 च्या सुमारास कोर्टाच्या परिसरात एका सरकारी वकिलाने आत्महत्या केल्याची बातमी समजताच न्यायालयाच्या परिसरात एकच खळबळ उडाली आहे. तर या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन पुढील तपासाला सुरूवात केली आहे.

Beed’s Vadwani court after government lawyer Vinayak Chandel died
Best Employees Credit Society Election : 'बेस्ट पतपेढी'चा निकाल; अंजली दमानियांना झालाय खूप आनंद, कारण त्यांनीच सांगितलं!

मिळालेल्या माहितीनुसार वकील विनायक चंडेल यांनी न्यायालयातील खिडकीला दोरी बांधून आपलं आयुष्य संपवलं आहे. मात्र, चंडेल यांनी एवढं टोकाचं पाऊल का उचललं? याबाबतचं कारण अद्याप समोर आलेलं नाही.

Beed’s Vadwani court after government lawyer Vinayak Chandel died
Parliament Session : केवळ विरोधकच नव्हे तर नितीश कुमार, चंद्राबाबूंवरही अंकुश ठेवण्याचा प्लॅन? केजरीवाल ठरले कारणीभूत...

मात्र, एका सरकारी वकिलाने अशा प्रकारे कोर्टाच्या परिसरातच गळफास घेत आत्महत्या केल्यामुळे कोर्टासह परिसरात एकच खळबळ उडाली आहे. दरम्यान, पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करून मृतदेह पोस्टमार्टमसाठी सरकारी रूग्णालयात पाठवला आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com